Telly Masala : 'झिम्मा 2' गाजवतोय बॉक्स ऑफिस ते पूजा सावंतच्या 'मिस्ट्री मॅन'चा फोटो समोर; जाणून घ्या मनोरंजन विश्वासंबंधित बातम्या
Telly Masala : जाणून घ्या मराठी मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या...
Telly Masala : मराठी मनोरंजनसृष्टी पुन्हा बहरली आहे. वेगवेगळ्या दर्जाची नाटके (Drama), मालिका (Serial) आणि चित्रपट (Movies) प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. जगभरातील प्रेक्षकांना मराठी कलाकृती आवडत आहेत. पण कलाकाराचं वैयक्तिक आयुष्य कसं आहे, मालिका आणि सिने विश्वात काय घडामोडी घडत आहेत हे जाणून घेण्याची देखील प्रेक्षकांना उत्सुकता आहे. जाणून घ्या मराठी मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या...
Jhimma 2: झिम्मा-2 मध्ये सोनाली आणि मृण्मयी का नाहीत? हेमंत ढोमेनं सांगितलं कारण
Jhimma 2: 'झिम्मा' (Jhimma) या चित्रपटाच्या यशानंतर झिम्मा-2 (Jhimma 2) हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. झिम्मा-2 या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. या चित्रपटानं ओपनिंग-डेला कोट्यवधींची कमाई केली आहे. या चित्रपटाचं कथानक आणि चित्रपटामधील कलाकारांच्या अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. झिम्मा या चित्रपटामध्ये अभिनेत्री सोनाली कुलकर्णी आणि मृण्मयी गोडबोले यांनी देखील काम केलं होतं पण झिम्मा-2 या चित्रपटात या दोघींची भूमिका नाहीयेत. याचं कारण काय आहे? असा प्रश्न हेमंत ढोमेला एका मुलाखतीमध्ये विचारण्यात आला. यावेळी हेमंतनं दिलेल्या उत्तरानं अनेकांचे लक्ष वेधले आहे.
सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा
Pooja Sawant : गावच्या पोरांनी, रानाच्या मोरांनी,शिवारी साऱ्यांनी पाहिले नाsss, पूजा सावंतच्या 'मिस्ट्री मॅन'चा फोटो समोर!
Pooja Sawant : मराठी मनोरंजनसृष्टीतील 'कलरफुल' अभिनेत्री पूजा सावंतने (Pooja Sawant) 28 नोव्हेंबर 2023 रोजी जोडीदारासोबतचा फोटो शेअर करत चाहत्यांना आनंदाची बातमी दिली. पण या फोटोंमध्ये तिने जोडीदाराचा चेहरा लपवला होता. त्यामुळे पूजा सावंतचा होणारा नवरा कोण? हे जाणून घेण्याची चाहत्यांना उत्सुकता लागली होती. अखेर अभिनेत्रीने आज तिच्या जोडीदाराचा चेहरा चाहत्यांना दाखवला आहे. गावच्या पोरांनी, रानाच्या मोरांनी,शिवारी साऱ्यांनी पाहिले नाsss हे पूजाच्या 'निलकंठ मास्तर' या सिनेमातील 'अधीर मन झाले' गाण्याचे बोल आता खरे ठरले आहेत.
सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा
Aadesh Bandekar : आदेश बांदेकरांना कशी सून हवी? म्हणाले,"..तर मी महाराष्ट्राला सांगेल दार उघड"
Aadesh Bandekar : महाराष्ट्राचे लाडके भाऊजी आदेश बांदेकर (Aadesh Bandekar) आणि अभिनेत्री सुचित्रा बांदेकर (Suchitra Bandekar) यांचा लेक सोहम (Soham Bandekar) नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतो. सोहमने वडिलांच्या पाऊलावर पाऊल ठेवत मनोरंजनसृष्टीत पदार्पण केलं आहे. सोहम सोशल मीडियावर चांगलाच अॅक्टिव्ह असून सोशल मीडियाच्या माध्यमातून कशी बायको हवी याचा खुलासा केला आहे.
मराठमोळी अभिनेत्रीचा पार पडला साखरपुडा; सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव
सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा
Jhimma 2 : 'झिम्मा 2' गाजवतोय बॉक्स ऑफिस; पाच दिवसात केली बक्कळ कमाई
Jhimma 2 Box Office Collection Day 5 : 'झिम्मा 2' (Jhimma 2) हा सिनेमा पाच दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आला असून या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर चांगलाच धमाका केला आहे. 'झिम्मा 2' हा सिनेमा बॉक्स ऑफिस गाजवत आहे. रिलीजच्या पाच दिवसात या सिनेमाने बक्कळ कमाई केली आहे.