Majhi Tujhi Reshimgath : अखेर यश आजोबांना सांगणार नेहाच परीची आई असल्याचं सत्य
Majhi Tujhi Reshimgath : परी नेहाची मुलगी असल्याचे सत्य अखेर आजोबांना कळणार आहे.
![Majhi Tujhi Reshimgath : अखेर यश आजोबांना सांगणार नेहाच परीची आई असल्याचं सत्य Majhi Tujhi Reshimgath marathi serial In the end Yash will tell his grandfather the truth that Neha is the mother of the pari Majhi Tujhi Reshimgath : अखेर यश आजोबांना सांगणार नेहाच परीची आई असल्याचं सत्य](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/05/25/c1200bf023739184f5ea9f217f0cc6c9_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Majhi Tujhi Reshimgath : 'माझी तुझी रेशीमगाठ' (Majhi Tujhi Reshimgath) ही मालिका सध्या लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. मालिकेतील यश आणि नेहाच्या जोडीला प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळत आहे. सध्या मालिकेत एक नवा ट्विस्ट आला आहे. अखेर यश आजोबांना नेहा परीची आई असल्याचं सत्य सांगणार आहे.
परी गेल्या अनेक दिवसांपासून पॅलेसवर राहायला आली आहे. परी पॅलेसवर राहायला आल्याने पॅलेसला घरपण आले आहे. परीने पॅलेसवरील सर्वांना आपलेसे केले आहे. त्यामुळे यशच्या आजोबांनी परीला दत्तक घेण्याचा निर्णय घेतला आहे. आजोबांच्या या निर्णयामुळे सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. पण सिम्मी काकू मात्र खुश झाली आहे. परीचे सत्य आजोबांना समजल्यानंतर आजोबा नेहाचा स्वीकार करतील का? असा प्रश्न प्रेक्षकांना पडला आहे.
नुकत्याच समोर आलेल्या प्रोमोमध्ये आजोबा म्हणत आहेत, पॅलेसवर मी एका व्यक्तीचे धुमधडाक्यात स्वागत करणार आहे. परीला मी दत्तक घेण्याचं ठरवलं आहे. त्यावर यश म्हणतो याची काहीही गरज नाही. परीचे खरे आई-वडील जीवंत आहेत. नेहाच परीची खरी आई आहे. यामुळे आजोबांना मोठा धक्का बसणार आहे. त्यामुळे आजोबा नेहाला आणि परीला पॅलेसवर राहायला देणार का याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागले आहे.
View this post on Instagram
श्रेयस तळपदे (Shreyas Talpade) आणि प्रार्थना बेहरे (Prarthana Behere) 'माझी तुझी रेशीमगाठ' या मालिकेत मुख्य भूमिकेत आहेत. तसेच या मालिकेचे मुख्य आकर्षण म्हणजे नेहाची गोड मुलगी अर्थात परी. परीची भूमिका साकारणारी मायरा वायकुळने (Mayra Vaikul) आपल्या निरागस अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले आहे.
नेहा मालिकेच्या सेटवर परतली
मालिकेत नेहाची भूमिका साकारणारी प्रार्थना बेहेरे तिच्या नवऱ्यासोबत लंडनला फिरायला गेली होती. त्यामुळे नेहा मालिकेत दिसणार नाही, असे म्हटले जात होते. पण प्रार्थना जरी लंडनला गेली असली तरी नेहा मात्र प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. मालिकेत नेहा लंडनला गेलेली दाखवली असल्याने नेहा व्हिडीओ कॉलच्या माध्यमातून परीसोबत संवाद साधताना दिसून आली होती.
संबंधित बातम्या
Majhi Tujhi Reshimgath : आजोबा बनवणार त्यांचं मृत्यूपत्र; काय येणार कुणाच्या वाट्याला?
Majhi Tujhi Reshimgath : परीमुळे यशस्वी होणार यशची परदेशी कंपनीसोबतची डील; छोट्या परीचं होणार कौतुक
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)