एक्स्प्लोर

Marathi Serial : 'महादेवांचं वीरभद्र रुप', 'उदे गं अंबे...कथा साडेतीन शक्तिपीठांची’ मालिकेचा अध्याय

Marathi Serial : 'उदे गं अंबे...कथा साडेतीन शक्तिपीठांची’ मालिकेत महादेवांचं वीरभद्र रुप पाहायला मिळणार आहे.

Marathi Serial : स्टार प्रवाहवर (Star Pravah) दुर्गाष्टमीच्या शुभमुहूर्तावर सुरु झालेल्या ‘उदे गं अंबे...कथा साडेतीन शक्तिपीठांची’ मालिकेला प्रेक्षकांचं भरभरुन प्रेम मिळत आहे. महाराष्ट्राची श्रद्धास्थानं असलेल्या साडेतीन शक्तीपिठांची अभुतपूर्व गोष्ट भव्यदिव्य मालिकेच्या माध्यमातून सादर करण्याचा स्टार प्रवाह वाहिनीचा प्रयत्न आहे. शक्तीरुप असलेल्या देवी सती आणि शिवशंकराच्या कथेपासून या मालिकेची सुरुवात झाली आहे. महादेव आणि सती यांचा विवाहसोहळा नुकताच प्रेक्षकांनी अनुभवला. मालिकेच्या यापुढील भागात शिवशंकरांचा वीरभद्र अवतार पाहायला मिळणार आहे. 

सतीचे पिता अर्थात दक्षराजांनी यज्ञासाठी सर्व देवतांना आमंत्रित केले मात्र महादेवांना आमंत्रित केले नाही. महादेवांचा अपमान सहन न झाल्यामुळे देवी सतीने अग्नीकुंडात उडी घेऊन देहत्याग केला. भगवान शिवशंकरांना हे कळताच ते क्रोधीत झाले आणि त्यांनी वीरभद्र अवतार धारण केला. 

दक्षराजाचा यज्ञ सफल होऊ न देण्यासाठी शिवशंकरांनी वीरभद्र अवतार धारण केल्याची माहिती पुराणात आढळते. वीरभद्राचं हे रौद्ररुप सृष्टीचा विनाश करत होतं. सृष्टीचा विनाश कसा रोखला गेला आणि साडे तीन शक्तिपीठांची निर्मिती कशी झाली? याची उत्कंठावर्धक गोष्ट उदे गं अंबे मालिकेच्या यापुढील भागांमधून उलगडणार आहे. 

देवदत्त नागेने काय म्हटलं?

वीरभद्र या अवताराविषयी सांगताना देवदत्त नागेने म्हटलं की, ‘वीरभद्र हे महादेवांचं रुप आहे. सतीपुढे जसे ते भोळेसाम होते अगदी त्याउलट तिचा विरह सहन न झाल्यामुळे त्यांनी रौद्रावतारही धारण केला. अभिनेता म्हणून हे रुप साकारणं माझ्यासाठी अतिशय आव्हानात्मक होतं. महादेवांपुढे नतमस्तक होऊन मी हे रुप साकारलं. 

पुढे त्याने म्हटलं की, 'वीरभद्राचं अक्राळविक्राळ रुप साकारण्यासाठी दोन अडीच तास मेकअपसाठी लागत होते. नखशिखांत नीळ्या रंगात मी दोन दिवस वावरत होतो. बरेच ॲक्शन सीन्स असल्यामुळे पोटतिडकीने मोठ्या आवाजात संवाद बोलावे लागत होते. महादेवांनीच माझ्याकडून हे करवून घेतलं असं मी म्हणेन.’ तेव्हा न चुकता पहा उदे गं अंबे...कथा साडेतीन शक्तिपीठांची सायंकाळी ६.३० वाजता फक्त स्टार प्रवाहवर.'

View this post on Instagram
 
A post shared by Star Pravah (@star_pravah)

ही बातमी वाचा : 

Salman Khan Security : सलमान खानच्या सुरक्षेत पुन्हा वाढ, Y+ सुरक्षाही कडक; घरापासून ते फार्म हाऊसपर्यंत सगळीकडे पोलीस तैनात

