(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Maharashtrachi Hasyajatra : बालदिनी बालप्रेक्षकांना मिळणार मनोरंजनाची मेजवानी; 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'च्या मंचावर छोटे हास्यवीरांची धमाल
Maharashtrachi Hasyajatra : 14 नोव्हेंबर रोजी बालदिनानिमित्त छोटे हास्यवीर प्रेक्षकांचं मनोरंजन करणार आहेत.
Maharashtrachi Hasyajatra : 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' (Maharashtrachi Hasyajatra) या विनोदी कार्यक्रमाचे जगभरात चाहते आहेत. 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' नेहमी निरनिराळ्या प्रकारे प्रेक्षकांचे मनोरंजन करण्याचा प्रयत्न करते. आता 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' कार्यक्रमात वेगळेपण येणार आहे. 14 नोव्हेंबर रोजी बालदिनानिमित्त छोटे हास्यवीर प्रेक्षकांचं मनोरंजन करणार आहेत.
गेल्या काही दिवसांपूर्वी 'महाराष्ट्राची हास्यजत्रा - छोटे हास्यवीर' या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. अनेक मुलांनी या स्पर्धेत सहभाग घेतला असून त्यातल्या सर्वोत्तम स्पर्धकांना 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या मंचावर आमंत्रित केले गेले आहे. 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'च्या मंचावर हे हास्यवीर धमाल करताना दिसणार आहेत.
आपल्या आवडत्या हास्यवीरांसोबत मंचावर हे छोटे हास्यवीर कशाप्रकारे मजा करतात आणि या छोट्या हास्यवीरांनी केलेली धमाल प्रेक्षकांना बालदिनानिमित्त पाहायला मिळणार आहे. 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' नेहमी असे निरनिराळे सरप्रायझेस आपल्या प्रेक्षकांसाठी हास्याचा मंचावर आणते.
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' हा विनोदी कार्यक्रम केवळ मराठीच नाही तर इतर भाषिक लोकही तितक्याच आपुलकीने पाहत असतात. याचे दाखले हास्यजत्राच्या कलाकारांना नेहमीच अनुभवायला मिळालेले आहेत. त्यामुळे हा कार्यक्रम आता केवळ महाराष्ट्रापुरता मर्यादित राहिलेला नसून जगभरात प्रसिद्ध आहे. प्रेक्षक या कार्यक्रमाकडे निखळ मनोरंजनाचं साधन म्हणून पाहत असतो.
View this post on Instagram
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कार्यक्रमाच्या पहिल्या भागापासून हास्यजत्रेला प्रेक्षकांचं प्रेम मिळू लागलं आहे. हास्यवीरांनी आपल्या विनोदांनी आणि प्रहसनांनी प्रेक्षकांना नवी उमेद दिली आहे. लॉकडाऊनच्या कठीण काळातही हा कार्यक्रम रसिकांचं मनोरंजन करत होता. टेन्शनवरची उत्तम मात्रा असणाऱ्या या कार्यक्रमात हास्याचे अनेक फवारे उडणार आहेत. सध्या प्रत्येक भागात मोठमोठे कलाकार हास्यजत्रेच्या मंचावर उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवत आहेत.
संबंधित बातम्या