Popeye the Sailor Man : चिमुकल्यांचा आवडत्या पॉपॉयचा 94 वा बर्थडे, पालक खाऊन एनर्जी मिळणाऱ्या पॉपॉयची रंजक कहाणी माहीत आहे?
Popeye the Sailor Man: पॉपॉयला अमेरिकन कार्टूनिस्ट Elzie Crisler Segar ने आपल्या कुंचल्यातून रेखाटलं होतं. आज हाच पॉपॉय तब्बल 94 वर्षांचा झालाय.
Popeye the Sailor Man: तुम्हाला Popeye आठवतोय का? तोच Popeye जो कोणतंही संकट आलं की, पटकन पालक खायचा आणि शत्रूशी, संकटाशी दोन हात करायचा. लहानग्यांपासून अनेक मोठ्यांचाही आवडता कार्टून शो 'Popeye the Sailor Man'. तुमच्या आमच्या आवडत्या Popeye ला आजच्याच दिवशी एक नवी ओळख मिळाली होती. आजच Popeyeचा जन्म झाला होता. आज हाच पॉपॉय 94 वर्षांचा झाला आहे.
Popeye, एक काल्पनिक कार्टून पात्र. आजच्याच दिवशी पण तब्बल 94 वर्षांपूर्वी Popeye ला डेली किंग फीचर्स कॉमिक स्ट्रिप, थिम्बल थिएटरमध्ये एक पात्र म्हणून लॉन्च करण्यात आलं होतं. त्यानंतर अॅनिमेटेड कार्टूनच्या जगात थिएटर आणि टेलिव्हिजन जगतात Popeye रिलीज करण्यात आला.
अमेरिकन व्यंगचित्रकार Elzie Crisler Segar यांनी आपल्या कुंचल्यानं पोपायला रेखाटलं. बघता बघता Popeye सर्वांचा लाडका बनला. पालेभाज्या म्हणजे, लहान मुलांच्या शत्रू. पण हिच पालेभाज्या खाऊन कशी ताकद येते, ते Popeyeनं लहानग्यांना शिकवलं.
संकटात सापडताच Popeye पालकचे डब्बे बाहेर काढतो आणि तो पटापट खाऊन टाकतो आणि आश्चर्य तर काय? Popeye खूप ताकद मिळते. त्याची शक्ती कैकपटींनी वाढते. त्यानंतर तो शत्रूवर तुटून पडतो. Elzie Crisler Segar यांची ही संकल्पना खरोखरंच प्रभावी ठरली. Popeye मुळे जी मुलं पालकच्या भाजीकडे पाहून नाकतोंड मुरडायची, त्यांची ती आवडती भाजी बनली.
Popeye फार कमी वेळात खूप लोकप्रिय झाला. कॉमिक बुक्स, टेलिव्हिजन कार्टून, व्हिडीओ गेम्स आणि मर्चंडाइजपर्यंत या कार्टून पात्राचा मनोरंजनापर्यंतचा प्रवास आहे. 1980 मध्ये, दिग्दर्शक रॉबर्ट ऑल्टमन यांनी प्रसिद्ध अभिनेता आणि कॉमेडियन रॉबिन विल्यम्ससह पॉपॉयला थेट-अॅक्शन चित्रपटातून सर्वांसमोर आणलं.
Popeye च्या 'या' गोष्टी तुम्हाला माहितीयेत?
- पॉपॉय हे पहिलं असं कार्टुन कॅरेक्टर आहे, ज्याचं शिल्प साकारण्यात आलं होतं.1937 मध्ये, क्रिस्टल सिटी, टेक्सासमध्ये पॉपॉय खात असलेल्या पालकाचं रंगीत मूर्ती स्थापन करण्यात आली होती.
- पॉपॉय कार्टुनच्या लोकप्रियतेनंतर शब्दकोशात 'विंप', 'विम्पी' आणि 'जीप' हे शब्द जोडण्यात आले होते.
- 2004 मध्ये प्रसिद्ध कार्टून कॅरेक्टरचा 75वा वाढदिवस साजरा करण्यासाठी एम्पायर स्टेट बिल्डिंगला हिरव्या रंगाची रोषणाई करण्यात आली होती.
- 1938 आणि 1942 च्या दरम्यान, जॅक मर्सर, ज्यानं पॉपॉयला आवाज दिला, त्याचं लग्न ऑलिव्ह ओयलला आवाज देणार्या मार्गी हाइन्सशी झालं.
- Popeye चं थीम सॉंग, 'I am Popeye The Sailor Man' हे संगीतकार सॅमी लर्नर यांनी संगीतबद्ध केलं होतं.
- 2002 मध्ये, टीव्ही गाईडनं 'ऑल टाइम फेमस 50 कार्टून करेक्टर्स'च्या यादीत पॉपॉयला 20वं स्थान दिलं होतं.