Lock Up : करणवीर बोहराच्या 'या' वक्तव्यावर कंगनाने शिकवला धडा, म्हणाली ...
Lock Up : कंगना राणौतचा 'लॉक अप' हा शो सध्या खूप चर्चेत आहे. कंगनाच्या या शोमध्ये स्पर्धक रोमान्सही करत आहेत आणि अनेक खुलासेही करत आहेत.असाच खुलासा टेलिव्हिजन अभिनेता करणवीर बोहरा याने केला आहे.
Lock Up Show : कंगना रानौतचा (Kangna Ranaut) 'लॉक अप' (Lock Up Show) हा शो सध्या खूप चर्चेत आहे. कंगनाच्या या शोमध्ये स्पर्धक रोमान्सही करत आहेत आणि खुलासेही करत आहेत. अलीकडेच, टेलिव्हिजन अभिनेता करणवीर बोहरा (Karanvir Bohra) याने शोमध्ये स्वतःशी संबंधित असा खुलासा केला आहे की, सर्वजण आश्चर्यचकित झाले आहेत. हा खुलासा केल्यामुळे करणही गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. करणच्या या खुलाशाने शोच्या होस्ट कंगनाचेही लक्ष वेधून घेतले. वीकेंडच्या एपिसोडमध्ये कंगना करणला याचा खुलासा करताना दिसली होती. करण मोठ्या थाटात बोलणार आहे, यासाठी त्याला नंतर पश्चाताप करावा लागेल, असे कंगनाने म्हटले आहे.
आपला मुद्दा सांगताना, कंगनाने प्रथम करणचे या धाडसाचे कौतुक केले की तो या शोमध्ये त्याच्या आयुष्यातील अनेक गुपित रहस्य उघड करत आहे. पण भविष्यात असे केल्याचा पश्चाताप होऊ शकतो, असा इशाराही कंगनाने दिला आहे. कंगना म्हणाली, तू जे मोठ्या थाटात बोलतोयस याचा तुला नंतर पश्चाताप होईल."
View this post on Instagram
काय होते करणवीरचे रहस्य ?
शोमध्ये करणने खुलासा केला आहे की, सध्या तो खूप कर्जात बुडाला आहे. करणने असेही सांगितले की, त्याच्यावर तीन-चार केसेस आहेत. करणने सांगितले होते, 'मी माझ्या आयुष्यातील सर्वात वाईट कर्जात आहे. म्हणजे मी कर्जात वाहून गेलो आहे. कर्ज फेडता न आल्याने माझ्यावर तीन-चार केसेस झाल्या आहेत. 2015 पासून मी जे काही काम करत आहे ते फक्त माझे ऋण फेडण्यासाठी आहे. मी त्यांना जे काही देत आहे त्याबद्दल मला स्वतःसाठी आणि माझ्या कुटुंबासाठी खूप वाईट वाटत आहे. माझ्या जागी दुसरे कोणी असते तर मी आत्महत्या केली असती. माझ्यासाठी हा शो खूप महत्वाचा आहे.
महत्वाच्या बातम्या :
- The Kashmir Files : 'द कश्मीर फाइल्स'वर न्यूझीलंडमध्ये बंदी, माजी उपपंतप्रधानांकडून निषेध
- World Tv Premiere : 'पुष्पा- द राइज' आणि '83'चा आज होणार वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमिअर
- 'द कश्मीर फाइल्समध्ये अनेक गोष्टी असत्य, पण..'. संजय राऊत थेटच बोलले
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha