Majhi Tujhi Reshimgath : आजोबांनी दिला लग्नाला होकार.. पण नेहा-यशला वाटते 'ही' भीती
Majhi Tujhi Reshimgath : यश आणि नेहाच्या लग्नाला जग्गू आजोबांनी मान्यता दिली आहे.
Majhi Tujhi Reshimgath : 'माझी तुझी रेशीमगाठ' (Majhi Tujhi Reshimgath) या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांची मनं जिकंली आहेत. मालिकेत यश आणि नेहाचं नातं बहरताना दिसत आहे. जग्गू आजोबांनी नेहा आणि यशच्या लग्नालादेखील मान्यता दिली आहे. पण परीबद्दल आजोबांना समजल्यावर ते लग्नाला होकार देतील का, याची नेहा आणि यशला भीती वाटत आहे.
यश आणि नेहाच्या लग्नाला जग्गू आजोबांनी मान्यता दिली आहे. त्यामुळे ते लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत. पण जग्गू आजोबांना अद्याप नेहाचे लग्न झाले असून तिला परी नावाची गोड मुलगी असल्याचे सत्य माहित नाही. त्यामुळे ते यश आणि नेहाच्या लग्नाला होकार देतील का? याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागले आहे.
View this post on Instagram
श्रेयस तळपदे (Shreyas Talpade) आणि प्रार्थना बेहरे (Prarthana Behere) 'माझी तुझी रेशीमगाठ' या मालिकेत मुख्य भूमिकेत आहेत. तसेच या मालिकेचे मुख्य आकर्षण म्हणजे नेहाची गोड मुलगी अर्थात परी. परीची भूमिका साकारणारी मायरा वायकुळने (Mayra Vaikul) आपल्या निरागस अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले आहे.
संबंधित बातम्या
The Kashmir Files : 'द कश्मीर फाइल्स'ला मिळणार होता गानकोकीळा लतादीदींचा आवाज, पण..., विवेक अग्निहोत्रीने केला खुलासा
Man Udu Udu Zhala : सानिकाच्या स्वार्थीपणाची किंमत देशपांडे सरांना मोजावी लागणार?
Dasvi Trailer : अभिषेक बच्चन राजकारणी तर यामीचा हटके अंदाज; दसवीचा धमाकेदार ट्रेलर रिलीज
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)