![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Telly Masala : “ढोलकीच्या तालावर” च्या मंचावर प्रिया बेर्डे यांची ठसकेबाज लावणी ते प्रवीण तरडे आणि मंगेश देसाई यांनी केली 'धर्मवीर-2' ची घोषणा; जाणून घ्या मनोरंजन विश्वासंबंधित बातम्या...
Telly Masala : मराठी मनोरंजन विश्वासंबंधित बातम्या जाणून घ्या...
![Telly Masala : “ढोलकीच्या तालावर” च्या मंचावर प्रिया बेर्डे यांची ठसकेबाज लावणी ते प्रवीण तरडे आणि मंगेश देसाई यांनी केली 'धर्मवीर-2' ची घोषणा; जाणून घ्या मनोरंजन विश्वासंबंधित बातम्या... marathi movie telly masala marathi serial latest update Rujuta Deshmukh share post to priya berde lavani performance Telly Masala : “ढोलकीच्या तालावर” च्या मंचावर प्रिया बेर्डे यांची ठसकेबाज लावणी ते प्रवीण तरडे आणि मंगेश देसाई यांनी केली 'धर्मवीर-2' ची घोषणा; जाणून घ्या मनोरंजन विश्वासंबंधित बातम्या...](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/08/09/823b9192c9d370c499f4a64718e3bef61691581708162259_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Telly Masala : मराठी मनोरंजनसृष्टी पुन्हा बहरली आहे. वेगवेगळ्या दर्जाची नाटके (Drama), मालिका (Serial) आणि चित्रपट (Movies) प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. जगभरातील प्रेक्षकांना मराठी कलाकृती आवडत आहेत. पण कलाकाराचं वैयक्तिक आयुष्य कसं आहे, मालिका आणि सिने विश्वात काय घडामोडी घडत आहेत हे जाणून घेण्याची देखील प्रेक्षकांना उत्सुकता आहे. जाणून घ्या मराठी मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या...
Priya Bapat: 'रंगभूमीवर पुनरागमन करण्याचा माझा निर्णय...'; प्रिया बापटनं शेअर केलेल्या व्हिडीओनं वेधलं नेटकऱ्यांचे लक्ष
Priya Bapat: मालिका, चित्रपट, वेब सीरिज आणि नाटकांमधून प्रेक्षकांच्या भेटीस येणारी अभिनेत्री प्रिया बापट (Priya Bapat) ही तिच्या अभिनयानं नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकत असते. प्रियानं रंगभूमीवर पुनरागमन केलं आहे. प्रिया आणि उमेश कामत यांचे ‘जर तरची गोष्ट’ हे नाटक सध्या प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. या नाटाकच्या शुभारंभाच्या प्रयोगाला प्रेक्षकांची पसंती मिळाली. नुकताच प्रियानं एक खास व्हिडीओ केला आहे. या व्हिडीओमध्ये ती नाटकाची रिहर्सल करताना दिसत आहे.
सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा
Rujuta Deshmukh: "माझं आणि एक्सप्रेस वेचं नातं घनिष्ट होत चाललंय…"; ऋजुता देशमुखनं मुंबई-पुणे एक्सप्रेस वेबाबत शेअर केली नवी पोस्ट
Rujuta Deshmukh: अभिनेत्री ऋजुता देशमुखनं (Rujuta Deshmukh) काही दिवसांपूर्वी मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवरील टोलबाबत एक पोस्ट शेअर केली होती. तिच्या या पोस्टनं नेटकऱ्यांचे लक्ष वेधले होते. ऋजुतानं या पोस्टमध्ये नितीन गडकरींना (Nitin Gadkari) टॅग देखील केले होते. आता ऋजुतानं मुंबई-पुणे एक्सप्रेस वेबाबत एक नवी पोस्ट शेअर केली आहे.
सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा
Priya Berde: “ढोलकीच्या तालावर” च्या मंचावर प्रिया बेर्डे यांची ठसकेबाज लावणी; व्हिडीओ व्हायरल
Priya Berde: “ढोलकीच्या तालावर" (Dholkichya Talavar) हा कार्यक्रम गेल्या काही दिवसांपालून छोट्या पडद्यावरुन प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. या कार्यक्रमामध्ये विविध सेलिब्रिटी हजेरी लावत असतात. अभिनेत्री प्रिया बेर्डे (Priya Berde) यांनी नुकतीच या कार्यक्रमामध्ये हजेरी लावली. ढोलकीच्या तालावर या कार्यक्रमाचा एक व्हिडीओ नुकताच सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये प्रिया बेर्डे या लावणी सादर करताना दिसत आहेत.
सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा
Kiran Mane: 'दादांना अश्लील म्हणून का हिणवलं गेलं...'; किरण मानेंच्या पोस्टनं वेधलं लक्ष
Kiran Mane: अभिनेते किरण माने (Kiran Mane) यांनी अभिनेते दादा कोंडके यांच्याबाबत नुकतीच एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे. या पोस्टमध्ये किरण यांनी दादा कोंडके (Dada Kondke) यांच्या चित्रपटांचा उल्लेख केला आहे. 'जळजळीत परखड सत्य आपल्या अनेक सिनेमांमधून सांगणाऱ्या दादांना 'अश्लील' म्हणून का हिणवलं गेलं? हे मला आजपर्यंत कळलेलं नाय दोस्तांनो!' असं या पोस्टमध्ये किरण माने यांनी लिहिलं आहे.
सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा
Dharmaveer 2 : "उलगडणार साहेबांच्या हिंदुत्त्वाची गोष्ट..."; प्रवीण तरडे आणि मंगेश देसाई यांनी केली 'धर्मवीर-2' ची घोषणा
Dharmaveer 2 : मराठी चित्रपटांना सध्या प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. गेल्या काही दिवसांपासून अनेक मराठी चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहेत. अशातच आता एका नव्या मराठी चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे. धर्मवीर-2 (Dharmaveer 2) या चित्रपटाची घोषणा प्रवीण तरडे (Pravin Tarde) आणि मंगेश देसाई (Mangesh Desai) यांनी केली आहे. धर्मवीर या चित्रपटाला प्रेक्षकांची पसंती मिळाली. आता धर्मवीर-2 हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. धर्मवीर या चित्रपटामध्ये आनंद दिघे यांच्या जीवनात घडलेल्या घटना दाखवण्यात आल्या. आता धर्मवीर-2 या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)