Kunya Rajachi Ga Tu Rani: 'कुन्या राजाची गं तू रानी' मालिका येणार प्रेक्षकांच्या भेटीस; हर्षद अतकरी, शर्वरी जोग प्रमुख भूमिकेत
कुन्या राजाची गं तू रानी (Kunya Rajachi Ga Tu Rani) ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.
Kunya Rajachi Ga Tu Rani: छोट्या पडद्यावरील विविध मालिकांना प्रेक्षकांची पसंती मिळते. या मालिका प्रेक्षक आवडीनं बघतात. आता लवकरच कुन्या राजाची गं तू रानी (Kunya Rajachi Ga Tu Rani) ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या मालिकेचा प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
दुर्वा आणि फुलाला सुगंध मातीचा मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस आलेला अभिनेता हर्षद अतकरी (Harshad Atkari) हा राजाची गं तू रानी या मालिकेत प्रमुख भूमिका साकारणार आहे. या नव्या मालिकेत हर्षद हरहुन्नरी पत्रकाराची भूमिका साकारणार आहे. दुर्वा मालिकेतील केशव आणि फुलाला सुगंध मातीचा मालिकेतील शुभम या त्याने साकारलेल्या भूमिकांवर प्रेक्षकांनी भरभरुन प्रेम केलंय. कुन्या राजाची गं तू रानी या मालिकेतील तो साकारत असलेलं कबीर हे पात्र अतिशय वेगळं आहे. त्यामुळे हर्षद आता कबीरच्या रुपात प्रेक्षकांना दररोज भेटणार आहे.
कुन्या राजाची गं तू रानी (Kunya Rajachi Ga Tu Rani) मालिकेतील या भूमिकेविषयी सांगताना हर्षद म्हणाला, ‘कबीर हे पात्र मी आजवर साकारलेल्या भूमिकांपेक्षा वेगळं आहे. कबीर हा तळागाळात जाऊन काम करणारा पत्रकार आहे. मालिकेचं कथानकही खूप छान आहे. कामावर प्रचंड प्रेम करणारा असा हा कबीर साकारताना नवनव्या गोष्टी शिकायला मिळत आहेत. फुलाला सुगंध मातीचा मालिका संपल्यानंतर पुन्हा कधी भेटीला येणार याची सतत विचारणा होत होती. योग्य वेळी ही सुवर्णसंधी चालून आली आणि मी तातडीने या भूमिकेसाठी होकार दिला. माझ्या याआधीच्या भूमिकांवर प्रेक्षकांनी भरभरुन प्रेम केलं आहे. हेच प्रेम कुन्या राजाची गं तू मालिकेतील कबीरवर करतील याची खात्री आहे.'
पाहा प्रोमो
View this post on Instagram
कुन्या राजाची गं तू रानी या मालिकेच्या प्रोमोमध्ये अभिनेत्री शर्वरी जोग देखील दिसत आहे. शर्वरीनं या आधी जीव झाला येडापिसा या मालिकेत काम केलं आहे. कुन्या राजाची गं तू रानी ही मालिका 18 जुलै पासून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.
इतर महत्वाच्या बातम्या:
Tharala Tar Mag : 'ठरलं तर मग' महाराष्ट्राची नंबर वन मालिका; जाणून घ्या TRP Report...