Prajakta Mali : प्राजक्ता माळीने दिली बालिकाश्रमाला भेट; पोस्ट शेअर करत म्हणाली,"..तर मुलींच्या मदतीसाठी पुढे या"
Prajakta Mali Post : अभिनेत्री प्राजक्ता माळी अभिनयासह समाजकार्यदेखील करत असते. अभिनेत्रीने आता बालिकाश्रमाला भेट दिली आहे.
Prajakta Mali : मराठमोळी अभिनेत्री प्राजक्ता माळी (Prajakta Mali) नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. अभिनयासह सामाजिक, कला आणि राजकीय अशा विविध क्षेत्रांत ती अॅक्टिव्ह आहे. अभिनेत्रीने नुकतीच एका बालिकाश्रमाला भेट दिली आहे. भेट दिल्यानंतर यासंदर्भात तिने खास पोस्ट शेअर करत आपलं मत मांडलं आहे.
प्राजक्ता माळी पोस्ट काय? (Prajakta Mali Post)
प्राजक्ता माळीने लिहिलं आहे,"दोन दिवसांपूर्वी नेटफ्लिक्सवर 'भक्षक' सिनेमा बघत होते आणि त्याच संध्याकाळी या बालिकाश्रमाला भेट देण्याचा योग आला. कधी कधी आपल्या शेजारच्या बिल्डींगमध्ये चौकातील रस्त्यांवरील झोपड्यांमध्ये, आपल्या अवतीभवती काय चालू असतं याची आपल्याला अजिबात कल्पना नसते. अशाच काही भरकटलेल्या ठिकाणांहून या मुली इथे आल्यात आणि त्यांचा इथे चांगला सांभाळ होतोय बघून बरं वाटलं".
प्राजक्ताने पुढे लिहिलं आहे,"सजगपणे पहा, तुमच्याही अवतीभवती अशा मुली असतील तर त्यांच्या मदतीसाठी पुढे या. विरारमधील या बालिकाश्रमाचा पर्याय तर खूलाच आहे. (राहणं, जेवण, शिक्षण, आरोग्यसुविधा मोफत-नियम व अटी लागू). भक्षक जरूर पाहा म्हणजे मला नेमकं काय म्हणायचय हे ध्यानात येईल. सिनेमा, सिनेमा म्हणूनही उत्तमच झालाय".
View this post on Instagram
प्राजक्ता माळीची ही पोस्ट सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे. अभिनयातून थोडा ब्रेक घेऊन प्राजक्ता अनेकदा सामाजिक संस्थांना भेट देत असते. आता विरारमधील एका बालिकाश्रमाला तिने भेट दिली आहे. त्यानंतर समाजातील सध्याची परिस्थिती, मुलींचा सांभाळ याबद्दल तिने तिचं मत मांडत एक पोस्ट शेअर केली आहे. प्राजक्ताच्या पोस्टवर नेटकऱ्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे. तसेच अभिनेत्री नेहमीच प्रेरणा देत असल्याने तिचं कौतुक केलं आहे.
प्राजक्ताच्या आगामी प्रोजक्टबद्दल जाणून घ्या...
प्राजक्ता सध्या 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' (Maharashtrachi Hasyajatra) या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करत आहे. सोशल मीडियावरही ती चांगलीच अॅक्टिव्ह आहे. प्राजक्ताचा 'तीन अडकूल सीताराम' हा सिनेमा काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. 'भिशी मित्र मंडळ' हा तिचा आगामी सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. प्राजक्ताच्या आगामी कलाकृतींची प्रेक्षकांना आता उत्सुकता आहे.
संबंधित बातम्या