(Source: ECI/ABP News/ABP Majha)
लागिरं झालं जी फेम अभिनेत्याचं "टॅलेंट"; पॅरा पॉवरलिफ्टिंग चॅम्पियनशिपमध्ये पटकावले गोल्ड मेडल, म्हणाला, " उंचीमुळे शाळेत ..."
Mahesh Jadhav: महेश हा सध्या त्याच्या सोशल मीडियावरील पोस्टमुळे चर्चेत आहेत. या पोस्टच्या माध्यमातून महेशनं त्याच्या दुसरी इनिंगची माहिती दिली आहे.
Mahesh Jadhav: छोट्या पडद्यावरील लागिरं झालं जी (Lagira Zala Ji) या मालिकेला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली होती. या मालिकेतील शितल आणि अजिंक्य ही जोडी प्रेक्षकांना आवडली. या मालिकेत अभिनेता महेश जाधवनं (Mahesh Jadhav) "टॅलेंट" ही भूमिका साकारली होती. महेश हा सध्या त्याच्या सोशल मीडियावरील पोस्टमुळे चर्चेत आहेत. या पोस्टच्या माध्यमातून महेशनं त्याच्या दुसरी इनिंगची माहिती दिली आहे. महेशनं 2nd महाराष्ट्र राज्य पॅरा पॉवरलिफ्टिंग चॅम्पियनशिप 2023- 24 या स्पर्धेत गोल्ड मेडल पटकावले आहे.
महेशनं सोशल मीडियावर त्याचे काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये महेशच्या गळ्यात मेडल दिसत आहे. या फोटोला महेशनं कॅप्शन दिलं, "उंचीमुळे" शाळेत प्रार्थनेच्या रांगेत नं. 1 ला उभा, आज तुमच्यासमोर हे गोल्ड घेऊन उभा "फाइटमुळे" आज तुम्हाला सांगायला आनंद होताये की, 2nd Maharashtra State Para Powerlifting Championship 2023- 24 काल कल्याण येथे झाली त्यामध्ये Men's 49Kg मध्ये मी Gold मेडल मिळवले. यामागे खुप मेहनत तर आहेच पण त्याचबरोबर खुप लोकांचा सल्ला, मार्गदर्शन पण आहे यात मला माझे ट्रेनर कलीम सर ,माझा मित्र विनोद तावरे याचे खूप सहकार्य मिळाले.तसेच एखाद्या खेळाडूला प्रॅक्टिस, वर्क आऊटबरोबर डाएट पण खुप महत्वाचे असतो तशी माझी हे खा हे खाऊ नको बघणारी डॉ.पौर्णिमा डे आणि मला कायम सपोर्ट करत आलेला खुप मोठ्ठा मित्रपरिवार,या सगळ्यांचा मी आभारी आहे. आणि तुम्ही प्रेक्षक कायम माझ्यावर प्रेम करत आला आहात, तर ही दुसरी इनिंग तुम्हाला नक्कीच आवडेल अशी आशा व्यक्त करतो."
View this post on Instagram
महेशच्या पोस्टवर नेटकऱ्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. महेशनं शेअर केलेल्या पोस्टला कमेंट करुन नेटकऱ्यांनी त्याला शुभेच्छा दिल्या आहेत, तसेच कौतुक देखील केलं आहे. महेश हा काही महिन्यांपूर्वी रिलीज झालेल्या फकाट या चित्रपटामधून प्रेक्षकांच्या भेटीस आला. तसेच त्यानं माऊली या चित्रपटामध्ये आणि कारभारी लय भारी या मालिकेमध्ये देखील काम केलं.
इतर महत्वाच्या बातम्या: