Maharashtra Television News : 'आई कुठे काय करते' ते 'सुख म्हणजे नक्की काय असतं'; तुमच्या आवडत्या मालिकेत सध्या काय घडतंय? जाणून घ्या एका क्लिकवर!
तुमच्या आवडत्या मालिकेच्या कथानकामध्ये सध्या काय घडतंय? या मालिकांमध्ये कोणते ट्वीस्ट येणार आहेत? याबाबत जाणून घेऊयात...
Maharashtra Television News : विविध विषयांवर आधारित असणाऱ्या मालिका प्रेक्षकांची मनं जिंकत असतात. या मालिका अनेक लोक रोज न चुकता बघतात. तुमच्या आवडत्या मालिकेच्या कथानकामध्ये सध्या काय घडतंय? या मालिकांमध्ये कोणते ट्वीस्ट येणार आहेत? याबाबत जाणून घेऊयात...
Sukh Mhanje Nakki Kay Asta: मंगलच्या डोक्यात शिजतोय नवा प्लॅन; 'सुख म्हणजे नक्की काय असतं !' चा प्रोमो व्हायरल
Sukh Mhanje Nakki Kay Asta: सुख म्हणजे नक्की काय असतं (Sukh Mhanje Nakki Kay Asta) ही मालिका गेल्या काही दिवसांपासून प्रेक्षकांची मनं जिंकत आहेत. या मालिकेतील जयदीप आणि गौरी यांच्या जोडीला प्रेक्षकांची पसंती मिळाली आहे. तसेच मालिकेतील चिमुकली लक्ष्मी ही देखील प्रेक्षकांची मनं जिंकत आहे. काही दिवसांपूर्वी या मालिकेत मंगलची एन्ट्री झाली आहे. नुकताच या मालिकेच्या एपिसोडचा एक प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या प्रोमोमध्ये जयदीप हा गौरीवर चिडलेला दिसत आहे. लक्ष्मीला मंगल शाळेत सोडायला जाते. त्यामुळे जयदीप हा गौरीवर चिडतो.
संपूर्ण बातमी वाचण्यासाठी क्लिक करा
Aai Kuthe Kay Karte : 'आई कुठे काय करते' मालिकेत मोठा ट्वीस्ट; अनिशचे आई-बाबा येणार म्हणून अनिरुद्ध चिडला
Aai Kuthe kay Karte Marathi Serial Latest Update : 'आई कुठे काय करते' (Aai Kuthe Kay Karte) या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांची मने जिंकली असून आजही या मालिकेची क्रेझ कायम आहे. आता या मालिकेत मोठा ट्विस्ट येणार आहे. 'आई कुठे काय करते' या मालिकेत सध्या इशा आणि अनिशच्या लग्नाचा ट्रॅक सुरू आहे. इशाने अनिरुद्धला घाबरुन अनिलसोबत पळून जाऊन लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. पण इशाने असं चुकीचं पाऊल उचलू नये यासाठी अरुंधतीने त्या दोघांचा साखरपुडा करुन दिला.
संपूर्ण बातमी वाचण्यासाठी क्लिक करा
Marathi Serial : जुई गडकरीची 'ठरलं तर मग' टीआरपीच्या शर्यतीत पुन्हा नंबर वन; 'सुख म्हणजे नक्की काय असतं'चं स्थान घसरलं
Marathi Serial TRP Rating : मराठी मालिका (Marathi Serial) विश्वात सध्या नवनवीन प्रयोग होत असतात. प्रेक्षकांना मालिकेत खिळवून ठेवण्यासाठी निर्माते सतत मालिकेत नवीन ट्विस्ट आणत असतात. मालिकांसोबतच मालिकांच्या टीआरपी रेटिंगकडेदेखील प्रेक्षकांचे लक्ष लागलेले असते. टीआरपी रिपोर्टमध्ये अनेकदा चढ-उतार पाहायला मिळत असतो. नुकताच या आठवड्याचा टीआरपी रिपोर्ट समोर आला आहे. टॉप 10 मालिका कोणत्या आहेत, जाणून घ्या...
संपूर्ण बातमी वाचण्यासाठी क्लिक करा
Chala Hawa Yeu Dya: 'चला हवा येऊ द्या' च्या मंचावरही आता मधुमास बहरणार; 'महाराष्ट्र शाहीर' चित्रपटाची टीम शोमध्ये लावणार हजेरी
Chala Hawa Yeu Dya: छोट्या पडद्यावरील 'चला हवा येऊ द्या' (Chala Hawa Yeu Dya) या शोमध्ये विविध सेलिब्रिटी हजेरी लावत असतात. या शोमधील कलाकार प्रेक्षकांना खळखळून हसवतात. चला हवा येऊ द्या' या कार्यक्रमाच्या आगामी एपिसोडचा प्रोमो नुकताच सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. या प्रोमोमध्ये दिसत आहे की, महाराष्ट्र शाहीर (Maharashtra Shahir) या चित्रपटाची टीम 'चला हवा येऊ द्या' या शोमध्ये हजेरी लावणार आहे.
संपूर्ण बातमी वाचण्यासाठी क्लिक करा
Milind Gawali: 'एका बापाची व्यथा...' ; आई कुठे काय करते मालिकेमधील अनिरुद्धच्या पोस्टनं वेधलं लक्ष
Milind Gawali: छोट्या पडद्यावरील आई कुठे काय करते (Aai Kuthe Kay Karte) या मालिकेमधील अभिनेते मिलिंद गवळी (Milind Gawali) हे अनिरुद्ध ही भूमिका साकारतात. अनिरुद्धची मुलगी ईशा ही लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. ईशाच्या लग्नाला अनिरुद्धचा विरोध आहे. या मालिकेबाबत नुकतीच मिलिंद गवळी यांनी एक पोस्ट शेअर केली. त्यांच्या या पोस्टनं अनेकांचे लक्ष वेधले.