Lataa Saberwal Face Surgery : वयाच्या 43 व्या वर्षी केली फेस सर्जरी नंतर, झाला पश्चाताप; ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ फेम अभिनेत्रीनं सांगितला अनुभव
नुकत्याच एका व्लॉगमध्ये लतानं तिच्या फेस सर्जरीबद्दल सांगितलं.
Lataa Saberwal Face Surgery : प्रसिद्ध अभिनेत्री लता सभरवालला (Lataa Saberwal) ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ (Yeh Rishta Kya Kehlata Hai) या मालिकेमुळे विशेष लोकप्रियता मिळाली. या मालिकेमध्ये तिनं हिना खानच्या (Hina Khan) आईची भूमिका साकारली होती. तसेच लतानं अनेक चित्रपटांमध्ये देखील काम केलं आहे. विवाह आणि इश्क विश्क या चित्रपटांमध्ये लतानं महत्त्वाची भूमिका साकारली. सध्या लतानं मालिकांमधून ब्रेक घेतला आहे. ती सध्या सोशल मीडियावर स्किन संबंधित व्लॉग शेअर करते. नुकत्याच एका व्लॉगमध्ये लतानं तिच्या फेस सर्जरीबद्दल सांगितलं.
लता सभरवालचे एक युट्यूब चॅनल आहे. या चॅनलच्या एका व्हिडीओमध्ये लतानं तिची बोटॉक्स स्टोरी शेअर केली. लतानं सांगितलं की वयाच्या 43 व्या वर्षी तिनं चेहऱ्याची सर्जरी केली. ती म्हणाली, 'माझ्या डोळ्यांच्या खालच्या बाजूला रेषा दिसत होत्या. बाकी सर्व ठिक होते फक्त डोळ्याच्या खाली रेष दिसत होत्या आणि ते मला विचित्र वाटतं होतं. मी हेल्दी फूड खाते तसेच व्यायाम देखील करते. पण डोळ्या खाली आलेल्या रेषा पाहून मला विचित्र वाटतं होतं. मला वाटलं की माझं वय वाढत आहे, त्यामुळे असं दिसत आहे. मला हे स्वीकारावं लागेल.'
पुढे लता म्हणाली, डोळ्याच्या खाली आलेल्या रेषांमुळे मला अस्वस्थ वाटत होतं. त्यानंतर मी सर्जरी करायचा विचार केला. मी माझ्या एका जवळच्या मित्रासोबत चर्चा केली की, इतर अभिनेत्री त्यांचा चेहरा सुंदर होण्यासाठी काय करतात? पण नंतर मी डॉक्टरांचा सल्ला घेण्याचा निर्णय घेतला. मी डॉक्टरांना भेटायला गेले. तेव्हा मला त्यांनी सांगितलं की सगळे जण करतात. ही नॉर्मल गोष्ट आहे. मी घरी येऊन या गोष्टीचा विचार केला. डॉक्टरांकडे जाऊन मी पुन्हा त्यांच्यासोबत चर्चा केली. त्यांनी सांगितलं की बोटॉक्स केल्यानंतर नशा होते. दर सहा महिन्यांनी तुम्हाला बोटॉक्स करावं लागेल. इंडस्ट्रीमध्ये काम करण्यासाठी सुंदर दिसणं गरजेचं असतं पण मला काळजी वाटत होती '
पाहा व्हिडीओ:
बोटॉक्स केल्यानंतर झाला पश्चाताप
'त्याने माझ्या दोन्ही डोळ्यांजवळ प्रत्येकी एक इंजेक्शन दिले. बोटॉक्स घेतल्यानंतर, मला माझी त्वचा खूप चांगले झाली आहे, असं वाटलं. पण हळूहळू याचा मला त्रास होऊ लागला. माझ्या ओळींचा मला जितका त्रास होत नव्हता तितकाच मला ही कृत्रिम गोष्ट करून घेतल्यानंतर झाला. हे दडपण मला जाणवू लागले. नंतर माझ्या लक्षात आले की मी आहे त्या गोष्टींचा स्वीकार केला पाहिजे.' असं लतानं शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये सांगितलं.
वाचा इतर महत्त्वाच्या बातम्या:
Swathi Sathish Surgery : सर्जरी करणं पडलं महागात; कन्नड अभिनेत्री स्वाती सतीशचा चेहरा बिघडला