Hardik Pandya : नताशाने साजरा केला अगस्त्यचा वाढदिवस, चाहत्यांना जाणवली हार्दिकची अनुपस्थिती; म्हणाले, चेहऱ्यावर निराशा...
Natasa Stankovic Son Birthday Celebration : नताशाने थीम पार्टी आयोजित करत लेक अगस्त्याचा वाढदिवस साजरा केला. याचे फोटोही नताशाने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
मुंबई : भारताचा अष्टपैलू क्रिकेटपटू हार्दिक पांड्या (Hardik Pandya) आणि मॉडेल आणि अभिनेत्री नताशा स्टॅनकोविक (Natasa Stankovic) आता वेगळे झाले आहेत. घटस्फोटानंतर नताशा सर्बियामध्ये तिच्या माहेरच्या घरी गेली आहे. मुलगा अगस्त्य नताशासोबत सर्बियामध्ये आहे. काही दिवसांपूर्वी मुलगा अगस्त्यचा (Agastya Pandya) चौथा वाढदिवस होता. नताशाने सर्बियामध्ये अगस्त्यचा वाढदिवस साजरा केला. नताशाने थीम पार्टी आयोजित करत अगस्त्याच्या मित्र-मैत्रिणींसोबत वाढदिवस साजरा केला. याचे फोटोही नताशाने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
नताशाने साजरा केला अगस्त्यचा वाढदिवस
नताशा स्टॅनकोविक आणि भारतीय क्रिकेटर हार्दिक पांड्या विभक्त झाले आहेत. 18 जुलै रोजी दोघांनी सोशल मीडियावर पोस्ट करत घटस्फोट घेत असल्याची घोषणा केली, पण मुलगा अगस्त्यचं संगोपन एकत्र करणार असल्याचं सांगितलं. नताशा ही सर्बियाची रहिवासी असून घटस्फोटानंतर ती आपल्या माहेरच्या घरी परतली आहे. तिथे तिने मुलाचा चौथा वाढदिवसही साजरा केला, ज्यामध्ये हार्दिक पांड्याची अनुपस्थिती पाहून चाहते दु:खी झाले. हार्दिकचे आपल्या मुलावर किती प्रेम आहे हे सर्वश्रुत आहे, पण या खास प्रसंगी त्याची अनुपस्थिती सर्वांनाच खटकली. चाहत्यांना फोटोंमध्ये निराशा दिसत असल्याचं म्हटलं आहे.
चाहत्यांना जाणवली हार्दिकची अनुपस्थिती
नताशाने मुलगा अगस्त्यचा चौथा वाढदिवस हॉट व्हील्सच्या थीमवर साजरा केला. अगस्त्याने त्याचा वाढदिवस छोटेखानी मित्रमंडळींसोबत साजरा केला. हार्दिक दरवर्षी आपल्या मुलाचा वाढदिवस मोठ्या थाटामाटात साजरा करायचा, मात्र यावेळी तो या सेलिब्रेशनमध्ये सहभागी झाला नाही. हार्दिकशिवाय ही पार्टी अपूर्ण असल्याचं चाहत्यांनी कमेंट करत म्हटलं आहे.
नेटकरी म्हणाले, 'चेहऱ्यावर निराशा...'
View this post on Instagram
अगस्त्याकडे बघून तो आपल्या वडिलांना मिस करतोय असं वाटत असल्याची प्रतिक्रिया चाहत्यांनी कमेंटमध्ये बोलून दाखवली आहे. हार्दिक पांड्याने अगस्त्यच्या वाढदिवसानिमित्त मुलासाठी खास पोस्ट शेअर केली होती.
View this post on Instagram
दरम्यन, हार्दिकचा मोठा भाऊ आणि अगस्त्यचा काका कृणाल पंड्या यांनी नताशा आणि अगस्त्याच्या फोटोंवर हार्ट इमोजी पोस्टवर केलं आहे. हार्दिकचा भाऊ कृणाल याचं आण भाचा अगस्त्य यांचं खास नातं आहे. कृणालने आपल्या मुलाप्रमाणे अगस्त्याची जास्त काळजी घेतली आहे. त्याच्या सोशल मीडिया पोस्टवर पुतण्यासोबतचे अनेक फोटो आणि व्हिडीओ वेळोवेळी शेअर केले आहेत.
महत्त्वाच्या इतर बातम्या :