एक्स्प्लोर
'हे राम... नथुराम...!'च्या प्रयोगाला नितेश राणेंचा विरोध, शरद पोंक्षेंचा फेसबुकवर संताप
मुंबई: 'हे राम... नथुराम...!' नाटकाच्या प्रयोगांना नितेश राणे यांनी विरोध दर्शवल्याने नाटकाचे निर्माते, लेखक, दिग्दर्शक, अभिनेते व शिवसेना उपनेते शरद पोंक्षे यांनी संताप व्यक्त केला आहे. त्यांनी आपला संताप फेसबुकवरुन व्यक्त केला आहे.
11 जानेवारी ते 15 जानेवारी दरम्यान, कोकणातील कुडाळ कणकवली आणि मालवणमध्ये 'हे राम...नथुराम...!' या नाटकाचे आयोजन करण्यात आलं होतं. नाटकाच्या प्रयोगासाठी शरद पोंक्षे कणकवलीला पोहचण्यापूर्वीच आमदार नितेश राणे यांनी विरोध केल्याचा दावा शरद पोंक्षेंनी आपल्या फेसबुक पोस्टच्या माध्यमातून केला आहे. तसेच नाट्यगृहाच्या स्थानिक व्यवस्थापकांना धमकावून तिकीट बुकिंग थांबवले. शिवाय राणेंच्या दहशतीमुळे शहरातील इतर नाट्यगृहांनीही त्यांना प्रयोगास नकार दिल्याचे पोंक्षे यांनी आपल्या फेसबुक पोस्टच्या माध्यमातून सांगितलं आहे.
यामुळे शरद पोंक्षे यांनी शिवसेना आमदार वैभव नाईक आणि स्थानिक पोलिसांच्या मदतीने खुल्या मैदानात प्रयोग सुरु केला. पण यावेळीही नितेश राणे यांच्या समर्थकांसह काही काँग्रेस कार्यकर्त्यांनी विरोध केल्याने पोंक्षे यांनी आपला संताप सोशल मीडियातून व्यक्त केला आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement