एक्स्प्लोर

Lakshmichya Pavalani: ‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’ मालिकेत लगीनघाई; नयना आणि अद्वैतच्या लग्नात येणार नवा ट्विस्ट

Lakshmichya Pavalani: आता नयना आणि अद्वैत यांच्या लग्नात मोठा ट्विस्ट येणार आहे. 

Laxmichya Paulanni: छोट्या पडद्यावरील लक्ष्मीच्या पाऊलांनी (Lakshmichya Pavalani) मालिकेत नयना आणि अद्वैतच्या लग्नाची धामधूम सुरु आहे. लग्न जरी नयना आणि अद्वैतचं होणार असलं तरी योगायोगाने कला आणि अद्वैतला आयुष्यभरासाठी एकत्र आणणाऱ्या घटना घडताना दिसत आहेत. साखरपुड्याची अंगठी अद्वैतकडून नयनाऐवजी कलाच्या बोटात घातली गेली. लग्नाची उष्टी हळदही नयनाऐवजी कलाला लागली. आता नयना आणि अद्वैत यांच्या लग्नात मोठा ट्विस्ट येणार आहे. 

अद्वैतच्या घरात लक्ष्मीच्या पाऊलांनी कोण येणार?

नियतीच्या मनातही अद्वैत आणि कलाने एकत्र यावं ही एकच इच्छा आहे. साखरपुडा, हळद आणि संगीत तर पार पडलंय. त्यामुळे आता उत्सुकता आहे ती लग्नाची. नयना आणि अद्वैतच्या लग्नासाठी मंडप सजलाय. वऱ्हाडीही जमलेत. त्यामुळे अद्वैतच्या घरात लक्ष्मीच्या पाऊलांनी नयना येणार की कला?  हे लवकरच स्पष्ट होईल. त्यासाठी पाहायला विसरु नका लक्ष्मीच्या पाऊलांनी मालिका.

'लक्ष्मीच्या पाऊलांनी' मालिकेची स्टार कास्ट

अक्षर कोठारी ईशा केसकर दिपाली पानसरे आणि किशोरी आंबिये हे कलाकार लक्ष्मीच्या पाऊलांनी या मालिकेत प्रमुख भूमिका साकारत आहेत. या मालिकेच्या आगामी एपिसोडची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Star Pravah (@star_pravah)

अभिनेत्री इशा केसकर ही "लक्ष्मीच्या पावलांनी' या मालिकेत  कला खरे ही भूमिका साकारत आहे. या भूमिकेबद्दल इशानं सांगितलं होतं, "नावाप्रमाणेच कला एक उत्तम कलाकार आहे. तिला हातकाम, रंगकला आणि चित्रकलेची आवड आहे. ती देवीची मूर्ती आणि दागिने घडवते. अंबाबाईच्या देवळाबाहेर कलाचं दागिन्यांचं दुकान आहे."

अद्वैतच्या लग्नात होणार सायली आणि अर्जुनची एन्ट्री

अद्वैतच्या लग्नात ठरलं तर मग मालिकेतील सायली आणि अर्जुन यांची देखील एन्ट्री होणार आहे, असं म्हटलं जात आहे. ठरलं तर मग   या मालिकेच्या कथानकाला आणि मालिकेमधील कलाकारांच्या अभिनयाला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली आहे. या मालिकेमध्ये अमित भानुशाली,चैतन्य सरदेशपांडे , ज्योती चांदेकर हे कलाकार देखील प्रमुख भूमिका साकारतात. 

वाचा इतर महत्वाच्या बातम्या:

Jui Gadkari: "तुझा घटस्फोट झालाय का?", "तुझी पहिली कमाई किती?"; नेटकऱ्यांच्या प्रश्नांना 'ठरलं तर मग' फेम जुई गडकरीनं दिली उत्तरं

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Bigg Boss Marathi 6, Rakhi Sawant: 'बिग बॉस'च्या घरातलं धक्कादायक एव्हिक्शन; सारखं काहीना काही उकरुन काढून घरात गोंधळ घालणारी वाईल्ड कार्ड स्पर्धक आऊट
'बिग बॉस'च्या घरातलं धक्कादायक एव्हिक्शन; सारखं काहीना काही उकरुन काढून घरात गोंधळ घालणारी वाईल्ड कार्ड स्पर्धक आऊट
Gaurav More: गौरव मोरेनं गुपचूप उरकलं लग्न, अजूनही लपवून ठेवलं, कारण काय? अभिनेता म्हणाला, 'काही गोष्टी...'
गौरव मोरेनं गुपचूप उरकलं लग्न, अजूनही लपवून ठेवलं, कारण काय? अभिनेता म्हणाला, 'काही गोष्टी...'
Bigg Boss Marathi: 'बिग बॉस मराठी' अंतिम टप्प्यावर, Top 5 स्पर्धकांची नावं समोर; बॉटम 2 स्पर्धक कोण? कुणाचा प्रवास संपणार?
'बिग बॉस मराठी' अंतिम टप्प्यावर, Top 5 स्पर्धकांची नावं समोर; बॉटम 2 स्पर्धक कोण? कुणाचा प्रवास संपणार?
Aarya Ambekar: आर्या आंबेकरचा मालिकेतून सुरेल प्रवास, सांगितला ‘कमळी’ टीमसोबतचा खास अनुभव; म्हणाली..
आर्या आंबेकरचा मालिकेतून सुरेल प्रवास, सांगितला ‘कमळी’ टीमसोबतचा खास अनुभव; म्हणाली..

