एक्स्प्लोर

Majhi Tujhi Reshimgath : आजोबा बनवणार त्यांचं मृत्यूपत्र; काय येणार कुणाच्या वाट्याला?

Majhi Tujhi Reshimgath : आधी शब्द दिल्याप्रमाणे यशच्या लग्नानंतर आजोबा त्यांचं मृत्यूपत्र बनवणार आहेत.

Majhi Tujhi Reshimgath : 'माझी तुझी रेशीमगाठ' (Majhi Tujhi Reshimgath) ही मालिका सध्या लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. मालिकेतील यश आणि नेहाच्या जोडीला प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळत आहे. सध्या मालिकेत एक नवा ट्विस्ट आला आहे. आधी शब्द दिल्याप्रमाणे यशच्या लग्नानंतर आजोबा त्यांचं मृत्यूपत्र बनवणार आहेत. 

यशच्या लग्नानंतर आजोबा आता आधी शब्द दिल्याप्रामाणे त्यांचं मृत्यूपत्र बनवणार आहेत. त्यामुळे कुणाच्या वाट्याला काय येणार हे लवकरच प्रेक्षकांसमोर येणार आहे. यशच्या आई-वडिलांच्या निधनानंतर सिम्मीने यशचा सांभाळ केला होता. त्यामुळे तिला मोठी वाटणी मिळायला हवी, असं तिला वाटत आहे. पण यशचा सांभाळ करण्याचं सिम्मीने खोटं नाटक केलं होतं हे आजोबांना माहित आहे. 

विश्वजित चौधरी आणि आजोबांचे संबंध परीमुळे चांगले होत असल्याचे प्रेक्षकांना मालिकेत पाहायला मिळत आहे. त्यामुळे विश्वजित चौधरीला प्रॉपर्टीतला किती हिस्सा मिळणार हे पाहण्याजोगे आहे. यशवर आजोबांचा खूप जीव आहे. कंपनीची संपूर्ण जबाबदारीदेखील यशने त्याच्या खांद्यावर घेतली आहे. त्यामुळे यशला काय काय मिळणार याकडे प्रेक्षकांचं लक्ष लागलं आहे. 

आजोबा यश, सिम्मी, विश्वजीत यांच्यात समान वाटण्या करणार की नेहाला महत्त्वाचा वाटा देतील हे येणाऱ्या भागात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. आजोबांच्या मृत्यूपत्रामुळे घरातल्यांचे एकमेकांसोबतचे संबंध खराब होणार की मालिकेत नवे वळण येणार हे प्रेक्षकांना आगामी भागात पाहायला मिळणार आहे. 

श्रेयस तळपदे (Shreyas Talpade) आणि  प्रार्थना बेहरे (Prarthana Behere) 'माझी तुझी रेशीमगाठ' या मालिकेत मुख्य भूमिकेत आहेत. तसेच या मालिकेचे मुख्य आकर्षण म्हणजे नेहाची गोड मुलगी अर्थात परी. परीची भूमिका साकारणारी मायरा वायकुळने (Mayra Vaikul) आपल्या निरागस अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले आहे.

प्रार्थना लंडनला गेली असली तरी नेहा मालिकेत दिसणार 

मालिकेत नेहाची भूमिका साकारणारी प्रार्थना बेहेरे सध्या तिच्या नवऱ्यासोबत लंडनला गेली आहे. त्यामुळे नेहा मालिकेत दिसणार नाही, अशी म्हटले जात होते. पण प्रार्थना जरी लंडनला गेली असली तरी नेहा मालिकेत दिसणार आहे. मालिकेत नेहा लंडनला गेलेली दाखवली असल्याने नेहा व्हिडीओ कॉलच्या माध्यमातून परीसोबत संवाद साधताना दिसणार आहे.

संबंधात बातम्या

Majhi Tujhi Reshimgath : परीमुळे यशस्वी होणार यशची परदेशी कंपनीसोबतची डील; छोट्या परीचं होणार कौतुक

