Premachi Goshta Latest Episode : सावनी आगीत तेल ओतणार, सागर-मुक्ताचे प्रेम बेचिराख होणार? आदित्यच्या निर्णयाने नवा ट्विस्ट
Premachi Goshta Latest Episode Highlights : सागरसोबत भांडण केलेला आदित्य कोणता निर्णय घेणार, सावनीने लावलेल्या आगीत सागर-मुक्ताचे प्रेम बेचिराख होणार का, अशा प्रश्नांची उत्तरे आजच्या एपिसोडमध्ये मिळतील.
Premachi Goshta Latest Episode Highlights : 'प्रेमाची गोष्ट' (Premachi Goshta) मालिकेत सध्या नवं वळण आले आहे. मुक्ता आणि सागरमधील प्रेमाचे नाते तुटण्यापर्यंत आले आहे. तर, दुसरीकडे सावनी या आगीत आणखी तेल ओतणार आहे. आदित्यही सागरबाबत एक मोठा निर्णय घेतो. सागरसोबत भांडण केलेला आदित्य कोणता निर्णय घेणार, सावनीने लावलेल्या आगीत सागर-मुक्ताचे प्रेम बेचिराख होणार का, अशा प्रश्नांची उत्तरे आजच्या एपिसोडमध्ये मिळतील.
आदित्यच्या मनातील संताप बाहेर येणार
रागावलेल्या आदित्यला समजवण्याचे प्रयत्न सागर करतो. आदित्य आपले वडील सागरला उलटसुलट बोलतो. तुमच्यासाठी सगळं तीच (मुक्ता) आहे, मी नाही असे सागर आदित्यला बोलतो. मी किंवा तुमची नवीन बायको मुक्ता या दोघांपैकी एकाची निवड करण्याची वेळ आली तरी तुम्ही तिची निवड कराल असे आदित्य सागरला म्हणतो. आदित्यला समजावत असताना मुक्ता तिथे येते आणि हे सगळे ऐकते. हे ऐकून तिला धक्काच बसतो. आदित्य सागरला माझे तुझ्यावरच प्रेम आहे, मी तिच्यासोबत खोटं बोललो, तुझ्यासोबत खोटं बोललो नाही असे सागर आदित्यला सांगतो. सागरशी भांडणाऱ्या आदित्यला पाहून सावनी मनोमन सुखावते. आदित्य निघून गेल्यानंतर सागरला त्याच्यासोबतचे क्षण आठवतात.
सावनी आगीत तेल ओतणार, मुक्ता होणार संतप्त
तर, दुसरीकडे मुक्ताला सावनीने सागरबद्दल सांगितलेल्या गोष्टी आठवतात. सावनीने या आधी मुक्ताला सागरबद्दलच्या चुकीच्या, दिशाभूल करणाऱ्या गोष्टी सांगितलेल्या असतात. त्याच गोष्टी तिला आठवतात. सागर हा आपल्याशी प्रतारणा करत असल्याची भावना मुक्ताच्या मनात निर्माण होते.
वातावरण तंग झाले असताना सावनी येते आणि आगीत तेल ओतते. सागरच्या प्रेमात पडू नकोस असा इशारा दिला होता, सागरने तुझ्यासोबत सईसोबत लग्न केले होते हे आधीच सांगितले होते असे सावनी मुक्ताला सांगते. सागरची गरज आहे, म्हणून तुझ्यासोबत आहे. त्याचे प्रेम माझ्यावर आहे असे सावनी मुक्ताला सागरसमोर सांगते. तू फक्त सईची केअरटेकर आहेच असे सावनी सांगते.
मुक्ता सागरच्या कानशिलात लगावणार
सागर मुक्ताला समजावण्याचा प्रयत्न करतो. सावनीचे ऐकून संतापलेली मुक्ता सागरच्या कानशिलात लगावते. आपल्या दोघांमध्ये कोणतेच प्रेम नव्हते, आपल्या नात्याचा पाया तडजोड होता असे मुक्ता सागरला भावूक होऊन सांगत असते. आपलं नातं हे फक्त सईसाठी होते आणि सईसाठीच राहिल असे मुक्ता सागरला बजावते.
सागर आणि मुक्ताच्या प्रेमच्या होळी होत असताना सावनीला याचा मनोमन आनंद होतो. आपल्या डावात यशस्वी झाल्याचे समाधान तिच्या चेहऱ्यावर असते.सावनी सागरला आणखी डिवचते आणि त्याच्या जखमांवर मीठ चोळते. त्यावर, हे तुला खूप महागात पडणार असल्याचे सागर सावनीला इशारा देतो.
आदित्यने घेतला मोठा निर्णय, सावनी काय करणार?
वडिलांसोबत केलेल्या भांडणानंतर आदित्य कौन्सिलिंगचे सेशन आणि वडिलांसोबतचे घालवलेले क्षण आठवतो. सागरचे त्याच्यावर असलेले प्रेम आठवते. हे आठवून हळवा झालेला आदित्य सागरने सही केलेले सही केलेली कागदपत्रे फाडतो. पप्पांसोबत खोटे बोलून मला माझे अधिकार नकोत असे सावनीला सांगतो. आदित्य सावनीसमोर सागरचे आपल्यावर किती प्रेम आहे, हे सांगतो. आदित्यने कागदपत्रे फाडल्यावर सावनीला संताप येतो पण ती हतबल होते. मुक्ताच्या कौन्सिलिंगमुळे आदित्यही सागरच्या बाजूने फिरला असे सावनी मनातल्या म्हणते. आदित्य सागरला पप्पा म्हणून हाक मारतो आणि रंग लावत त्याला मिठी मारतो. आदित्य आणि सागर दोघेही भावूक होतात.