Jui Gadkari: "तुझा घटस्फोट झालाय का?", "तुझी पहिली कमाई किती?"; नेटकऱ्यांच्या प्रश्नांना 'ठरलं तर मग' फेम जुई गडकरीनं दिली उत्तरं
Jui Gadkari: जुईनं इन्साटग्रामवर नेटकऱ्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं दिली आहेत.

Jui Gadkari: अभिनेत्री जुई गडकरी (Jui Gadkari) ही सध्या 'ठरलं तर मग' (Tharala Tar Mag) या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या मालिकेला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. या मालिकेत जुई ही सायली अर्जुन सुभेदार ही भूमिका साकारते. जुई ही सोशल मीडियावर ठरलं तर मग या मालिकेच्या सेटवरील फोटो अनेकवेळा सोशल मीडियावर शेअर करते. तिनं शेअर केलेल्या फोटोवर नेटकरी लाइक्स आणि कमेंट्स वर्षाव करत असतात. जुईनं आता इन्साटग्रामवर नेटकऱ्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं दिली आहेत.
नेटकऱ्यांच्या प्रश्नांना जुईनं दिली उत्तरं
इन्स्टाग्रामवर एका नेटकऱ्यानं जुईला प्रश्न विचारला, "तुझी पहिली कमाई किती आहे?" या प्रश्नाचं जुईनं उत्तर दिलं, 800 रुपये. 2 रीत असताना शोमध्ये गायले होते, तेव्हा त्याचे 800 रुपये मिळाले होते. 500 पेमेंट आणि 300 बक्षीस."

दुसऱ्या युझरनं जुईला प्रश्न विचारला, "तुझा घटस्फोट झालाय का?" या प्रश्नाचं जुईनं उत्तर दिलं, "आहो आधी लग्न तर होऊद्या ओ!" जुईनं या रिप्लाय सोबत काही लाफ्टर इमोजी देखील शेअर केले.

"तुझा पहिला क्रश कोण आहे?" असा प्रश्न देखील एका नेटकऱ्यानं जुईला विचारला. या प्रश्नाला जुईनं उत्तर दिलं," Guy Rodrigues, आमचे म्युझिक सर"
View this post on Instagram
'ठरलं तर मग' मालिकेची स्टार कास्ट
जुईची ठरलं तर मग ही प्रेक्षकांची मनं जिंकत आहे. या मालिकेच्या कथानकाला आणि मालिकेमधील कलाकारांच्या अभिनयाला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली आहे. या मालिकेमध्ये अमित भानुशाली,चैतन्य सरदेशपांडे , ज्योती चांदेकर हे कलाकार देखील प्रमुख भूमिका साकारतात.
जुईनं 'या' मालिकांमध्ये केलं काम
जुई गडकरीला पुढचं पाऊल या मालिकेमुळे देखील विशेष लोकप्रियता मिळाली. या मालिकेत जुईनं कल्याणी सरदेशमुख ही भूमिका साकारली होती. तसेच जुईनं बिग बॉस मराठी या कार्यक्रमाच्या पहिल्या सीझनमध्ये देखील सहभाग घेतला होता. माझिया प्रियाला प्रीत कळेना,सरस्वती,वर्तुळ या मालिकेत देखील जुईनं महत्वाची भूमिका साकारली. जुई तिच्या अभिनयानं प्रेक्षकांची मनं जिंकते.
वाचा इतर महत्वाच्या बातम्या:
Jui Gadkari: "2 ते 4 या वेळेत सेटवर..."; ठरलं तर मग फेम जुई गडकरीनं शेअर केला मजेशीर व्हिडीओ























