एक्स्प्लोर

Kon Honar Crorepati : 'कोण होणार करोडपती'चा कर्मवीर विशेष भाग रंगणार शनिवारी; अधिक कदम यांची उपस्थिती

Kon Honar Crorepati : 'कोण होणार करोडपती' या कार्यक्रमाच्या विशेष भागात अधिक कदम हजेरी लावणार आहेत.

Kon Honar Crorepati : 'कोण होणार करोडपती' (Kon Honar Crorepati) हा कार्यक्रम आता प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. हा कार्यक्रम अनेकांसाठी स्वप्नपूर्तीचा मंच ठरतो आहे. जनसामान्यांचा लोकप्रिय कार्यक्रम म्हणजे 'कोण होणार करोडपती'. या आठवड्यात  ‘कोण होणार  करोडपती’मध्ये शनिवारच्या ‘कर्मवीर विशेष भागात' कर्मवीरच्या रूपात अधिक कदम (Adhik Kadam) हॉटसीटवर येणार आहेत.

काश्मिरी मुलींसाठी 'बॉर्डरलेस वर्ल्ड फाउंडेशन' या संस्थेच्या माध्यमातून लक्षणीय कामगिरी करणारे अधिक कदम या आठवड्यातले कर्मवीर आहेत. अधिक कदम यांचा जन्म वारकरी संप्रदायात झाल्याने घरामध्ये लहानपणापासून आध्यात्मिक वातावरण आहे. ते पखवाज आणि मृदंग उत्तम वाजवतात. कुठल्याही भक्तीचा पाया हा कार्यकर्तृत्वाचा असतो, असे त्यांचे मत आहे. विठ्ठलाच्या नामस्मरणात ते कायम दंग होतात.

आषाढवारीनिमित्त होणार अनोख्या विठ्ठलभक्तीचे दर्शन

'कोण होणार करोडपती'च्या मंचावर आषाढवारीनिमित्त एका अनोख्या विठ्ठलभक्तीचे दर्शन होणार आहे. 18 दिवसांसाठी काश्मीरमध्ये गेलेले अधिक कदम तिथली परिस्थिती आणि घटना पाहून तिथेच राहिले. ज्या गावात हजारपेक्षा जास्त पुरुषांना आतंकवाद्यांनी मारले, त्या गावात ते राहिले. आतंकवादी अधिक यांना 19 वेळा घेऊन गेले आहेत. तिथे असणाऱ्या सैनिकांची वाईट अवस्था आणि यासारखे अनेक किस्से त्यांनी 'कोण होणार करोडपती' या कार्यक्रमात कथन केले आहेत. 

View this post on Instagram
 
A post shared by Sony मराठी (@sonymarathi)

अधिक कदम यांचे अचंबित करणारे अनुभव 

'कोण होणार करोडपती'च्या याही पर्वात दर आठवड्यातल्या शनिवारच्या भागात विशेष पाहुणे सहभागी  होणार आहेत. समाजाच्या कल्याणासाठी झटणाऱ्या सामान्यांमधल्या असामान्य व्यक्तींची भेट आणि त्यांचे कार्य या कर्मवीर विशेष भागांतून प्रेक्षकांसमोर येणार आहे. या पर्वातल्या कर्मवीर विशेष भागात अधिक कदम सहभागी होणार आहेत. 'कोण होणार करोडपती'च्या खेळाबरोबरच अधिक कदम यांचे अचंबित करणारे अनुभव प्रेक्षकांना जाणून घेता येणार आहेत. 

अहमदनगर ते थेट काश्मीरमधील कुपवाडा असा प्रवास करणारे अधिक कदम त्या भागात 'अधिक भैय्या' म्हणून प्रसिद्ध आहेत.  'बॉर्डरलेस वर्ल्ड फाउंडेशन' या संस्थेच्या माध्यमातून ते काश्मिरी मुलींच्या शिक्षणाची जबाबदारी उचलतात. कारण जम्मू-काश्मीरमध्ये फक्त स्त्रिया बदल घडवू शकतात, यावर त्यांचा ठाम विश्वास आहे. आत्तापर्यंत अधिक यांच्या संस्थेने 167 मुलींना स्वतःच्या पायावर उभे करून त्यांची लग्नं लावून दिली आहेत. तर सध्या 230 मुली हॉस्टेलमध्ये राहून त्यांच्या आवडीचं शिक्षण घेत आहेत. अधिक कदम यांचे हे सगळे अनुभव 'कोण होणार करोडपती'च्या मंचावरून ऐकता येणार आहेत. 

