एक्स्प्लोर

Marathi Serial : रावडी सत्या आणि भित्री कॉन्स्टेबल मंजूची नवी मालिका लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला; प्रोमो आऊट!

Constable Manju : 'कॉन्स्टेबल मंजू' ही नवी मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच या मालिकेचा प्रोमो आऊट झाला आहे.

Constable Manju New Marathi Serial : एका प्रसिद्ध राजकारण्याचा बिनधास्त, निडर कार्यकारी तर एक भित्री भागुबाई पोलिस यांचं प्रेमाचं, लग्नाचं गणित जुळलं तर कसं वाटेल? कल्पना तरी होणं शक्य आहे का? अर्थात, नाही पण देवा ब्राह्मणाच्या साक्षीने या जोडीची लग्नगाठ बांधली जाणार, अशी ही अनोखी मनोरंजक कथा 'कॉन्स्टेबल मंजू' (Constable Manju) या नव्या मालिकेत 18 मार्चपासून प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. 

'कॉन्स्टेबल मंजू' ही मालिका मंजिरी वाघमारे उर्फ मंजू आणि सत्या या दोन पात्रांवर आधारित आहे. नुकतीच या मालिकेची झलक आऊट झाली आणि मंजुचा स्वभाव सर्वांना कळला असेल. 
मंजिरी वाघमारे उर्फ मंजू ही तिच्या 'वाघमारे' या आडनावाप्रमाणे बिलकुल धाडसी नाही. मंजू ही भित्री जी जवळजवळ प्रत्येकाला आणि प्रत्येक गोष्टीला घाबरते. कोणीही मोठ्याने बोलताना ऐकल्यावर सुद्धा ती घाबरते आणि त्यामुळे तिच्याकडून चुका होतात.

रावडी सत्या आणि भित्री कॉन्स्टेबल मंजूची नवीन मालिका 18 मार्चपासून
 
पोलिस या पदाला शोभेल अशी धीट कामं करण्यापेक्षा  स्टेपलरमध्ये स्टेपलर पिन टाकणे, फाईल्स लावणे, कागदपत्रे भरणे, ज्येष्ठांसाठी बाटलीत पाणी भरणे, देवाची पूजा करणे ही क्षुल्लक कामे ती पोलीस स्टेशनमध्ये एका दिवसात पार पाडते. पोलिस होण्याचा एकही गुण तिच्यात नाही. उलट, कोणताही गुन्हा घडूच नये, अशी ती देवाकडे प्रार्थना करते.  खरंतर तिला पोलीस बनण्यात अजिबात रस नव्हता.  पण परिस्थिती अशी होती की तिला नाईलाजास्तव पोलीस दलात भरती व्हावे लागले. ‘शी इज गुड फॉर नथिंग’, हेच तिला नेहमी घरात आणि पोलीस स्टेशनमध्ये बोलले जाते. त्यामुळे, मंजुला ही ती निरुपयोगी आहे असे वाटू लागले पण आत्मविश्वास गमावलेल्या मंजूच्या आयुष्यात अचानक हिरोची म्हणजेच सत्याची एन्ट्री होते.

View this post on Instagram
 
A post shared by Sun Marathi (@sunmarathi)

एका प्रसिद्ध राजकारण्यासाठी काम करणारा सत्या, स्वभावाने अगदी रावडी, तो बोलण्यापूर्वी त्याचे हात पाय आधी बोलतात. पण मनाने तितकाच सच्चा. राजकारणावर इतका जीव की तो बेकायदेशीर कृत्य करतोय याची त्याला कल्पनाच नसते.  सत्याला त्याच्या सारखीच धाडसी पत्नी हवी आहे. त्याच्या लग्न मंडपातच, पोलिस एका वॉन्टेड गुन्हेगाराचा शोध घ्यायला पोहचतात. पोलिसांनी पूर्ण प्लॅन करून ठेवलेला असतो, प्लॅननुसार कोणत्याही कामात रस नसलेल्या मंजूला नववधूच्या रूपात उभे केले जाते आणि जोपर्यंत गुन्हेगार पकडला जात नाही तोपर्यंत तिने वधूच्या ठिकाणाहून हलायचं नाही असा कडक आदेश तिला दिला जातो. पण कट रचला जात असताना, मंजूच्या लग्नाची गाठ सत्यासोबत बांधली जाते.

थोडीशी हुशार, थोडीशी वेडी... घेऊन येतेय प्रेमाची बेडी...

आता भित्री मंजू आणि निडर सत्या लग्नाच्या बंधनात सामान्य वैवाहिक आयुष्य जगतील का?  दोघांचं एकमेकांसोबत जमेल का?  सत्याच्या सहवासात राहून मंजूच्या स्वभावात बदल घडून ती धाडसी होईल का? आत्मविश्वास गमावलेली मंजू या नव्या नात्यामुळे स्वतंत्र होऊन स्वतःची ओळख निर्माण करेल का?  या सर्व प्रश्नांची उत्तरे प्रेक्षकांना या मालिकेतून नक्की मिळतील. 

संदीप जाधव निर्मित 'कॉन्स्टेबल मंजू' या मालिकेत मोनिका राठी हिने मंजुची आणि वैभव कदम यांनी सत्याची भूमिका साकारली आहे. या मालिकेचे संवाद तेजपाल वाघ यांनी लिहिले असून स्वप्नील गांगुर्डे यांनी कथा, पटकथा लिहिली आहे. भिन्न स्वभावाची ही अनोखी प्रेम कहाणी नक्की पाहा सोमवार ते शनिवार रात्री 8 वाजता सन मराठी वाहिनीवर.

