Rasika Vengurlekar Aniruddha Shinde Love Story : बस स्टॉपवर प्रपोज, 10 वर्षांचं रिलेशन ते लग्न; 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम रसिका वेंगुर्लेकरची फिल्मी लव्हस्टोरी!
Rasika Vengurlekar Aniruddha Shinde Love Story : 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' (Maharashtrachi Hasyajatra) फेम रसिका वेंगुर्लेकर आणि मराठी मालिकांचा लोकप्रिय दिग्दर्शक अनिरुद्ध शिंदे यांची लव्हस्टोरी खूपच फिल्मी आहे.
![Rasika Vengurlekar Aniruddha Shinde Love Story : बस स्टॉपवर प्रपोज, 10 वर्षांचं रिलेशन ते लग्न; 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम रसिका वेंगुर्लेकरची फिल्मी लव्हस्टोरी! Maharashtrachi Hasyajatra Fame Marathi Actress Rasika Vengurlekar Aniruddha Shinde Filmy Love Story Know Entertainment Marathi Industry Television Latest Update Marathi News Rasika Vengurlekar Aniruddha Shinde Love Story : बस स्टॉपवर प्रपोज, 10 वर्षांचं रिलेशन ते लग्न; 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम रसिका वेंगुर्लेकरची फिल्मी लव्हस्टोरी!](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/03/12/2347c820fb1e68e2734c5a72722fad2b1710236170256254_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Rasika Vengurlekar Aniruddha Shinde Love Story : 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' (Maharashtrachi Hasyajatra) फेम रसिका वेंगुर्लेकर (Rasika Vengurlekar) आणि मराठी मालिकांचा लोकप्रिय दिग्दर्शक अनिरुद्ध शिंदे (Aniruddha Shinde) 2018 मध्ये लग्नबंधनात अडकले आहेत. त्यांची लव्हस्टोरी खूपच फिल्मी आहे. लग्नाआधी दहा वर्षे ते एकमेकांना डेट करत होते.
रसिका अन् अनिरुद्धची फिल्मी लव्हस्टोरी (Rasika Vengurlekar Aniruddha Shinde Love Story)
रसिका वेंगुर्लेकर आणि अनिरुद्ध शिंदे यांची पहिली भेट परळच्या एमडी महाविद्यालयात झाली होती. 'एमडी नाट्यांगण'च्या माध्यमातून दोघेही एकांकिकेत काम करत होते. त्यावेळी अनिरुद्ध रसिकाच्या प्रेमात पडला. अनिरुद्धने चक्क बस स्टॉपवर रसिकाला प्रपोज केलं होतं. त्यावेळी रसिकाने मात्र त्याला होकार दिला नव्हता.
View this post on Instagram
अनिरुद्ध पुढे दोन वर्षे रसिकाच्या खूप मागे लागला होता. अनिरुद्धने प्रपोज केलं त्यावेळी रसिका तेरावीत होती आणि तिला शिक्षण, नाटक या गोष्टी महत्त्वाच्या वाटत होत्या. पुढे रसिका आणि अनिरुद्ध एकमेकांचे चांगले मित्र झाले. पण तरीही त्याला होकार देण्यासाठी रसिकाच्या मनाची पूर्ण तयारी होत नव्हती. खूप मागे लागलाय तर सुरुवातीला होकार देऊन नंतर ब्रेकअप करू असा विचार रसिकाने त्यावेळी केला होता. पण या प्रवासात अनिरुद्धने तिला आपल्या प्रेमात पाडलं. मैत्री रुपांतर प्रेमात झालं. जवळपास 10 वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला.
ती दोन वर्षे चार-पाच वर्षांसारखी...
अनिरुद्धने प्रपोज केल्यानंतर त्याला होकार द्यायला रसिकाने दोन वर्षांचा कालावधी घेतला होता. ही दोन वर्षे अनिरुद्धला चार-पाच वर्षांसारखी वाटली होती. याबद्दल एबीपी माझासोबत बोलताना अनिरुद्ध म्हणाला,"ती' दोन वर्षे माझ्यासाठी चार-पाच वर्षांसारखी असली तरी वेळ देणं खूप गरजेचं होतं. त्या वेळ देण्यामुळेच आम्हाला प्रेमाची जाणीव झाली. रिलेशनबद्दल आमच्या घरी सर्वांना माहिती होतं. अफेअर असलं तरी दोघेही करिअरबाबत फोकस होतो".
रसिकाने अनिरुद्धला होकार का दिला?
अनिरुद्धला होकार देण्याबाबत एबीबी माझाशी बोलताना रसिका म्हणाली, "अनिरुद्ध कामाच्या बाबतीत खूप फोकस आणि प्रामाणिक आहे. एखादी गोष्ट त्याने ठरवली की ती तो करतोच. मलाही तो खूप पाठिंबा देत असतो. त्याच्यासोबत मी जगातील कोणतीही गोष्ट शेअर करू शकते, याच विचाराने मी त्याला होकार दिला होता".
रसिकाबद्दल बोलताना अनिरुद्ध म्हणाला,"रसिका खूप समजूतदार आहे. समोरच्याचा ती कायम आदर करत असते. सर्वांना सांभाळून घेते. तुम्ही कोणावर प्रेम करता त्यापेक्षा तुमच्यावर कोण प्रेम करतं त्या व्यक्तीवर करा".
संबंधित बातम्या
Rasika Vengurlekar : 'हास्यजत्रा'फेम रसिका वेंगुर्लेकरसाठी नवऱ्याची खास पोस्ट, तुलाही आयुष्यात मोठं होताना...
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)