एक्स्प्लोर

Anaya Soni: मालिकेच्या शूटिंग दरम्यानच झाली किडनी फेल! अभिनेत्री सेटवरच कोसळली; उपचारांसाठी पैशांची चणचण

Anaya Soni: टीव्ही अभिनेत्री अनाया सोनी (Anaya Soni) हिला किडनी निकामी झाल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Anaya Soni: टीव्ही अभिनेत्री अनाया सोनी (Anaya Soni) हिला किडनी निकामी झाल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ‘मेरे साई’ व्यतिरिक्त ती ‘इश्क में मरजावा’ या शोमध्ये देखील दिसली आहे. आता अभिनेत्रीला आर्थिक मदतीची गरज आहे. या संदर्भात अनाया सोनीने सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे. तिने याबाबत चाहत्यांना माहिती दिली असून, लोकांना मदत करण्याचे आवाहनही केले आहे. अभिनेत्री अनाया सोनी सेटवर आजारी पडली, त्यानंतर तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. अनाया सोनी 'मेरे साई'च्या सेटवर शूटिंग करत असतानाच बेशुद्ध पडली. त्यानंतर तिला घाईघाईने रुग्णालयात नेण्यात आले, जिथे डॉक्टरांनी तिच्या प्रकृतीबाबत अनेक खुलासे केले.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, अनाया सोनीची एक किडनी पूर्णपणे खराब झाली आहे. अनायाच्या वडिलांनी सांगितले की, ती सध्या डायलिसिसवर आहे आणि तिची किडनी बदलावी लागणार आहे. तिच्या वडिलांनी माध्यमांना याबद्दल माहिती देताना सांगितले की, त्यांची आर्थिक परिस्थितीही सध्या चांगली नाही. अनायाच्या डायलिसिसवर बराच खर्च होत आहे, जो तिच्या कुटुंबाला सांभाळणे सोपे नाही. अशा परिस्थितीत एवढा पैसा कुठून आणणार, अशी चिंता त्यांना सतावत आहे.

सोशल मीडियाद्वारे अभिनेत्रीने दिली माहिती

अनाया सोनीने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर पोस्ट शेअर करून ही माहिती दिली आहे. अनायाने लिहिले की, 'डॉक्टरांनी माझी किडनी निकामी झाल्याचे सांगितले आहे आणि मला डायलिसिसवर राहावे लागणार आहे. माझी क्रिएटिन पातळी 15.67 आणि हिमोग्लोबिन 6.7वर आहे. माझी प्रकृती गंभीर असून, मला सोमवारी अंधेरी पूर्व येथील होली स्पिरिट हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात येत आहे. माझ्यासाठी प्रार्थना करा. हे जीवन सोपे नाही आणि मी आज ते अशा प्रकारे जगून सोपे करण्याचा प्रयत्न करत आहे. ही वेळही लवकरच निघून जाईल. मी लवकरच किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करणार आहे आणि त्यानंतर किडनीसाठी अर्ज करेन.’

 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by ANAYA T SONI (@theanayasoni)

अभिनेत्रीची प्रकृती गंभीर

अनाया सोनीने ‘नामकरण’, ‘इश्क में मरजावा’ आणि ‘मेरे साई’ यांसारख्या टेलिव्हिजन शोमध्ये काम केले आहे. शनिवारी रात्री उशिरा तिने सोशल मीडियावर आपल्या प्रकृतीची माहिती दिली आहे. ती म्हणाला की, सध्या तिची प्रकृती खूप गंभीर आहे आणि तिला आता डायलिसिस करावे लागणार आहे. लवकरच ती किडनी प्रत्यारोपणासाठी अर्ज करणार आहे. तिने आपल्या चाहत्यांना शुभेच्छा आणि आशीर्वाद देण्याचे आवाहन केले आहे.

हेही वाचा :

Entertainment News Live Updates 3 October : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!

