Shubhavi Gupte : अशोक सराफांच्या मालिकेतून मराठी स्टारकीडचं इंडस्ट्रीत पदार्पण; अभिनेत्री लेकीसाठी झाली भावूक, म्हणाली...
Shubhavi Gupte : अभिनेता लोकेश गुप्ते आणि अभिनेत्री चैत्राली गुप्ते यांची लेक शुभवी गुप्ते हिने नुकतच मालिकाविश्वात पदार्पण केलं आहे.
Shubhavi Gupte : बॉलिवूड प्रमाणेच मराठीतही अनेक सेलिब्रेटींची मुलं त्यांचा अभिनयाचा वारसा पुढे नेत आहेत. विराजस कुलकर्णी, शुभंकर तावडे, सखी गोखले यांसह अनेक कलाकारांनी आईवडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत अभिनयाची वाट धरली. आता आणखी एक स्टारकीड या वाटेवर आहे. अभिनेता लोकेश गुप्ते (Lokesh Gupte) आणि अभिनेत्री चैत्राली गुप्ते (Chaitrali Gupte) यांची लेक शुभवी गुप्ते (Shubhavi Gupte) हीने नुकतच तिचं इंडस्ट्रीतलं पदार्पण केलं आहे. विशेष म्हणजे तिला तिचं पहिलंच काम हे अशोक सराफ यांच्यासोबत करण्याची संधी मिळाली आहे.
कलर्स मराठी वाहिनीवर 25 नोव्हेंबरपासून अशोक.मा.मा ही मालिका सुरु झाली आहे. या मालिकेच्या माध्यमातून बऱ्याच वर्षांनी अशोक सराफ हे मालिकाविश्वात पदार्पण करत आहेत. त्यामुळे या मालिकेचा पहिला प्रोमो शेअर केल्यापासूनच प्रेक्षकांना बरीच उत्सुकता लागून राहिली होती. याच मालिकेत शुभवी देखील काम करत आहे. शुभवी या मालिकेत अशोक सराफ यांच्या नातीची संयमीची भूमिका साकारत आहे.
चैत्राली गुप्ते लेकीसाठी झाली भावुक
दरम्यान लेकीचं सिनेसृष्टीत पदार्पण होत असताना अभिनेत्री चैत्राली गुप्ते हिची प्रतिक्रिया देखील समोर आलेली आहे. चैत्रालीने राजश्री मराठीसोबत संवाद साधताना म्हटलं की, जेव्हा निवेदिता ताईचा फोन आला, तिने मला सांगितलं की, अशी अशी मालिका करतोय आपण. कारण ती इतक्या लगेच मालिकाविश्वात पदार्पण करेल याची कल्पना नव्हती. कारण तिचं शिक्षण सुरु आहे. तेव्हा मला निवेदिता ताईने सांगितलं की, अगं मालिकेत अशोक आहे. तेव्हा मला वाटलं की, जर मी आता नाही म्हणाले, तर माझ्यासारखी मूर्ख कोणी नसेल. म्हणजे इतकी मोठी संधी, जर मी किंवा तिने स्वत: घालवली असती तर आमच्यासारखे वेडे मूर्ख आम्हीच.
पुढे तिने म्हटलं की, सध्या उत्सुकता आणि आनंद हे एका वेगळ्या उंचीवर आहे. मी आणि लोकेश फार खूष आहोत, कारण तिचं इतक्या मोठ्या प्रमाणातलं पहिलं काम आणि तेही अशोक सराफ यांच्यासोबत... त्यामुळे आम्ही खूप आनंदी आहोत. आमचे आशीर्वाद तर आहेच, पण जेव्हा अशोक सराफांकडून तिच्या डोक्यावर हात ठेवला जातो, तेव्हा खऱ्या अर्थाने तिला आशीर्वाद मिळतोय.
View this post on Instagram
ही बातमी वाचा :
अदिती राव हैदरी सिद्धार्थनं केला राजस्थानच्या किल्ल्यात पुन्हा शाही विवाह, पहा फोटोज