Paaru Marathi Serial : किर्लोस्करांच्या होणाऱ्या सुनेमुळे नवं वादळ येणार, बहिणीच्या अपमानाचा बदला अनुष्का घेणार
Zee Marathi : पारु मालिकेत एका नव्या पात्राची एन्ट्री झाली असून आता किर्लोस्करांच्या घरात कोणतं वादळ येणार याची उत्सुकता प्रेक्षकांना आहे.
Paaru Marathi Serial : 'झी मराठी' वाहिनीवरील (Zee Marathi) 'पारू' (Paaru Marathi Serial) मालिका सध्या बऱ्याच रंजक वळणावर आहे. नुकतच या मालिकेत एका नव्या पात्राची एन्ट्री झाली आहे. अभिनेत्री श्वेता रंजन ही अनुष्का हे पात्र साकारत आहे. अनुष्का ही किर्लोस्करांच्या घरात त्यांची होणारी सून म्हणून प्रवेश घेणार का याची उत्सुकता प्रेक्षकांना आहे. असं असतानाच एक मोठा धक्का आता प्रेक्षकांना बसणार आहे.
दिशाला तुरुंगात पाठवल्यानंतर तिच्या अपमानाचा बदला घेण्यासाठीच तिची बहिण अनुष्का ही आली आहे. अनुष्काने अगदी सराईतपणे किर्लोस्करांच्या घरात प्रवेश मिळवला आहे. पण आता बहिणीच्या अपमानाचा सूड घेण्यासाठीच अनुष्का आली असल्याचं सत्य किर्लोस्करांसमोर येणार का? याची उत्सुकता प्रेक्षकांना लागून राहिली आहे.
मालिकेचा नवा प्रोमो समोर
मालिकेचा नवा प्रोमो नुकताच सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. या प्रोमोमध्ये अनुष्का दिशाला सांगते की, 'अहिल्या आणि श्रीकांत किर्लोस्करांचा मुलगा आदित्य किर्लोस्कर.. त्याला प्रपोज केलं...सगळ्यांचा हिशोब होणार... तुझी बहिण तुझ्या अपमानाचा बदला घेणार...सगळ्यांचा..त्यावर दिशा अनुष्काला सांगते की, सगळ्यात आधी पारू...'
पारू मालिकेविषयी जाणून घ्या...
'झी मराठी'वर 12 फेब्रुवारीपासून पारू आणि शिवा या दोन मालिका सुरू झाल्या. पारू' या मालिकेत मुख्य अभिनेत्रीच्या भूमिकेत शरयू सोनावणे आहे. तर, अहिल्यादेवींच्या भूमिकेत मुग्धा कर्णिक आहेत. अभिनेता प्रसाद जवादेही या मालिकेत प्रमुख भूमिकेत आहे.शिस्तबद्ध, वचनाची पक्की, रागीट अशा अहिल्यादेवीच्या महालासारख्या बंगल्यात मनसोक्त जगणाऱ्या पारूची एन्ट्री झाली..पारू ही अहिल्यादेवींच्या बंगल्यात मदतनीस म्हणूम काम करत आहे. अहिल्यादेवी आणि पारूमध्ये संघर्ष होताना दिसत आहे.
View this post on Instagram
ही बातमी वाचा :