व्हिडीओ

Yavatmal Water Issue : पाण्यासाठी वणवण, लालफितीची अडचण Special Report
Ashok Kharat Case : कारनामे नवीन कोट्यवधींची जमीन, कल्पना खरात अजूनही फरार Special Report
Sangli Old Age Home : सांगलीत उभी राहिली ज्येष्ठांसाठी आनंदशाळा, सर्वत्र कौतुक Special Report
US Talks Fail : टॉक्स वाया, सरसावल्या बाह्या, वाटाघाटीत अपयश, पुन्हा शाब्दिक हल्ले Special Report
Pakistan On US Iran Talks : बेगानी दलाली मे पाकिस्तान दिवाना Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Noida Worker Protest: 'दिवसाला 10-12 तास काम, 25 हजार सांगतात आणि हातावर 15 हजार टेकवतात आणि 250 ची वाढ करतात' नोएडामधील सहा खासगी कंपन्यांविरोधात आक्रोश केलेल्या कामगारांची व्यथा
'दिवसाला 10-12 तास काम, 25 हजार सांगतात आणि हातावर 15 हजार टेकवतात आणि 250 ची वाढ करतात' नोएडामधील सहा खासगी कंपन्यांविरोधात आक्रोश केलेल्या कामगारांची व्यथा
Asha Bhosle and Uddhav Thackeray: आशाताईंना शेवटचा निरोप द्यायला आवडता चाफ्याचा हार घेऊन पोहोचले, उद्धव ठाकरेंच्या डोळ्यांच्या कडा पाणावल्या, हळूच चष्मा बाजूला सारुन डोळे पुसले
आशाताईंना शेवटचा निरोप द्यायला आवडता चाफ्याचा हार घेऊन पोहोचले, उद्धव ठाकरेंच्या डोळ्यांच्या कडा पाणावल्या, हळूच चष्मा बाजूला सारुन डोळे पुसले
Vaibhav Sooryavanshi: थेट बुमराहला 'अस्मान' दाखवणाऱ्या वैभव सूर्यवंशीच्या हातात बॅटरुपी 'बुलडोझर'! आयपीएलमध्ये तब्बल 19 गोलंदाजांची धुलाई, फक्त या 4 जणांना रोखण्यात यश
थेट बुमराहला 'अस्मान' दाखवणाऱ्या वैभव सूर्यवंशीच्या हातात बॅटरुपी 'बुलडोझर'! आयपीएलमध्ये तब्बल 19 गोलंदाजांची धुलाई, फक्त या 4 जणांना रोखण्यात यश
Gold-Silver Price : दागिने खरेदीची सुवर्णसंधी! सोन्या-चांदीच्या किमती गडगडल्या, जाणून घ्या आजचा भाव
दागिने खरेदीची सुवर्णसंधी! सोन्या-चांदीच्या किमती गडगडल्या, जाणून घ्या आजचा भाव
Chandra Kumar Bose: नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या नातवाचा तृणमुल काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश; म्हणाले, 'भाजपचं विभाजनकारी जातीय द्वेषाचं राजकारण, आपल्याला भारताला वाचवण्यासाठी लढायचं आहे'
नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या नातवाचा तृणमुल काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश; म्हणाले, 'भाजपचं विभाजनकारी जातीय द्वेषाचं राजकारण, आपल्याला भारताला वाचवण्यासाठी लढायचं आहे'
Asha Bhosle Funeral: लाडक्या आजीला शेवटचं पाहून जनाईला अश्रू अनावर; आशा भोसलेंचं पार्थिव पाहून सारेच गलबलून गेले
लाडक्या आजीला शेवटचं पाहून जनाईला अश्रू अनावर; आशा भोसलेंचं पार्थिव पाहून सारेच गलबलून गेले
उत्तर प्रदेशात पगारवाढीसाठी सहा कंपन्यातील कामगारांचा एकाचवेळी उद्रेक; पोलिसांची वाहने उलथवून टाकली, कंपनीवर तुफान दगडफेक, महिला कर्मचारी सुद्धा रस्त्यावर
उत्तर प्रदेशात पगारवाढीसाठी सहा कंपन्यातील कामगारांचा एकाचवेळी उद्रेक; पोलिसांची वाहने उलथवून टाकली, कंपनीवर तुफान दगडफेक, महिला कर्मचारी सुद्धा रस्त्यावर
Iran War Live Update: आकाशातून 40 दिवस रक्तरंजित संघर्षानंतर आता पर्शियन समुद्रामध्ये सुद्धा घनघोर संघर्ष सुरू होणार? 'होमुर्झ'वरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
आकाशातून 40 दिवस रक्तरंजित संघर्षानंतर आता पर्शियन समुद्रामध्ये सुद्धा घनघोर संघर्ष सुरू होणार? 'होमुर्झ'वरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
Embed widget