एक्स्प्लोर

TMKOC : 'तारक मेहता का उल्टा चष्मा'मधून आणखी एका अभिनेत्याची एक्झिट, 'आत्माराम भिडे' मालिका सोडणार? दयाबेनच्या परतण्यावरही प्रश्नचिन्ह कायम

Taarak Mehta Ka Ooltah Chashmah : 'मिस्टर भिडे' म्हणजेच मंदार चांदवडकर तारक मेहता का उल्टा चष्मा मालिका सोडणार असल्याची चर्चा रंगली आहे.

Taarak Mehta Ka Ooltah Chashmah Cast : तारक मेहता का उल्टा चष्मा ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे. एक दशकाहून अधिक काळ ही मालिका प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. गेल्या काही वर्षात या मालिकेतील अनेक कलाकारांनी एक-एक करुन शोला राम-राम केला आहे. आता या मालिकेतील आणखी एक महत्त्वाचा कलाकार शो सोडणार असल्याची चर्चा रंगली आहे. काही दिवसांपूर्वी शरद सांकला म्हणजे अब्दुल मालिका सोडणार असल्याची अफवा उडाली होती. आता भिडे मालिका सोडणार असल्याचं बोललं जात आहे. 

'तारक मेहता का उल्टा चष्मा'मधून आणखी एका अभिनेत्याची एक्झिट?

तारक मेहता का उल्टा चष्मा (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) मालिकेमध्ये आत्माराम तुकाराम भिडे ही भूमिका साकारणारा अभिनेता मंदार चांदवडकर मालिका सोडणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. गेल्या 16 वर्षांपासून तारक मेहता का उल्टा चष्मा मालिका प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. गेल्या काही काळात अनेक कलाकारांनी या मालिकेला राम-राम केला आहे. त्यातच आता मंदार चांदवडकर यांच्या नावाची चर्चा रंगली आहे. यावर आता स्वत: मंदार याने प्रतिक्रिया देत मौन सोडलं आहे.

'आत्माराम भिडे' 'तारक मेहता...' मालिका सोडणार?

सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये मंदार चांदवडकर याचा हात जोडलेला फोटो थंबनेलवर दिसत आहे. ज्यावर लिहिलं आहे, 'दया भाभी येणार नाही, मीही शो सोडणार आहे'. भिडे मास्तर शो सोडणार या अफवांमुळे चाहते नाराज झाले आहेत. हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाल्यामुळे चाहत्यांमध्येही संभ्रम पसरला आहे. त्यामुळे अखेरीस मंदार चांदवडकर याने प्रतिक्रिया देत यावर मौन सोडलं आहे.

मिस्टर भिडेने सांगितलं व्हिडीओमागचं सत्य

मंदार चांदवडकर याने त्यांच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर करत या प्रकरणावर मौन सौडलं आहे. व्हिडीओमध्ये मंदार म्हणतोय, "नमस्कार दर्शकांनो, सर्वप्रथम तुम्हा सर्वांना कृष्ण जन्माष्टमीच्या खूप खूप शुभेच्छा. हा व्हिडीओ फक्त सेलिब्रेशनचा नाही तर मला तुमच्यासोबत काहीतरी शेअर करायचे आहे, ज्याने माझं लक्ष वेधून घेतलं आहे. याबद्दल माझी पत्नी स्नेहलचे आभार. अनेकांनी हा व्हिडीओ पाहिला असेल, थंबनेलमध्ये लिहिलं आहे, 'गोलीला शोमधून काढलं आहे, आज मी टीएमकेओसी सेटबद्दल संपूर्ण सत्य सांगेन, दया भाभी नाही येणार, मी शो देखील सोडणार आहे". लोक सोशल मीडियाचा कसा गैरवापर करतात याचा असा व्हिडीओ पाहून मला आश्चर्य आणि दुःख होत आहे."

View this post on Instagram
 
A post shared by Mandar Chandwadkar (@realmandarchandwadkar)

मंदारने पुढे सांगितलं की, "व्हिडीओमध्ये तुम्ही जे फोटो पाहत आहात, ते लाईव्ह स्ट्रीममधील आहेत, जो मी शोला 16 वर्ष पूर्ण झाल्यावर केला होता. या सर्व अफवा आहेत. मित्रांनो, कृपया अफवांवर विश्वास ठेवू नका आणि पसरवूही नका. तारक मेहता शे 2008 पासून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे आणि यापुढेही करत राहिल. फक्त सत्य सांगायचं होतं, म्हणून ही रिल पोस्ट केली. खूप खूप आभार आणि खूप खूप प्रेम".