महत्त्वाच्या बातम्या

Lock Upp 2 Akanksha Chaudhary : 'महिन्यातून 4-5 वेळा शरीरसंबंध...' आर्थिक मदतीच्या नावाखाली प्रसिद्ध अभिनेत्रीसमोर घाणेरडी मागणी, म्हणाली..
'महिन्यातून 4-5 वेळा शरीरसंबंध...' आर्थिक मदतीच्या नावाखाली प्रसिद्ध अभिनेत्रीसमोर घाणेरडी मागणी, म्हणाली..
Crime Patrol Satish Naikode: 'क्राइम पेट्रोल' फेम अभिनेत्याची फसवणूक, घर देण्याच्या बहाण्याने 25 लाख लुटले, वडिलांचा मृत्यू, स्वत:ला संपवण्याचाही केला प्रयत्न
'क्राइम पेट्रोल' फेम अभिनेत्याची फसवणूक, घर देण्याच्या बहाण्याने 25 लाख लुटले, वडिलांचा मृत्यू, स्वत:ला संपवण्याचाही केला प्रयत्न
Subodh Bhave On Sai Tamhankar: 'सई ताम्हणकर इंडस्ट्रीत कितपत टिकेल, याबाबत मला शंका...'; सुबोध भावेनं स्पष्टीकरणासह दिलं कारण, नेमकं काय म्हणाला?
'सई ताम्हणकर इंडस्ट्रीत कितपत टिकेल, याबाबत मला शंका...'; सुबोध भावेनं स्पष्टीकरणासह दिलं कारण, नेमकं काय म्हणाला?
Kushal Badrike On Female Character In Chala Hawa Yeu Dya: 'पुरुषप्रधान देशात स्त्री भूमिका करून, माझं घर चाललं, ही मोठी गोष्ट...'; 'चला हवा येऊ द्या'बाबत नेमकं काय म्हणाला कुशल बद्रिके?
'पुरुषप्रधान देशात स्त्री भूमिका करून, माझं घर चाललं, ही मोठी गोष्ट...'; नेमकं काय म्हणाला कुशल बद्रिके?

व्हिडीओ

Congress On Sunetra Pawar : गूंगी गुडियाचा टोला, वाद विकोपाला | Special Report ABP Majha
Ketan Agarwal Case Update : सियाचं कांड, लग्नाआधीच गुप्तहेरांना डिमांड | Special Report ABP Majha
Sanjay Raut Delhi PC : बिहारमधील निकालावरून संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल
Prashant Kishor Bankipur Bypoll Election : बांकीपूर पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव अहंकारामुळे झाला
Tukaram Mundhe News: तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jalgaon Crime News : चारित्र्यावर संशय, नवऱ्यानं संतापात पत्नीच्या अंगावर दारू ओतली अन्....; जळगाव जिल्ह्यातील पाचोरा हादरलं!
चारित्र्यावर संशय, नवऱ्यानं संतापात पत्नीच्या अंगावर दारू ओतली अन्....; जळगाव जिल्ह्यातील पाचोरा हादरलं!
काँग्रेसकडून गुंगी गुडिया म्हणत टीका, पृथ्वीराज चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, अर्थातच सुनेत्रा पवारांकडून कृतीतून उत्तर मिळेल
काँग्रेसकडून गुंगी गुडिया म्हणत टीका, पृथ्वीराज चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, अर्थातच सुनेत्रा पवारांकडून कृतीतून उत्तर मिळेल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 ऑगस्ट 2026 | मंगळवार
अहिल्यानगरच्या शेवगावमध्ये बिबट्याची दहशत; नर-मादीसह पिल्लांचा वावर, शेतात जायचं कसं? ग्रामस्थ काळजीत
अहिल्यानगरच्या शेवगावमध्ये बिबट्याची दहशत; नर-मादीसह पिल्लांचा वावर, शेतात जायचं कसं? ग्रामस्थ काळजीत
ट्विटरवरुन पोस्ट हटवा, माफी मागा; सुनेत्रा पवारांवरील टीकेनंतर राष्ट्रवादी आक्रमक, तटकरे-पटेलांचा काँग्रेसला इशारा
ट्विटरवरुन पोस्ट हटवा, माफी मागा; सुनेत्रा पवारांवरील टीकेनंतर राष्ट्रवादी आक्रमक, तटकरे-पटेलांचा काँग्रेसला इशारा
लोकलमध्ये हरवलेली बॅग परत; पोलिसांची कामगिरी, तीन वर्षांनी तपास, प्रवाशाला मिळालं 271 ग्रॅम सोनं
लोकलमध्ये हरवलेली बॅग परत; पोलिसांची कामगिरी, तीन वर्षांनी तपास, प्रवाशाला मिळालं 271 ग्रॅम सोनं
BLOG : खड्डेमुक्त रस्त्यांची उद्दिष्टपूर्ती होत नाही तोपर्यंत वाहनांवरील दंडात्मक कारवाई ला स्थगिती द्या !
BLOG : खड्डेमुक्त रस्त्यांची उद्दिष्टपूर्ती होत नाही तोपर्यंत वाहनांवरील दंडात्मक कारवाई ला स्थगिती द्या !
तानाजी सावंत अन् मोटेंचे समर्थक भिडले; धाराशिवमध्ये महायुतीत राडा, शिवसेना-राष्ट्रवादी भिडले, 10 गाड्या फोडल्या
तानाजी सावंत अन् मोटेंचे समर्थक भिडले; धाराशिवमध्ये महायुतीत राडा, शिवसेना-राष्ट्रवादी भिडले, 10 गाड्या फोडल्या
Embed widget