संबंधित बातम्या

Zee Marathi Serial TRP : नव्या मालिकांचं सत्र पण टीआरपीच्या शर्यतीत झी मराठीची झुंज अपयशीच, फक्त 3 मालिकांनाच स्थान

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

निवडणुकीत जात-धर्म आणला जातो, सिल्लोडची पुढची विधानसभा लढणार नाही; अब्दुल सत्तारांची मोठी घोषणा
निवडणुकीत जात-धर्म आणला जातो, सिल्लोडची पुढची विधानसभा लढणार नाही; अब्दुल सत्तारांची मोठी घोषणा
मोठी बातमी ! UGC-NET ची 15 जानेवारीला होणारी परीक्षा रद्द; लवकरच जाहीर होईल नवी तारीख
मोठी बातमी ! UGC-NET ची 15 जानेवारीला होणारी परीक्षा रद्द; लवकरच जाहीर होईल नवी तारीख
सीमा लढ्यातील ज्येष्ठ सत्याग्रही, साहित्यिक व पत्रकार कॉम्रेड कृष्णा मेणसे यांचे निधन
सीमा लढ्यातील ज्येष्ठ सत्याग्रही, साहित्यिक व पत्रकार कॉम्रेड कृष्णा मेणसे यांचे निधन
मंत्रालयातील ती काळी लम्बोर्गिनी कोणाची; रोहित पवारांनी नावासह कुंडलीच काढली, 700 कोटी, मुंडेंचाही संदर्भ
मंत्रालयातील ती काळी लम्बोर्गिनी कोणाची; रोहित पवारांनी नावासह कुंडलीच काढली, 700 कोटी, मुंडेंचाही संदर्भ
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 10 PM TOP Headlines 10 PM 13 January 2025Sanjay  Raut Meet Sharad Pawar | मिशन पालिका इलेक्शन! संजय राऊतांनी घेतली शरद पवारांची भेटCity Sixty | सिटी 60 बातम्यांचा वेगवान आढावा एका क्लिकवर सुपरफास्ट ABP MajhaSantosh Deshmukh Case | धनंजय देशमुखांचं 'शोले' स्टाईल आंदोलन, सरकारला अल्टिमेटम Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
निवडणुकीत जात-धर्म आणला जातो, सिल्लोडची पुढची विधानसभा लढणार नाही; अब्दुल सत्तारांची मोठी घोषणा
निवडणुकीत जात-धर्म आणला जातो, सिल्लोडची पुढची विधानसभा लढणार नाही; अब्दुल सत्तारांची मोठी घोषणा
मोठी बातमी ! UGC-NET ची 15 जानेवारीला होणारी परीक्षा रद्द; लवकरच जाहीर होईल नवी तारीख
मोठी बातमी ! UGC-NET ची 15 जानेवारीला होणारी परीक्षा रद्द; लवकरच जाहीर होईल नवी तारीख
सीमा लढ्यातील ज्येष्ठ सत्याग्रही, साहित्यिक व पत्रकार कॉम्रेड कृष्णा मेणसे यांचे निधन
सीमा लढ्यातील ज्येष्ठ सत्याग्रही, साहित्यिक व पत्रकार कॉम्रेड कृष्णा मेणसे यांचे निधन
मंत्रालयातील ती काळी लम्बोर्गिनी कोणाची; रोहित पवारांनी नावासह कुंडलीच काढली, 700 कोटी, मुंडेंचाही संदर्भ
मंत्रालयातील ती काळी लम्बोर्गिनी कोणाची; रोहित पवारांनी नावासह कुंडलीच काढली, 700 कोटी, मुंडेंचाही संदर्भ
Education : शालेय शिक्षणामध्ये महाराष्ट्र पुन्हा नंबर 1 होणार; मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला विश्वास
शालेय शिक्षणामध्ये महाराष्ट्र पुन्हा नंबर 1 होणार; मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला विश्वास
नायलॉन मांजाने पतंग उडवाल तर तुमच्यावर येणार संक्रात; विक्रेत्यांसह पालक, मुलांवर थेट 'सदोष मनुष्यवधाच्या प्रयत्नाचा' गुन्हा
नायलॉन मांजाने पतंग उडवाल तर येणार संक्रात; विक्रेत्यांसह पालक, मुलांवर थेट 'सदोष मनुष्यवधाच्या प्रयत्नाचा' गुन्हा
OBC विद्यार्थ्यांसाठी पुण्यासह 5 शहरात उत्कृष्ठता केंद्र स्थापन होणार; मुख्यमंत्र्यांकडून महाज्योतीचा आढावा
OBC विद्यार्थ्यांसाठी पुण्यासह 5 शहरात उत्कृष्ठता केंद्र स्थापन होणार; मुख्यमंत्र्यांकडून महाज्योतीचा आढावा
Nashik Accident : पोलादी सळ्यांनी घेतला पाच तरुणांचा जीव, नाशिकमधील भीषण अपघातानंतर पोलिसांना खडबडून जाग; घेतला मोठा निर्णय
पोलादी सळ्यांनी घेतला पाच तरुणांचा जीव, नाशिकमधील भीषण अपघातानंतर पोलिसांना खडबडून जाग; घेतला मोठा निर्णय
Embed widget