(Source: Poll of Polls)
Ankita Prabhu-Walavalkar : अंकिताने 'बिग बॉस'च्या घरात जाण्याआधी शेवटचा फोन कोणाला केला? 'कोकण हार्टेड गर्ल' म्हणाली...
Ankita Prabh-Walavalkar : अंकिता वालावलकरने बिग बॉसच्या घरात एन्ट्री केली असून घरात जाण्याआधी तिने शेवटचा फोन कुणाला केला याविषयी खुलासा केला आहे.
Ankita Prabhu-Walavalkar : सोशल मीडियावर (Social Media) कोकण हार्टेड गर्ल (Kokan Hearted Girl) म्हणून प्रसिद्ध झालेली अंकिता प्रभू-वालावलकर (Ankita Prabhu-Walavalkar) ही आता बिग बॉसच्या घरात पोहचली आहे. तिच्या एन्ट्रीने तिच्या चाहत्यांना सुखद धक्का बसला. पण बिग बॉसच्या घरात गेल्यानंतर अंकिताने तिच्या आयुष्यातील एका खास गोष्टीचा खुलासा केला. त्यातच आता तिने घरात जाण्याआधी शेवटचा फोन कुणाला केला होता याविषयी देखील भाष्य केलं आहे.
अंकिताने तिच्या सोशल मीडियावर नुकतच तिच्या आयुष्यातील खास व्यक्तीची ओळख करुन दिली. बिग बॉसच्या घरात जाण्याआधी तिच्या बॉयफ्रेंडने तिला दिलेल्या सरप्राईजविषयी खास पोस्ट केली आहे. त्यामुळे अंकिता बिग बॉसच्या घरात असली तरी तिच्या वैयक्तिक आयुष्याविषयी सोशल मिडियावर बरीच चर्चा सुरु आहे.
अंकिताने शेवटचा फोन कुणाला केला होता?
अंकिताने शेवटचा फोन तिच्या होणाऱ्या नवऱ्याला केला होता. त्यावर ती म्हणाली की, मी घरात जाण्याआधी शेवटचा फोन होणाऱ्या नवऱ्याला केला. त्याला सांगितले की, सगळ्यांची काळजी घे. आता गणपती येणार आहेत तर घरात सगळे सेट कर लक्ष असू दे."
'फोनशिवाय राहणं थोडं कठीणच'
अंकिताने तिच्या भावना व्यक्त करताना म्हटलं की, 'मी पहिल्यांदाच फोनशिवाय कुठेतरी राहणार आहे. याबद्दल मला थोडं अवघड वाटतंय, पण माझा निर्धार मात्र पक्का आहे. जर 'बिग बॉस'ने मला संधी दिली घरात काहीतरी घेऊन जायचं, तर मी माझा फोन घेऊन जाईन. फोनशिवाय राहाणं मला कठीण वाटत असलं तरी मी माझ्या कोकणी अंदाजात सगळ्यांना प्रभावित करण्यासाठी आता घरात सज्ज आहे. माझ्या मित्रांनी देखील मला सल्ले दिले आहेत की, घरात जाऊन जा भांडण कर जोरदार, भांडण केलेस तरच टिकशील. पण माझे असं आहे की, मी यावेळी नव्या सीझनमध्ये काही तरी वेगळे दाखवणार आहे. न भांडता छान वागून पॉझिटिव्ह राहीन.'
अंकिताने 'बिग बॉस मराठी' या कार्यक्रमात सहभागी होणार असल्याचं घरी सांगितलं तेव्हा तिच्या आईला एकंदरीतच तिची काळजी वाटली. याबद्दल अंकिता म्हणाली,"तू घरात कशी काम करशील? भांडी घासशील?" असे आईचे प्रश्न सुरू झाले. बाबांना कळलं तेव्हा त्यांची प्रतिक्रिया विचित्र होती. ते थेट म्हणाले,"तू घरी परत कधी येणार?".