एक्स्प्लोर

Maharashtrachi Hasyajatra : मी आणि सचिन आपटी बार, 5 वर्षे आपटतोय, समीर चौघुले रॉकेट, गौरव अनारस, 'हास्यजत्रा'ची धमाल दिवाळी

Maharashtrachi Hasyajatra : 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' ही टीम वर्षभर हास्यरुपी फटाके वाजवत असते. त्यांच्यामुळे महाराष्ट्रातील घराघरांत हास्याचे आवाज होत असतात.

Maharashtrachi Hasyajatra : दिवाळी (Diwali 2023) म्हटलं की फटाके हे आलेच. पण 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' (Maharashtrachi Hasyajatra) ही टीम वर्षभर हास्यरुपी फटाके वाजवत असते. त्यांच्यामुळे महाराष्ट्रातील घराघरांत हास्याचे आवाज होत असतात. 

'महाराष्ट्राची हास्यजत्रा'चे लेखक सचिन गोस्वामी म्हणाले की,"वर्षभर आम्ही स्कीटरुपी फराळ देत असतो. आमचा फराळ खूप हेल्दी आहे. वेगवेगळ्या वयोगटातील मंडळी, कुटुंबीय हा फराळ दररोज खात असतात. मन:स्वास्थ्यासाठी हा फराळ उत्तम आहे". 

दिवाळीतील फराळाच्या ताटाप्रमाणे 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कार्यक्रमाची टीम आहे. प्रत्येकाची चव उत्तम आहे. प्रत्येकाचा स्वभाव वेगळा आहे. प्रत्येकामध्ये वेगळं टॅलेंट आहे. एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत सचिन गोस्वामींनी फराळातला कोणता पदार्थ कोणत्या विनोदवीरासारखा आहे हे सांगितलं आहे. 

हास्यजत्रेतला रव्याचा लाडू कोण?

सचिन गोस्वामी म्हणतात, रव्याचा लाडू अरुण कदम आहे. त्यामागचं कारण सांगत गोस्वामी म्हणाले,"रव्याचा लाडू चविष्ट आहे. सगळ्यांना आवडतो. पण हा फोडून कसा खायचा हे कळत नाही. फोडल्यावर तो कसा फुटेल हे कोणी सांगू शकत नाही". 

हास्यजत्रेतल्या टीममधल्या चकल्या कोण याबद्दल बोलताना सचिन गोस्वामी म्हणाले,"आमच्याकडे दोन-तीन चकल्या आहेत. नम्रता संभेराव, समीर चौघुले (Samir Choughule), पृथ्विक प्रताप, प्रसाद खांडेकर या चकल्या आहेत. चकलीचे जेवढे वेटूळे आहेत तेवढे त्यांचे रुपरंग आहेत. कुठून सुरुवात करून कुठे संपवावं याचा अंदाज येत नाही. ते अनंत आहेत. चक्राकार आहेत". 

वनिता खरात आहे बदाम खोचलेला बेसनाचा लाडू...

प्रियंका हांडे, दत्तू, विराज हे 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या टीममधील शंकरपाळी आहेत. शंकरपाळ्यांशिवाय फराळाचं ताट पूर्ण होऊ शकत नाही. तर बेसन लाडू कोण हे सांगत गोस्वामी म्हणाले,"ईशा डे, चेतना भट्ट, रसिका वेंगुर्लेकर हे बेसन लाडूचे प्रकार आहेत. तर बेसनाच्या लाडूवर बदाम खोचला की तो वनिताचा लाडू होतो".

टीममधले अनारसे कोण?

फराळाच्या ताटातली करंजी श्याम आहे. सारणात अनेक पदार्थांचा समावेश करण्यात आलेला असतो. करंजीचा टायमिंग फार महत्त्वाचा असतो. गौरव मोरे (Gaurav More), ओंकार भोजने (Omkar Bhojane) हे हास्यजत्रेतले अनारसे आहेत. रोहित माने चिवड्यातली मिरची आहे. प्रिया चिवडल्यातले शेंगदाणे, काजू आहे. 
 
'महाराष्ट्राची हास्यजत्रा'टीममधला कोण कोणता फटाका? 

  • रॉकेट - समीर चौगुले
  • सुतळी बाँब - हास्यजत्रेतल्या सर्व महिला विनोदवीर
  • भुईचक्र - निखिल बने, दत्तू, प्रियंका हांडे, विराज
  • पाऊस - गौरव मोरे, अरुण कदम, श्यामसुंदर राजपूत, हेमंत पाटील, रोहित माने
  • लवंगी - म्युझिक टीम
  • आपटी बाँब - सचिन गोस्वामी, सचिन मोटे (सचिन मोटे म्हणाले,"मी आणि सचिन हे आपटी बार आहोत. पाच वर्षे आपटतोय".)
  • फुलबाजी - सोनी मराठी चॅनल
  • नागगोळी - नुसता धूर करणाऱ्या स्कीट
  • फँन्सी फटाका - ओंकार राऊत
  • प्रसाद खांडेकर - लक्ष्मी बॉम्ब

