Marathi Serial Holi 2023 : आला होळीचा सण लई भारी... मराठी मालिकांमध्ये पाहायला मिळणार होळी आणि धुलिवंदनाची धमाल; कलाकारांनी केली रंगांची उधळण
Marathi Serial : मराठी मालिकांमध्ये होळी आणि धुलिवंदनाचा जल्लोष पाहायला मिळणार आहे.
Marathi Serial Holi 2023 : रंगांची मनसोक्त उधळण करून आपापसातले सारे हेवेदावे विसरायला लावणारा सण म्हणजे होळी (Holi 2023). त्यामुळे आता मराठी मालिकांमध्ये (Marathi Serial) होळी आणि धुलिवंदनाचा जल्लोष पाहायला मिळणार आहे.
'ठरलं तर मग' या मालिकेत सायली आणि अर्जुनचा हा लग्नानंतरचा पहिलाच सण आहे. त्यामुळे सुभेदार कुटुंबात रितीरिवाजाप्रमाणे होळीची पारंपरिक पूजा होणार आहे. यासोबतच धुलिवंदनाला रंगांची उधळणही होणार आहे. सगळीकडे जल्लोषाचं वातावरण असलं तरी सायली आणि अर्जुन मात्र आपल्याला कुणी रंग लावणार नाही याची खबरदारी घेताना दिसणार आहेत. इतकी काळजी घेऊनही या दोघांवर अक्षरश: रंगांची बरसात होते. अर्जुन आणि सायली रंगात कसे रंगून गेलेत हे मालिकेच्या येत्या होळी स्पेशल भागांमध्ये पाहायला मिळेल.
'मुरांबा' मालिकेत काय पाहायला मिळणार?
'मुरांबा' मालिकेतही होळीचा जल्लोष पाहायला मिळणार आहे. पहिल्या होळीचा पहिला रंग अक्षयला रमाला लावायचा आहे. रमासोबत रंग खेळण्याची स्वप्न पाहणारा अक्षय योगायोगाने रेवाला पहिला रंग लावतो. रेवा मनातून खुष होते खरी. मात्र माझ्या प्रेमावर फक्त रमाचा हक्क आहे असं अक्षय तिला ठणकावून सांगतो. त्यामुळे 'मुरांबा' मालिकेतला धुलिवंदनाचा सण खऱ्या अर्थाने रमा आणि अक्षयसाठी खास ठरणार आहे.
ठरलं तर मग आणि मुरांबा प्रमाणेच 'ठिपक्यांची रांगोळी', 'लग्नाची बेडी', 'अबोली' आणि 'तुझेच मी गीत गात आहे', 'लवंगी मिरची' या मालिकेतही होळी आणि धुलिवंदनाचा उत्साह पाहायला मिळणार आहे. मराठी मालिकांचे होळी विशेष भाग पाहण्याची मालिकाप्रेमींना चांगलीच उत्सुकता आहे.
View this post on Instagram
'जिवाची होतिया काहिली' मालिकेतील कलाकरांनी अनाथाश्रमातील मुलांसोबत साजरी केली होळी आणि रंगपंचमी
'जिवाची होतिया काहिली' या मालिकेत राज हंचनाळे आणि प्रतीक्षा शिवणकर मुख्य भूमिकेत आहेत. यंदाचा होळीचा सण त्यांनी वेगळ्या पद्धतीने साजरा केला आहे. 'अनंत खुशिया' या अनाथ आश्रमातील मुलासोबत त्यांनी यंदीची होळी साजरी केली आहे. आश्रमातील मुलांसोबत त्यांनी वेळ घालवला आहे. अनाथाश्रमातील मुलांसोबत होळी आणि रंगपंचमी साजरी केल्याने चाहते राज आणि प्रतीक्षाचं कौतुक करत आहेत.
संबंधित बातम्या