(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Masterchef India 7 : 'ठेचा क्वीन' ते 'मास्टर शेफ'; महाराष्ट्राच्या सुवर्णा बागुल तिसऱ्या क्रमांकावर; जाणून घ्या त्यांच्याबद्दल...
Suvarna Bagul : 'मास्टरशेफ इंडिया 7'चा नयनज्योती विजेता झाला असला तरी महाराष्ट्राच्या सुवर्णा बागुल यांनी तिसरा क्रमांक पटकावला आहे.
Masterchef India 7 Suvarna Bagul : 'मास्टरशेफ इंडिया 7' (Masterchef India 7) या लोकप्रिय कार्यक्रमाचा नयनज्योती सेकिया (Nayanjyoti Saikia) विजेता ठरला आहे. तर महाराष्ट्राच्या सुवर्णा बागुल (Suvarna Bagul) यांनी तिसरा क्रमांक पटकावला आहे.
सुवर्णा बागुलने मानले चाहत्यांचे चाहत्यांचे आभार (Suvarna Bagul Post)
सुवर्णा यांनी 'मास्टरशेफ इंडिया 7'मध्ये तिसरा क्रमांक पटकावल्यानंतर त्यांना पाच लाख रुपयांचा चेक आणि मेडल देण्यात आलं आहे. त्यानंतर त्यांनी खास पोस्ट शेअर करत चाहत्यांचे आणि त्यांना पाठिंबा देणाऱ्या शेफचे आभार मानले आहेत. त्यांनी लिहलं आहे,"अभिमानास्पद...खूप खूप अभिनंदन गूफबॉल उर्फ नयनज्योती... मला पाठिंबा देणाऱ्या सर्व शेफचे आणि चाहत्यांचे खूप खूप आभार. तुमच्यामुळे हे शक्य झालं आहे".
View this post on Instagram
सुवर्णा बागुल यांनी 'मास्टरशेफ इंडिया 7'मध्ये महाराष्ट्रातील विविध पदार्थ बनवले आहेत. एकंदरीत आंतरराष्ट्रीय पातळीवर त्या महाराष्ट्रातील पाककलेचं प्रतिनिधित्व करताना दिसून आल्या. 'मास्टरशेफ इंडिया 7'मुळे सुवर्णा यांना 'ठेचा क्वीन' ही नवी ओळख मिळाली आहे. 'मास्टरशेफ इंडिया 7'च्या निवडप्रक्रियेदरम्यान टॉप 36 होमकुक्समधून सुवर्णाच्या 'महाथाळी'ची निवड झाली होती. या थाळीत महाराष्ट्रीयन पदार्थांचा समावेश होता.
सुर्वणाचं स्वप्न साकार
सुवर्णा बागुल एका मुलाखतीत म्हणाल्या,"आयुष्यात काहीतरी केलं पाहिजे असं मला नेहमी वाटायचं. 'मास्टरशेफ इंडिया'मध्ये सहभागी होण्याचं माझं स्वप्न होतं. या कार्यक्रमात स्पर्धक म्हणून सहभागी होण्याची तयारी मी आधीपासूनच केली होती. वेगवेगळे कूकिंग शो मी पाहिले. संयम ठेवला आणि तयारी करत राहिले. त्यानंतर 'मास्टरशेफ इंडिया 7'साठी ऑडिशन दिली आणि माझी निवड झाली". अशाप्रकारे सुवर्णाचं बागुल यांचं स्वप्न साकार झालं आहे.
'मास्टरशेफ इंडिया 7'चा विजेता नयनज्योती सेकिया! (Nayanjyoti Saikia Masterchef India 7 Winner)
'मास्टरशेफ इंडिया 7'चा विजेता नयनज्योती सेकिया ठरला आहे. नयनज्योतीला 25 लाख रुपये, ट्रॉफी आणि गोल्डन शेफचा कोट देण्यात आला आहे. 'मास्टरशेफ इंडिया'चं हे पर्व खूपच खास होतं. या पर्वातील स्पर्धकांनी वेगवेगळे पदार्थ बनवून परिक्षकांना खूश केलं त्यांनी बनवलेले पदार्थ चाहत्यांच्या पसंतीस उतरले.
संबंधित बातम्या