महत्त्वाच्या इतर बातम्या :

'तारक मेहता का उल्टा चष्मा'मधील सर्वात महागडा कलाकार जेठालाल, मुनमुन दत्ताची फी किती?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Budget 2025 : अजित पवार अन् उद्धव ठाकरे भेट; दादा हा अर्थसंकल्प तुमचा नाही, उद्धव ठाकरेंचा अजितदादांना टोला
अजित पवार अन् उद्धव ठाकरे भेट; दादा हा अर्थसंकल्प तुमचा नाही, उद्धव ठाकरेंचा अजितदादांना टोला
BMC : कंत्राटी 580 सफाई कामगारांना मुंबई महानगर पालिकेत कायम करा, सर्वोच्च न्यायालयाचे आदेश
कंत्राटी 580 सफाई कामगारांना मुंबई महानगर पालिकेत कायम करा, सर्वोच्च न्यायालयाचे आदेश
Raj Thackeray : राज ठाकरेंनी ज्या आमदाराला राजकारणात उभं केलं, त्यानेच आता मनसेप्रमुखांना सुनावलं; कुंभमेळ्याच्या वक्तव्यावरुन पलटवार
राज ठाकरेंनी ज्या आमदाराला राजकारणात उभं केलं, त्यानेच आता मनसेप्रमुखांना सुनावलं; कुंभमेळ्याच्या वक्तव्यावरुन पलटवार
जेजुरी देवस्थानचा मोठा निर्णय; पाश्चिमात्य कपड्यांना मंदिरात बंदी, भाविकांसाठी वस्त्रसंहिता लागू, काय आहे नियम?
जेजुरी देवस्थानचा मोठा निर्णय; पाश्चिमात्य कपड्यांना मंदिरात बंदी, भाविकांसाठी वस्त्रसंहिता लागू, काय आहे नियम?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 4 PM TOP Headlines 4 PM 10 March 2025Eknath Shinde - Uddhav Thackeray पहिल्यांदाच समोरासमोर, एकमेकांकडे पाहिलंही नाहीAjit Pawar On Ladki Bahin : 2025-26 मध्ये लाडकी बहिण योजनेसाठी 36 हजार कोटींची तरतूद : अजित पवारABP Majha Marathi News Headlines 02.00 PM TOP Headlines 02.00 PM 10 March 2025

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Budget 2025 : अजित पवार अन् उद्धव ठाकरे भेट; दादा हा अर्थसंकल्प तुमचा नाही, उद्धव ठाकरेंचा अजितदादांना टोला
अजित पवार अन् उद्धव ठाकरे भेट; दादा हा अर्थसंकल्प तुमचा नाही, उद्धव ठाकरेंचा अजितदादांना टोला
BMC : कंत्राटी 580 सफाई कामगारांना मुंबई महानगर पालिकेत कायम करा, सर्वोच्च न्यायालयाचे आदेश
कंत्राटी 580 सफाई कामगारांना मुंबई महानगर पालिकेत कायम करा, सर्वोच्च न्यायालयाचे आदेश
Raj Thackeray : राज ठाकरेंनी ज्या आमदाराला राजकारणात उभं केलं, त्यानेच आता मनसेप्रमुखांना सुनावलं; कुंभमेळ्याच्या वक्तव्यावरुन पलटवार
राज ठाकरेंनी ज्या आमदाराला राजकारणात उभं केलं, त्यानेच आता मनसेप्रमुखांना सुनावलं; कुंभमेळ्याच्या वक्तव्यावरुन पलटवार
जेजुरी देवस्थानचा मोठा निर्णय; पाश्चिमात्य कपड्यांना मंदिरात बंदी, भाविकांसाठी वस्त्रसंहिता लागू, काय आहे नियम?
जेजुरी देवस्थानचा मोठा निर्णय; पाश्चिमात्य कपड्यांना मंदिरात बंदी, भाविकांसाठी वस्त्रसंहिता लागू, काय आहे नियम?
Maharashtra Budget 2025 : कृषी क्षेत्रात एआय वापरासाठी धोरण, राज्यातील शेतकऱ्यांसाठी 9 हजार 710 कोटी रुपयांची तरतूद; अजितदादांच्या बजेटमध्ये शेतकऱ्यांसाठी काय?
कृषी क्षेत्रात एआय वापरासाठी धोरण, राज्यातील शेतकऱ्यांसाठी 9 हजार 710 कोटी रुपयांची तरतूद; अजितदादांच्या बजेटमध्ये शेतकऱ्यांसाठी काय?
'या' कारणांनी थंडगार फ्रीजमध्ये होऊ शकतो 'स्फोट'
'या' कारणांनी थंडगार फ्रीजमध्ये होऊ शकतो 'स्फोट'
Maharashtra Budget 2025: नक्षलग्रस्त गडचिरोलीची ओळख पुसली जाणार! अर्थसंकल्पात अजित पवारांकडून घोषणांचा पाऊस, विदर्भाच्या वाट्याला काय?
नक्षलग्रस्त गडचिरोलीची ओळख पुसली जाणार! अर्थसंकल्पात अजित पवारांकडून घोषणांचा पाऊस, विदर्भाच्या वाट्याला काय?
Maharashtra Budget 2025 : कुंभमेळ्यासाठी विशेष प्राधिकरणाची स्थापना, रामकुंड, काळाराम मंदिर, गोदाकाठ विकासासाठी अजितदादांची मोठी घोषणा, उत्तर महाराष्ट्राच्या वाट्याला काय?
कुंभमेळ्यासाठी विशेष प्राधिकरणाची स्थापना, रामकुंड, काळाराम मंदिर, गोदाकाठ विकासासाठी अजितदादांची मोठी घोषणा, उत्तर महाराष्ट्राच्या वाट्याला काय?
Embed widget