एक्स्प्लोर

Marathi Serial Updates : छोट्या पडद्यावर आणखी एक नवी मालिका, आषाढी एकादशीच्या निमित्ताने शेअर केला फर्स्ट लूक

Marathi Serial Updates Zee Marathi Announce New Serial : षाढी एकादशीच्या निमित्ताने झी मराठी वाहिनीने आपल्या नव्या मालिकेची घोषणा केली आहे. आषाढीच्या निमित्ताने या नव्या मालिकेचा फर्स्ट लूक लाँच केला आहे.

Marathi Serial Updates Zee Marathi Announce New Serial : छोट्या पडद्यावर सध्या नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. टीआरपीच्या शर्यतीत आघाडीवर राहण्यासाठी सगळ्याच वाहिन्यांकडून प्रयत्न सुरू आहेत. आषाढी एकादशीच्या निमित्ताने 'झी मराठी वाहिनी'ने (Zee Marathi) आपल्या नव्या मालिकेची घोषणा केली आहे. आषाढीच्या निमित्ताने या नव्या मालिकेचा फर्स्ट लूक लाँच केला आहे. 

टीआरपीच्या शर्यतीत काहीसं मागे पडलेल्या झी मराठीने पुन्हा एकदा अव्वल स्थान मिळवण्यासाठी कंबर कसली आहे. मागील काही महिन्यात झी मराठीवर नव्या मालिकांचा धडाका सुरू आहे. आयपीएलच्या काळातही झी मराठीने नव्या मालिका लाँच करण्याचे धाडस दाखवले आणि प्रेक्षक खेचण्यास यश मिळवले. ‘शिवा’, ‘पारू’, 'पुन्हा कर्तव्य आहे' ‘लाखात एक आमचा दादा’ आदी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आल्या आहेत. या मालिकांना सध्या चांगला प्रतिसाद मिळत आहे. आता आषाढी एकादशीच्या निमित्ताने 'झी मराठी'ने नवीन मालिकेची घोषणा केली आहे.

नव्या मालिकेचे नाव काय?

आषाढी एकादशीच्या निमित्ताने झी मराठी वाहिनीने आपल्या नव्या मालिकेची पहिली झलक प्रेक्षकांसोबत शेअर केली आहे. 'सावळ्याची जणू सावली'असे या नव्या मालिकेचे नाव आहे. ही मालिका विठ्ठलाच्या भक्तीवर आधारीत असल्याचे दिसते. या टीझरमध्ये एक मुलगी पांडुरंगाच्या भक्तीत तल्लीन होऊन मोठ्या भक्तीभावाने आराधना करत असल्याचे दिसते. 

व्हिडीओ सोबत  “पांडुरंगाची परमभक्त ती, सुरेल तिचा गळा, तुम्हालाही लागेल तिच्या गोड आवाजाचा लळा… ‘सावळ्याची जणू सावली’ ही नवीन मालिका येतेय लवकरच आपल्या भेटीला” अशी कॅप्शन देण्यात  आली आहे.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Zee Marathi (@zeemarathiofficial)

प्रेक्षकांच्या भेटीला कधी येणार?

ही नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला कधी येणार, याची उत्सुकता लागली आहे. मात्र, या मालिकेच्या प्रसारणाला आणखी काही अवधी असणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. आषाढी एकादशीच्या चांगल्या दिवसाच्या निमित्ताने मालिकेची घोषणा करण्यात आली असल्याचेही सूत्रांनी सांगितले. झी मराठीवर आता या नव्या मालिकेसाठी कोणता टाईमस्लॉट दिला जाणार, याची उत्सुकता प्रेक्षकांना लागली आहे. 

इतर महत्त्वाची बातमी :

