Namrata Sambherao: नम्रता संभेरावचा वाढदिवस; 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधील कलाकारांनी खास पोस्ट शेअर करत दिल्या शुभेच्छा
Namrata Sambherao: नम्रताच्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्राची हास्यजत्रा (Maharashtrachi Hasyajatra) या कार्यक्रमामधील कलाकारांनी सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर केल्या आहेत.
Namrata Sambherao: अभिनेत्री नम्रता संभेराव (Namrata Sambherao) ही तिच्या विनोदी शैलीनं नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकते. तिनं साकारलेल्या लॉली भूमिकेला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली. नम्रता ही महाराष्ट्राची हास्यजत्रा (Maharashtrachi Hasyajatra) या छोट्या पडद्यावरील कार्यक्रमामधून प्रेक्षकांच्या भेटीस येते. नम्रता आज वाढदिवस आहे. नम्रताच्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमामधील कलाकारांनी खास पोस्ट शेअर करुन तिला शुभेच्छा दिल्या आहेत.
वनिता खरातनं शेअर केली पोस्ट
वनिता खरातनं नम्रता संभेरावसोबतचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला. या फोटोला तिनं कॅप्शन दिलं,'हॅप्पी बर्थ-डे टॅलेंट हाऊस. तुझ्या पिटाऱ्यातून नवनवीन पात्र येत राहूदेत. लव्ह यू'
तसेच अभिनेता समीर चौघुलेनं (Samir Choughule) देखील सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर केली. त्यानं नम्रतासोबतचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर करुन कॅप्शनमझ्ये लिहिलं, 'मॅडनेसच्या पावर हाऊसला वाढदिवसाच्या शुभेच्छा'
प्रियदर्शनी इंदलकरनं नम्रताचा एक खास फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. या फोटोमध्ये नम्रता ही क्रिकेट खेळताना दिसत आहे. प्रियदर्शनीनं या फोटोला कॅप्शन दिलं, 'नमा ताई वाढदिवसाच्या शुभेच्छा. अशीच तुफान बॅटिंग करत राहा'
वाळवी, व्हेंटिलेटर या चित्रपटांमध्ये नम्रता संभेरावनं काम केलं आहे. नम्रताच्या महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमातील कॉमेडी स्टाईलला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळते. नम्रता ही सोशल मीडियावर अॅक्टिव असते. ती वेगवेगळ्या लूकमधील फोटो सोशल मीडियावर शेअर करते. तसेच आगामी प्रोजेक्ट्सची माहिती देखील नम्रता सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना देत असते. नम्रताला इन्स्टाग्रामवर 211K फॉलोवर्स आहेत.
View this post on Instagram
नम्रतानं एका इन्स्टाग्राम लाईव्हमध्ये तिच्या बालपणाबद्दल सांगितलं होतं. ती म्हणाली होती,'मला लहानपणी गरबा आणि दांडिया खेळायला आवडायचं. नवरात्रीला दररोज मी दांडिया खेळायला जायचं. दसऱ्याला बक्षीस समारंभ असायचा. या समारंभात मला बक्षीस म्हणून मला खड्याळ मिळायचं.' या लाईव्हमध्ये नम्रतानं सांगितलं होतं की, ती आधी चाळीमध्येच राहत होते. लालबाग-काळाचौकी येथे तिचं माहेर होतं. त्यामुळे तिथे आजूबाजूच्या लोकांचे ती निरीक्षण करत होते.