संबंधित बातम्या

Kon Honar Crorepati : मुलांच्या शैक्षणिक खर्चासाठी ललिता खेळणार 'कोण होणार करोडपती'; मांडणार शेतकर्‍यांच्या कुटुंबाची व्यथा

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sharad Pawar In Chandgad : नंदाताई तुमच्या माझ्या कन्या आहेत; फसवणूक करणाऱ्यांना शिक्षा द्यायची असेल तर निवडून द्या; शरद पवारांची चंदगडकरांना साद
नंदाताई तुमच्या माझ्या कन्या आहेत; फसवणूक करणाऱ्यांना शिक्षा द्यायची असेल तर निवडून द्या; शरद पवारांची चंदगडकरांना साद
राज ठाकरे आले, माईकवरुन थोडकंच काय ते सांगितलं अन् निघून गेले; जाहीर सभा ने घेता परत फिरले
राज ठाकरे आले, माईकवरुन थोडकंच काय ते सांगितलं अन् निघून गेले; जाहीर सभा ने घेता परत फिरले
Sada Sarvankar : उमेदवारापाठी राज-उद्धव ठाकरे असले तरी नावापेक्षा काम महत्वाचं असतं
Sada Sarvankar : उमेदवारापाठी राज-उद्धव ठाकरे असले तरी नावापेक्षा काम महत्वाचं असतं
Maharashtra Assembly Election 2024 : नाशिकमध्ये सलग दुसऱ्या दिवशी राडा! ठाकरे गट-भाजपचे कार्यकर्ते थेट पोलीस ठाण्यातच आमनेसामने
नाशिकमध्ये सलग दुसऱ्या दिवशी राडा! ठाकरे गट-भाजपचे कार्यकर्ते थेट पोलीस ठाण्यातच आमनेसामने
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Muddyache Bola Nagpur : नागपूरमध्ये कुणाची हवा? मुद्द्याचं बोला थेट नागपूरहून #abpमाझाSarfaraz Ahmed : ...तर मुस्लिम भाजप-शिवसेनेच्या बाजूने उभे राहतील :सरफराज अहमदAavdiche Khane Rajkiya Tane Bane : Nitesh Rane यांची स्फोटक मुलाखत; कुणावर डागली तोफ? #abpमाझाHingoli Amit Shah Bag Checking : हिंगोलीत अमित शाहांची बॅग तपासली, निवडणूक अधिकाऱ्यांकडून तपास

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sharad Pawar In Chandgad : नंदाताई तुमच्या माझ्या कन्या आहेत; फसवणूक करणाऱ्यांना शिक्षा द्यायची असेल तर निवडून द्या; शरद पवारांची चंदगडकरांना साद
नंदाताई तुमच्या माझ्या कन्या आहेत; फसवणूक करणाऱ्यांना शिक्षा द्यायची असेल तर निवडून द्या; शरद पवारांची चंदगडकरांना साद
राज ठाकरे आले, माईकवरुन थोडकंच काय ते सांगितलं अन् निघून गेले; जाहीर सभा ने घेता परत फिरले
राज ठाकरे आले, माईकवरुन थोडकंच काय ते सांगितलं अन् निघून गेले; जाहीर सभा ने घेता परत फिरले
Sada Sarvankar : उमेदवारापाठी राज-उद्धव ठाकरे असले तरी नावापेक्षा काम महत्वाचं असतं
Sada Sarvankar : उमेदवारापाठी राज-उद्धव ठाकरे असले तरी नावापेक्षा काम महत्वाचं असतं
Maharashtra Assembly Election 2024 : नाशिकमध्ये सलग दुसऱ्या दिवशी राडा! ठाकरे गट-भाजपचे कार्यकर्ते थेट पोलीस ठाण्यातच आमनेसामने
नाशिकमध्ये सलग दुसऱ्या दिवशी राडा! ठाकरे गट-भाजपचे कार्यकर्ते थेट पोलीस ठाण्यातच आमनेसामने
युट्यूबर ध्रुव राठीचे मिशन स्वराज्य, महाराष्ट्रातील नेत्यांना 8 आव्हानं; पूर्ण करा, निवडणुकीत तुमचा प्रचार करणार
युट्यूबर ध्रुव राठीचे मिशन स्वराज्य, महाराष्ट्रातील नेत्यांना 8 आव्हानं; पूर्ण करा, निवडणुकीत तुमचा प्रचार करणार
Rahul Gandhi : सोयाबीनसाठी 7 हजारांचा दर अधिक बोनस, कांद्याला रास्त भावासाठी समिती, कापसासाठी सुद्धा योग्य किंमत; राहुल गांधींची गेमचेंजर घोषणा
सोयाबीनसाठी 7 हजारांचा दर अधिक बोनस, कांद्याला रास्त भावासाठी समिती, कापसासाठी सुद्धा योग्य किंमत; राहुल गांधींची गेमचेंजर घोषणा
BKC Metro Fire : आग आटोक्यात आल्यानंतर बीकेसी मेट्रो पुन्हा सुरू, मुंबई मेट्रोकडून दिलगिरी व्यक्त
आग आटोक्यात आल्यानंतर बीकेसी मेट्रो पुन्हा सुरू, मुंबई मेट्रोकडून दिलगिरी व्यक्त
नाशिकमध्ये ठाकरेंचा मनसेला मोठा धक्का, राज ठाकरेंचे विश्वासू अशोक मुर्तडक मशाल हाती घेणार
नाशिकमध्ये ठाकरेंचा मनसेला मोठा धक्का, राज ठाकरेंचे विश्वासू अशोक मुर्तडक मशाल हाती घेणार
Embed widget