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

माझ्या जीवाला काही झाल्यास आमदार रवी राणा जबाबदार; संकल्प शेतकरी संघटनेच्या अध्यक्षांची पोलिसांत तक्रार
माझ्या जीवाला काही झाल्यास आमदार रवी राणा जबाबदार; संकल्प शेतकरी संघटनेच्या अध्यक्षांची पोलिसांत तक्रार
Job Update: कोकण रेल्वेत नोकरीची सुवर्णसंधी, 10 वी पास ते पदवीधरालाही करता येणार अर्ज, जाणून घ्या सर्व तपशील
कोकण रेल्वेत नोकरीची सुवर्णसंधी, 10 वी पास ते पदवीधरालाही करता येणार अर्ज, जाणून घ्या सर्व तपशील
शॉकिंग! राक्षसी कृत्य; युवकाच्या प्रायव्हेट पार्टमध्ये मिरची टाकून मारहाण, व्हिडिओ व्हायरल
शॉकिंग! राक्षसी कृत्य; युवकाच्या प्रायव्हेट पार्टमध्ये मिरची टाकून मारहाण, व्हिडिओ व्हायरल
महाराजांचा  पुतळा पडला म्हणजे हे भ्रष्टाचाऱ्यांच्या  सरकारचे पाप : विजय वडेट्टीवार
महाराजांचा  पुतळा पडला म्हणजे हे भ्रष्टाचाऱ्यांच्या  सरकारचे पाप : विजय वडेट्टीवार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Bhagwan Rampure on Chhatrapati Shivaji Maharaj Statue : विख्यात शिल्पकारांकडून ऐका दुर्घटनेचं कारणRamdas Athawale Poem On Ram Kadam : घाटकोपरच्या दहीहंडीत आठवलेंची राम कदमांवर कविताGautami Patil Dance : पाव्हणं जेवलं काय... मागाठाण्यात गौतमी पाटीलचा कडक डान्सDevendra Fadnavis Speech DahiHandi :कालिदास कोळंबकरांचं अभिनंदन, गोविंदांचं कौतुक

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
माझ्या जीवाला काही झाल्यास आमदार रवी राणा जबाबदार; संकल्प शेतकरी संघटनेच्या अध्यक्षांची पोलिसांत तक्रार
माझ्या जीवाला काही झाल्यास आमदार रवी राणा जबाबदार; संकल्प शेतकरी संघटनेच्या अध्यक्षांची पोलिसांत तक्रार
Job Update: कोकण रेल्वेत नोकरीची सुवर्णसंधी, 10 वी पास ते पदवीधरालाही करता येणार अर्ज, जाणून घ्या सर्व तपशील
कोकण रेल्वेत नोकरीची सुवर्णसंधी, 10 वी पास ते पदवीधरालाही करता येणार अर्ज, जाणून घ्या सर्व तपशील
शॉकिंग! राक्षसी कृत्य; युवकाच्या प्रायव्हेट पार्टमध्ये मिरची टाकून मारहाण, व्हिडिओ व्हायरल
शॉकिंग! राक्षसी कृत्य; युवकाच्या प्रायव्हेट पार्टमध्ये मिरची टाकून मारहाण, व्हिडिओ व्हायरल
महाराजांचा  पुतळा पडला म्हणजे हे भ्रष्टाचाऱ्यांच्या  सरकारचे पाप : विजय वडेट्टीवार
महाराजांचा  पुतळा पडला म्हणजे हे भ्रष्टाचाऱ्यांच्या  सरकारचे पाप : विजय वडेट्टीवार
नेपाळ बस दुर्घटनेतील जखमी प्रवासी मुंबईत आले, फडणवीसांनी घेतली भेट;  तिघांवर आज शस्त्रक्रिया
नेपाळ बस दुर्घटनेतील जखमी प्रवासी मुंबईत आले, फडणवीसांनी घेतली भेट; तिघांवर आज शस्त्रक्रिया
पगाराएवढंच काम करा, कामानंतर मॅनेजर फोनही करू शकत नाही!, या देशानं थेट कायदाच केला..
काम को मारो गोली, पण..! कामानंतर ऑफिसच्या कामांना देता येतो नकार?, या सरकारनं थेट कायदाच केलाय
Maharashtra Politics : नगरमध्ये मोठा राजकीय भूंकप? भाजपचा बडा नेता तुतारी हाती घेणार? शरद पवारांसोबत एकाच गाडीत केला प्रवास
नगरमध्ये मोठा राजकीय भूंकप? भाजपचा बडा नेता तुतारी हाती घेणार? शरद पवारांसोबत एकाच गाडीत केला प्रवास
खुशखबर! ॲपलकडून यंदाच्या वर्षी भारतात 6 लाख नोकऱ्या, महिलांची होणार मोठी भरती
खुशखबर! ॲपलकडून यंदाच्या वर्षी भारतात 6 लाख नोकऱ्या, महिलांची होणार मोठी भरती
Embed widget