Lakshmichya Pavalani : अखेर अद्वैतसमोर आली नयना, कला शोधून काढणार सगळ्यामागचा खरा चेहरा, 'लक्ष्मीच्या पाऊलांनी' मालिकेत सत्य येणार का चांदेकरांसमोर?
Lakshmichya Pavalani : लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेतमध्ये लग्नांनंतर अखेरीस नयना अद्वैतच्या समोर आली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा अद्वैत खरे कुटुंबियावर फसणवूक केल्याचा आरोप करतो.
Lakshmichya Pavalani : स्टार प्रवाह (Star Pravah) वाहिनीवरील लक्ष्मीच्या पाऊलांनी (Lakshmichya Pavalani) मालिकेत नयना ही अखेरीस अद्वैतच्या समोर आली आहे. ज्या नयानामुळे कला आणि अद्वैतच्या नात्याला सुरुवात झाली ती नयना अखेरीस अद्वैतच्या समोर आलीये.त्यामुळे पुन्हा एकदा अद्वैत खरे कुटुंबावर फसणूक केल्याचा आरोप करतो. तर त्यावेळी कला या सगळ्या मागचा खरा शोधून काढणार असल्याचं म्हणते.
दरम्यान या सगळ्यामध्ये नयना कलालाच दोषी ठरवत तिला श्रीमंतीचा हव्यास असल्यामुळे तिने अद्वैतसोबत लग्न केल्याचं म्हणते. त्यावर कला देखील नयनाला जशाच तसं उत्तर देतं. पण अद्वैतला नयना जे कलाविषयी सांगते ते खरं वाटतं. कलाही तेव्हा तिला श्रीमंतीचा अजिबात हव्यास नसून, काका गेल्यापासून तिला श्रीमंत लोकांचा राग असल्याचं ती सांगते.
अद्वैत कलाला एकटीला सोडून जाणार
खरेंच्या घरी हे सगळं झाल्यानंतर कलाला अद्वैत खरेंच्या घरी एकटीला सोडून जातो. त्यावेळी शेजारचे येऊन संगिताला टोमणे मारतात. पण त्यावेळी कला चांदेकरांच्या घरी परत जाण्याचा निर्णय घेते. आजोबा देखील सरोज आणि अद्वैतला तुम्ही जर घरच्या सुनेला परत आणायला जाणार नसाल तर मी जाऊन घेऊन येईन असं म्हणतात. तेवढ्यातच पुन्हा चांदेकरांच्या घरी परतते.
कलाच्या घरी नयनामुळे पुन्हा गोंधळ
आजोबांच्या सांगण्यावरुन लग्नानंतर अद्वैत कलाला घेऊन तिच्या माहेरी जातो. त्यावेळी त्याला नयना घरीच असल्याचा संशय येतो. त्यावरुन अद्वैत कलाच्याच घरी राहण्याचा निर्णय घेतो. त्यातच दुसऱ्या दिवशी नयना घरी येतो आणि पुन्हा अद्वैत खरेंवर चिडतो. हा सगळा खरेंचाच डाव असल्याचं अद्वैत म्हणतो. नयनामुळे पुन्हा एकदा कलाच्या अडचणीत वाढ होणार असल्याचं पहायला मिळतं.
'लक्ष्मीच्या पाऊलांनी' मालिकेची स्टार कास्ट
अक्षर कोठारी, ईशा केसकर, दिपाली पानसरे आणि किशोरी आंबिये हे कलाकार लक्ष्मीच्या पाऊलांनी या मालिकेत प्रमुख भूमिका साकारत आहेत. या मालिकेच्या आगामी एपिसोडची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. अभिनेत्री इशा केसकर ही "लक्ष्मीच्या पावलांनी' या मालिकेत कला खरे ही भूमिका साकारत आहे.
'स्टार प्रवाह' (Star Pravah) वाहिनीवरील 'लक्ष्मीच्या पावलांनी' (Lakshmichya Pavalani) मालिका ही अल्पावधीच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. तीन बहिणी आणि त्यांच्या आईची मुलींच्या लग्नासाठी सुरु असलेली धडपड असा सर्वसाधारणपणे आशय आणि गोष्ट या मालिकेची आहे.