Vanita Kharat: अमेरिकेतील प्रेक्षकांचा प्रतिसाद पाहून वनिताचा आनंद गगनात मावेना; खास व्हिडीओ शेअर करत म्हणाली,'एका कलाकाराला...'
वनिता खरातनं (Vanita Kharat) एक खास व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.
Vanita Kharat : 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' (Maharashtrachi Hasyajatra) या कार्यक्रमातील कलाकार अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत. अमेरिकेत जाऊन हे कलाकार तिथल्या प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहेत. नुकताच अभिनेत्री वनिता खरातनं (Vanita Kharat) एक खास व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये टोरंटो येथील प्रेक्षकांनी 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या टीमला दिलेला प्रतिसाद दिसत आहे. या व्हिडीओला वनितानं दिलेल्या कॅप्शननं अनेकांचे लक्ष वेधले आहे.
वनिता खरातनं शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये प्रेक्षक हे 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' कार्यक्रमाला टाळ्या वाजवून प्रतिसाद देत आहेत, असं दिसत आहे. वनितानं या व्हिडीओला कॅप्शन दिलं, 'Toronto तुम्ही खूप प्रेम दिलं! अशा theatre ला परफॉर्म करता येणं, ते ही हाऊसफुल्ल शो ला! एका कलाकाराला या पेक्षा मोठी गोष्ट ती काय! अविस्मरणीय प्रयोग. असे क्षण पुन्हा पुन्हा यावेत हिच रंग देवते चरणी प्रार्थना.' वनितानं शेअर केलेल्या व्हिडीओला पृथ्वी प्रताप, प्रियदर्शिनी इंदलकर यांनी कमेंट्स केल्या आहेत.
पाहा व्हिडीओ:
View this post on Instagram
वनिता खरात ही सोशल मीडियावर विविध फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. वनितानं काही दिवसांपूर्वी अमेरिकेतील एक खास व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये गौरव मोरे आणि वनिता हे डान्स करताना दिसले. या व्हिडीओला नेटकऱ्यांची पसंती मिळाली.
View this post on Instagram
बोस्टनमध्ये देखील 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कार्यक्रमाचा प्रयोग झाला. अमेरिकेतील प्रयोगादरम्यानचे फोटो आणि व्हिडीओ या कार्यक्रमातील कलाकारांनी सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' (Maharashtrachi Hasyajatra) या कार्यक्रमातील समीर चौघुले , विशाखा सुभेदार, नम्रता संभेराव, दत्तू मोरे, गौरव मोरे, प्रसाद खांडेकर आणि वनिता खरात या कलाकारांच्या अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळते. या शोचे सूत्रसंचालन अभिनेत्री प्राजक्ता माळी करते. अभिनेत्री सई ताम्हणकर आणि अभिनेता प्रसाद ओक हे या शोचे परीक्षक आहेत.
महत्त्वाच्या इतर बातम्या :