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur Uttar Vidhan Sabha : कोल्हापूर उत्तरमध्ये महायुतीचं ठरलं, मात्र महाविकास आघाडीचं अजूनही आडलं; विद्यमान काँग्रेस आमदारांची चर्चाच नाही!
कोल्हापूर उत्तरमध्ये महायुतीचं ठरलं, मात्र महाविकास आघाडीचं अजूनही आडलं; विद्यमान काँग्रेस आमदारांची चर्चाच नाही!
Maharashtra vidhan sabha election 2024: फडणवीस-शिंदेंचे ग्रह प्रबळ, उद्धव ठाकरेंचं संमिश्र ग्रहमान, ज्योतिषाचार्य पांडव गुरुजींच्या मते राज्यात कोणाची सत्ता येणार?
फडणवीस-शिंदेंचे ग्रह प्रबळ, उद्धव ठाकरेंचं संमिश्र ग्रहमान, ज्योतिषाचार्य पांडव गुरुजींच्या मते राज्यात कोणाची सत्ता येणार?
विधानसभेपूर्वीच बंडोबांना केले थंड, 27 जणांना महामंडळावर संधी; प्रशांत परिचाकांनाही अध्यक्षपद
विधानसभेपूर्वीच बंडोबांना केले थंड, 27 जणांना महामंडळावर संधी; प्रशांत परिचाकांनाही अध्यक्षपद
मोदींच्या मंत्रिमंडळ बैठकीत 6 पिकांसाठी मोठे निर्णय; गव्हाच्या हमीभावात 150 तर मोहरीच्या 300 रुपयांची वाढ
मोदींच्या मंत्रिमंडळ बैठकीत 6 पिकांसाठी मोठे निर्णय; गव्हाच्या हमीभावात 150 तर मोहरीच्या 300 रुपयांची वाढ
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Vijay Shivtare on Amit Shah: आम्ही नसतो तर तुम्ही सत्तेत कसे आले असते? 'त्यागा'वर शिवतारेंचं भाष्यMahadev Jankar Mahayuti Exit : विधानसभेचं बिगुल वाजताच महादेव जानकरांची महायुतीतून एक्झिटMahadev Jankar Mahayuti Exit : रासप ताकद वाढवणार स्वबळावर लढण्यासाठी महायतीतून जानकरांची एक्झिटABP Majha Headlines : 3 PM : 16 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur Uttar Vidhan Sabha : कोल्हापूर उत्तरमध्ये महायुतीचं ठरलं, मात्र महाविकास आघाडीचं अजूनही आडलं; विद्यमान काँग्रेस आमदारांची चर्चाच नाही!
कोल्हापूर उत्तरमध्ये महायुतीचं ठरलं, मात्र महाविकास आघाडीचं अजूनही आडलं; विद्यमान काँग्रेस आमदारांची चर्चाच नाही!
Maharashtra vidhan sabha election 2024: फडणवीस-शिंदेंचे ग्रह प्रबळ, उद्धव ठाकरेंचं संमिश्र ग्रहमान, ज्योतिषाचार्य पांडव गुरुजींच्या मते राज्यात कोणाची सत्ता येणार?
फडणवीस-शिंदेंचे ग्रह प्रबळ, उद्धव ठाकरेंचं संमिश्र ग्रहमान, ज्योतिषाचार्य पांडव गुरुजींच्या मते राज्यात कोणाची सत्ता येणार?
विधानसभेपूर्वीच बंडोबांना केले थंड, 27 जणांना महामंडळावर संधी; प्रशांत परिचाकांनाही अध्यक्षपद
विधानसभेपूर्वीच बंडोबांना केले थंड, 27 जणांना महामंडळावर संधी; प्रशांत परिचाकांनाही अध्यक्षपद
मोदींच्या मंत्रिमंडळ बैठकीत 6 पिकांसाठी मोठे निर्णय; गव्हाच्या हमीभावात 150 तर मोहरीच्या 300 रुपयांची वाढ
मोदींच्या मंत्रिमंडळ बैठकीत 6 पिकांसाठी मोठे निर्णय; गव्हाच्या हमीभावात 150 तर मोहरीच्या 300 रुपयांची वाढ
धक्कादायक! 11 वर्षीय मुलावर 9 जणांकडून सामूहिक अत्याचार; आईच्या फिर्यादीनंतर गुन्हा दाखल
धक्कादायक! 11 वर्षीय मुलावर 9 जणांकडून सामूहिक अत्याचार; आईच्या फिर्यादीनंतर गुन्हा दाखल
Baramati Vidhan Sabha : बारामतीमध्ये शरद पवारांचा भिडू निश्चित? काका विरुद्ध पुतण्या 'टशन' होणार?? युगेंद्र पवार म्हणाले तरी काय?
बारामतीमध्ये शरद पवारांचा भिडू निश्चित? काका विरुद्ध पुतण्या 'टशन' होणार?? युगेंद्र पवार म्हणाले तरी काय?
बाबा सिद्दिकींच्या हत्येनंतर चर्चेत आलेला गँगस्टार लॉरेन्स बिष्णोई कोण?; NIA ने काय म्हटलंय, सध्या कुठे, किती गुन्हे
बाबा सिद्दिकींच्या हत्येनंतर चर्चेत आलेला गँगस्टार लॉरेन्स बिष्णोई कोण?; NIA ने काय म्हटलंय, सध्या कुठे, किती गुन्हे
DA Hike : केंद्राच्या कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड होणार, महागाई भत्ता वाढवण्याचा निर्णय, केंद्राच्या कॅबिनेटची मंजुरी
मोठी बातमी, महागाई भत्ता वाढवण्याचा केंद्राचा निर्णय, लाखो कर्मचाऱ्यांना दिवाळी गिफ्ट
Embed widget