Namrata Sambherao : 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'च्या माध्यमातून प्रेक्षकांना खळखळून हसवणारी नम्रता संभेराव! जाणून घ्या 'लॉली'बद्दल...
Namrata Sambherao : अभिनेत्री नम्रता संभेराव 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' (Maharashtrachi Hasyajatra) या कार्यक्रमाच्या माध्यमातून घराघरांत पोहोचली आहे.
Namrata Sambherao : 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' (Maharashtrachi Hasyajatra) या विनोदी कार्यक्रमाच्या माध्यमातून घराघरांत पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे नम्रता संभेराव (Namrata Sambherao) होय. नम्रताने आपला अभिनय आणि विनोदाच्या टायमिंगच्या जोरावर स्वत:ला सिद्ध केलं आहे. आपल्या हावभावांनी ती प्रेक्षकांना हसवत असते.
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कार्यक्रमाच्या माध्यमातून नम्रताला 'लॉली' ही नवी ओळख मिळाली आहे. नम्रता कॉलेजमध्ये असताना एकांकिका करू लागली. त्यावेळी तिला अभिनयाची गोडी निर्माण झाली. एकांकिकेनंतर ज्युनियर आर्टिस्ट म्हणून ती काम करू लागली.
मध्यमवर्गीय कुटुंबात नम्रताचा जन्म झाला आहे. कॉलेजनंतर नम्रता हळूहळू मालिकांमध्ये काम करू लागली. त्यावेळी तिने 'चार दिवस सासूचे' आणि 'वादळवाट' या मालिकांमध्येही काम केलं आहे. 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कार्यक्रमासह नम्रताने 'वाळवी','व्हेंटिलेटर' अशा गाजलेल्या सिनेमांतही काम केलं आहे. या सिनेमातील तिच्या भूमिकांचं सर्वत्र कौतुक झालं आहे.
हास्यजत्रेच्या टीमची लाडकी नमा...
नम्रता संभेरावची एक विशेष कॉमेडी स्टाईल आहे. तिच्या या स्टाईलचा, विनोदांचा मोठा चाहतावर्ग आहे. नम्रता सोशल मीडियावर चांगलीच अॅक्टिव्ह आहे. सोशल मीडियावर वेगवेगळ्या लूकमधले फोटो ती शेअर करत असते. तसेच आगामी प्रोजेक्टचीदेखील माहिती देत असते. नम्रताचे इन्स्टाग्रामवर 218k फॉलोअर्स आहेत. हास्यजत्रील मंडळी तिला 'नमा' या नावाने हाक मारतात. हास्यजत्रेच्या टीमची ती लाडकी आहे.
नम्रता संभेरावच्या पतीचं नाव योगेश संभेराव आहे. योगेशदेखील मराठी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता आहे. नम्रताने मालिका, विनोदी कार्यक्रम नाटक, सिनेमे अशा सर्वच माध्यमांमध्ये काम केलं आहे. नम्रता आणि योगेश यांना गोड मुलगा आहे. या मुलाचं नाव रुद्र आहे.
View this post on Instagram
नम्रता संभेरावच्या कलाकृतींबद्दल जाणून घ्या...
नम्रता संभेरावने बाबू बँड बाजा, नाच तुझं लगीन हाय, किरण कुलकर्णी वर्सेस किरण कुलकर्णी, लूझ कंट्रोल, आबालाल आडकित्ते, मुमताज महल, कभी कभी, आदस से मजबूर, वादळवाट, भाग्यविधाता, या सुखानो या, चार दिवस सुखाचे, जिवलग, चेकमेट, तुझ्याविना अशा अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे. नम्रताचा 'एकदा येऊन तर बघा' हा सिनेमा आता प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज आहे. 8 डिसेंबरला हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
संबंधित बातम्या