महत्त्वाच्या बातम्या

NHAI Toll Pass: 'या' लोकांचा आता टोल कट होणार नाही; NHAI ने आणला विशेष पास, कसा मिळवता येईल?
'या' लोकांचा आता टोल कट होणार नाही; NHAI ने आणला विशेष पास, कसा मिळवता येईल?
रोहित पवारांना एवढंच काम शिल्लक; पुण्यातील कार्यक्रमावरुन विखे पाटलांची राहुल गांधींवरही बोचरी टीका
रोहित पवारांना एवढंच काम शिल्लक; पुण्यातील कार्यक्रमावरुन विखे पाटलांची राहुल गांधींवरही बोचरी टीका
Chhatrapati Sambhaji Nagar Boy Jumps Down From Mountain: मुलाने iPhone साठी जीवन संपवल्याची चर्चा; आता प्रत्यक्षदर्शीने वेगळचं सांगितलं, डोंगरावर काय घडलं?
मुलाने iPhone साठी जीवन संपवल्याची चर्चा; आता प्रत्यक्षदर्शीने वेगळचं सांगितलं, डोंगरावर काय घडलं?
Udgir Crime News : तब्बल 2 हजार 134 कोटींचा महाघोटाळा; 16 कंपन्यांशी संगनमत करून निधी थेट परदेशात पाठवला, आयकर विभागाच्या तीन दिवसाच्या तपासानंतर प्रकार उघड
उदगीरमध्ये तब्बल 2 हजार 134 कोटींचा महाघोटाळा; 16 कंपन्यांशी संगनमत करून निधी थेट परदेशात पाठवला, आयकर विभागाच्या तपासानंतर प्रकार उघड

व्हिडीओ

Chhatrapati Sambhajinagar News: मुलगा आणि वडिलांमध्ये नेमका वाद काय होता, तपासातून कारण काय समोर आलं?; DCP नवले यांनी A टू Z सांगितलं!
Rahul Gandhi Pune : राहुल गांधींच्या कार्यक्रमासाठी जोरदार तयारी, बाराशे पोलिस तैनात
Mahabaleshwar Tourist News: धुक्यात हरवलं महाबळेश्वर; सह्याद्रीच्या हिरवाईने पर्यटकांना घातली भुरळ
Abhijeet Dipke On School : शाळेत धडक, नियम किती कडक? | Special Report ABP Majha
Prithviraj Chavan On NCP : पृथ्वीराज चव्हाणांचा दावा, तापली राजकीय हवा | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
NHAI Toll Pass: 'या' लोकांचा आता टोल कट होणार नाही; NHAI ने आणला विशेष पास, कसा मिळवता येईल?
'या' लोकांचा आता टोल कट होणार नाही; NHAI ने आणला विशेष पास, कसा मिळवता येईल?
रोहित पवारांना एवढंच काम शिल्लक; पुण्यातील कार्यक्रमावरुन विखे पाटलांची राहुल गांधींवरही बोचरी टीका
रोहित पवारांना एवढंच काम शिल्लक; पुण्यातील कार्यक्रमावरुन विखे पाटलांची राहुल गांधींवरही बोचरी टीका
Chhatrapati Sambhaji Nagar Boy Jumps Down From Mountain: मुलाने iPhone साठी जीवन संपवल्याची चर्चा; आता प्रत्यक्षदर्शीने वेगळचं सांगितलं, डोंगरावर काय घडलं?
मुलाने iPhone साठी जीवन संपवल्याची चर्चा; आता प्रत्यक्षदर्शीने वेगळचं सांगितलं, डोंगरावर काय घडलं?
Udgir Crime News : तब्बल 2 हजार 134 कोटींचा महाघोटाळा; 16 कंपन्यांशी संगनमत करून निधी थेट परदेशात पाठवला, आयकर विभागाच्या तीन दिवसाच्या तपासानंतर प्रकार उघड
उदगीरमध्ये तब्बल 2 हजार 134 कोटींचा महाघोटाळा; 16 कंपन्यांशी संगनमत करून निधी थेट परदेशात पाठवला, आयकर विभागाच्या तपासानंतर प्रकार उघड
आयफोन हे कारण नाही, ती केवळ चर्चा; पोलिसांच्या तपासातून वेगळीच माहिती, DCP नवलेंकडून स्पष्टीकरण
आयफोन हे कारण नाही, ती केवळ चर्चा; पोलिसांच्या तपासातून वेगळीच माहिती, DCP नवलेंकडून स्पष्टीकरण
नवीन सिम कार्डसाठी आता बायोमेट्रिक केवायसी प्रणाली लागू; सिम कार्ड बदलताना सुद्धा नियम बदलले
नवीन सिम कार्डसाठी आता बायोमेट्रिक केवायसी प्रणाली लागू; सिम कार्ड बदलताना सुद्धा नियम बदलले
Jaggery Price Hike : साखरेनंतर आता गुळानेही खाल्ला भाव; एक गुळासाठी मोजावे लागणार 'इतके' रुपये, सामान्य नागरिकांच्या खिशावर भार
साखरेनंतर आता गुळानेही खाल्ला भाव; एक गुळासाठी मोजावे लागणार 'इतके' रुपये, सामान्य नागरिकांच्या खिशावर भार
इथेनाॅलमुळे ऐन सणासुदीच्या तोंडावर साखरेच्या किंमती दणादण वाढल्या? आता केंद्र सरकारने केला खुलासा
इथेनाॅलमुळे ऐन सणासुदीच्या तोंडावर साखरेच्या किंमती दणादण वाढल्या? आता केंद्र सरकारने केला खुलासा
Embed widget