संबंधित बातम्या

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

बिग बॉसच्या घरात वाईल्ड कार्ड स्पर्धकांमध्ये चर्चा; तिघांमध्ये नेमकं शिजतयं काय? नवीन गेम स्ट्रटजी कोणती?
बिग बॉसच्या घरात वाईल्ड कार्ड स्पर्धकांमध्ये चर्चा; तिघांमध्ये नेमकं शिजतयं काय? नवीन गेम स्ट्रटजी कोणती?
Neha Pendse On Motherhood: सहा वर्षांचा सुखी संसार, दोन सावत्र लेकी, आता मराठी अभिनेत्रीला नाही व्हायचं आई; म्हणाली, 'eggs फ्रीज केलेत, पण...'
सहा वर्षांचा सुखी संसार, दोन सावत्र लेकी, आता मराठी अभिनेत्रीला नाही व्हायचं आई; म्हणाली, 'eggs फ्रीज केलेत, पण...'
Actor Ramesh Pardeshi Attacked By Stray Dog: माझ्या मांडीचा चावा घेतला! पुण्यातील टेकडीवर 'पिट्या भाई'सोबत घडला भयंकर प्रकार, अनुभव शेअर करत म्हणाला...
माझ्या मांडीचा चावा घेतला! पुण्यातील टेकडीवर 'पिट्या भाई'सोबत घडला भयंकर प्रकार, अनुभव शेअर करत म्हणाला...
Actor Vikas Samudre On Sachin Pilgaonkar Trolling: 'पन्नाशी, साठीतला व्यक्ती सचिन पिळगावकरांना ट्रोल करत नाहीय, जेन-झी करतायत...'; मराठी अभिनेत्याचे खडे बोल
'पन्नाशी, साठीतला व्यक्ती सचिन पिळगावकरांना ट्रोल करत नाहीय, जेन-झी करतायत...'; मराठी अभिनेत्याचे खडे बोल

व्हिडीओ

Special Report Iran vs America : ब्रिटनच्या वेगळ्या भूमिकेवरुनही ट्रम्प यांचा संताप
Special Report Raj Thackeray - Uddhav Thackeray : मनसे-ठाकरेसेनेतील नाराजीवर तोडगा निघाला?
Special Report Rajya Sabha : राज्यसभा निवडणुकीसाठी भाजपच्या उमेदवारांची घोषणा
Jalgaon Banana : केळीचे दर 2.500 रुपयांवरुन 1500 रुपयांवर, युद्धाचा उत्पादकांना फटका
Ajit Pawar plane crash spot Baramati : AIB च्या अहवालात विमान झाडाला धडकल्याचा उल्लेख, फॅक्ट काय?

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IND vs ENG : भारत आणि इंग्लंड यांच्यात उपांत्य फेरीचा सामना,वानखेडेवर कसं पोहोचायचं? मुंबई पोलिसांकडून प्रेक्षकांसाठी महत्त्वाच्या सूचना जारी 
भारत- इंग्लंड सामना पाहण्यासाठी वानखेडे स्टेडियमवर कसं पोहोचायचं? मुंबई पोलिसांकडून सूचना जारी
तामिळनाडूत द्रमुक आणि काँग्रेसचं जमलं, राज्यसभेची एक जागा काँग्रेसला मिळणार, विधानसभेसाठी द्रमुकनं किती जागा सोडल्या?
तामिळनाडूमध्ये काँग्रेस-द्रमुकमधील जागा वाटपाचा तिढा सुटला, काँग्रेसला विधानसभेच्या किती जागा?
Iran vs America : भारतातून परतणाऱ्या इराणच्या युद्धनौकेवर अमेरिकेचा हल्ला, पाणबुडीद्वारे क्षेपणास्त्राचा मारा, 80 जणांचा मृत्यू, व्हिडीओ जारी  
भारतातून परतणाऱ्या इराणच्या युद्धनौकेवर अमेरिकेचा हल्ला, पाणबुडीद्वारे क्षेपणास्त्राचा मारा, 80 जणांचा मृत्यू
Rajya Sabha Election : राज्यसभेच्या महाराष्ट्रातील 7 जागांसाठी 6 उमेदवार जाहीर, एकनाथ शिंदे कोणाला संधी देणार? 
राज्यसभेच्या महाराष्ट्रातील 7 जागांसाठी 6 उमेदवार जाहीर, एकनाथ शिंदे कोणाला संधी देणार? 
Iran Israel Conflict : पाकिस्तानातून बाहेर पडा, अमेरिकेचे नागरिकांना निर्देश; इराणने हल्ला न करण्याची पाकिस्तानची विनंती फेटाळली
पाकिस्तानातून बाहेर पडा, अमेरिकेचे नागरिकांना निर्देश; इराणने हल्ला न करण्याची पाकिस्तानची विनंती फेटाळली
धक्कादायक!  सासरच्या त्रासाला कंटाळून तरुणानं संपवलं जीवन, सासूसह तीन जणांवर जळगावमध्ये गुन्हा दाखल 
धक्कादायक!  सासरच्या त्रासाला कंटाळून तरुणानं संपवलं जीवन, सासूसह तीन जणांवर जळगावमध्ये गुन्हा दाखल 
ह्रदयद्रावक... वडिलांना आणायला जाताना कारचा अपघात, दुर्घटनेत बहिणीचा मृत्यू, भाऊ गंभीर जखमी
ह्रदयद्रावक... वडिलांना आणायला जाताना कारचा अपघात, दुर्घटनेत बहिणीचा मृत्यू, भाऊ गंभीर जखमी
नागपूर महापालिकेच्या आयुक्तांना हलवलं; राज्यातील दोन IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या, पुण्यात कुठं जबाबदारी?
नागपूर महापालिकेच्या आयुक्तांना हलवलं; राज्यातील दोन IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या, पुण्यात कुठं जबाबदारी?
Embed widget