Man Udu Udu Zhala : देशपांडे सर आणि जयश्रीला सानिका सांगणार इंद्राने लग्न लावून दिल्याचे सत्य
Man Udu Udu Zhala : 'मन उडू उडू झालं' मालिकेतील आगामी भाग खूपच खास असणार आहे.
Man Udu Udu Zhala : 'मन उडू उडू झालं' (Man Udu Udu Zhala) ही मालिका सध्या लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. सानिका आणि कार्तिकच्या लग्नाचे सत्य अखेर देशपांडे सरांसमोर आले आहे. आजच्या भागात इंद्राने लग्न लावून दिल्याचे सत्य सानिका देशपांडे सर आणि जयश्रीला सांगणार आहे.
सानिका आणि कार्तिकच्या लग्नाचे सत्य जयश्रीला समजणार आहे. अशातच इंद्राने सानिका-कार्तिकचे लग्न लाऊन दिल्याचे सत्य देशपांडे सर आणि जयश्रीला समजल्याने त्यांना मोठा धक्का बसणार आहे. कार्तिक-सानिकाच्या वेडेपणाचा परिणाम थेट इंद्रा-दीपूच्या नात्यावर होणार आहे.
View this post on Instagram
इंद्राची आई दीपूसाठी लग्नाची मागणी घालायला देशपांडे सरांच्या घरी आली असल्याने ती दीपूला मागणी घालणार का? हे प्रेक्षकांना आगामी भागात पाहायला मिळणार आहे. इंद्रादेखील सानिकाची जबाबदारी घेण्यासाठी कार्तिकला भाग पाडणार आहे. इंद्राला देशपांडे सर आणि जयश्री समजून घेतील का, याकडे प्रेक्षकांचे लक्ष आहे.
संबंधित बातम्या
Rang Majha Vegla : होळीच्या सणात रंगांची उधळण होणार, दीपा-कार्तिकच्या आयुष्यात नियती प्रेमाचे रंग भरणार!
Chinmay Mandlekar : काश्मिरी पंडितांना बेघर करणारा क्रूर बिट्टा कराटे, चिन्मय मांडलेकरने साकारलेले पात्र पाहून अंगावर येतील शहारे!
Shah Rukh Khan : ‘कुछ कुछ होनेवाला है’, ‘रोमान्स किंग’ शाहरुख खान लाँच करणार नवा ओटीटी प्लॅटफॉर्म!
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha
https://www.youtube.com/watch?v=Rs3GfkHRwXA