The Kashmir Files : 'द कश्मीर फाइल्स'वर न्यूझीलंडमध्ये बंदी, माजी उपपंतप्रधानांकडून निषेध
The Kashmir Files : 'द कश्मीर फाइल्स' या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर 100 कोटींचा टप्पा पार केला आहे.
The Kashmir Files : सध्या चर्चेत असलेल्या 'द कश्मीर फाइल्स' (The Kashmir Files) सिनेमाच्या प्रदर्शनावर न्यूझीलंडमध्ये बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे न्यूझीलंडचे माजी उपपंतप्रधान विन्स्टन पीटर्स (Winston Peters) यांनी निषेध केला आहे. काश्मिरी पंडितांवर भाष्य करणारा हा सिनेमा 11 मार्चला जगभरात प्रदर्शित झाला. सिनेमा प्रदर्शित झाल्यापासूनच हा सिनेमा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे.
न्यूझीलंडचे माजी उपपंतप्रधान विन्स्टन पीटर्स म्हणाले, 'द कश्मीर फाइल्स' हा सिनेमा सेन्सॉर करणे म्हणजे न्यूझीलंडमधील नागरिकांच्या स्वातंत्र्यावर हल्ला करणे होय. विन्स्टन पीटर्स यांनी फेसबुक पोस्टच्या माध्यमातून त्यांचे मत व्यक्त केले आहे. फेसबुक पोस्टमध्ये त्यांनी लिहिले आहे, 'द कश्मीर फाइल्स' या सिनेमाला सेन्सॉर करणे म्हणजे न्यूझीलंडमधील 15 मार्चच्या अत्याचाराची माहिती सेन्सॉर करणे होय.
विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित 'द कश्मीर फाइल्स' हा सिनेमा सध्या चर्चेत आहे. या सिनेमाने आतापर्यंत बॉक्स ऑफिसवर100 कोटींचा टप्पा पार केला आहे. हा सिनेमा भाजपच्या काही राज्यांत करमुक्त करण्यात आला आहे. अनेक ठिकाणी 'द कश्मीर फाइल्स' सिनेमाचे खास आयोजित करण्यात येत आहेत.
'द कश्मीर फाइल्स' या सिनेमात अनुपम खेर, दर्शन कुमार, मिथुन चक्रवर्ती आणि पल्लवी जोशी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. या सिनेमाच्या कलेक्शनमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. अनेक बिग बजेट सिनेमांना या सिनेमाने मागे टाकले आहे. हा सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे.
संबंधित बातम्या
'द कश्मीर फाइल्समध्ये अनेक गोष्टी असत्य, पण..'. संजय राऊत थेटच बोलले
World Tv Premiere : 'पुष्पा- द राइज' आणि '83'चा आज होणार वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमिअर
The Kashmir Files : 'द कश्मीर फाइल्स' ला गर्दी कोणाची? भाजपची की सामान्य प्रेक्षकांची?
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha