![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Khatron Ke Khiladi : 'खतरों के खिलाडी'चा होणार ग्रॅंड फिनाले; यंदाच्या पर्वात कोण ठरणार विजेता?
Khatron Ke Khiladi : 'खतरों के खिलाडी' 12'चा महाअंतिम सोहळा 24 आणि 25 सप्टेंबरला होणार आहे.
![Khatron Ke Khiladi : 'खतरों के खिलाडी'चा होणार ग्रॅंड फिनाले; यंदाच्या पर्वात कोण ठरणार विजेता? Khatron Ke Khiladi will have its grand finale Who will be the winner of this season Khatron Ke Khiladi : 'खतरों के खिलाडी'चा होणार ग्रॅंड फिनाले; यंदाच्या पर्वात कोण ठरणार विजेता?](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/09/24/9986bb5e4daa916f93995ceff8329a4f1663995598797254_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Khatron Ke Khiladi : 'खतरों के खिलाडी' (Khatron Ke Khiladi) हा छोट्या पडद्यावरचा लोकप्रिय कार्यक्रम आहे. 'खतरों के खिलाडी 12' आता शेवटच्या टप्प्यात आला आहे. नेहमीप्रमाणे 'खतरों के खिलाडी'चं हे पर्वदेखील प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलं आहे. आता या कार्यक्रमाच्या महाअंतिम सोहळ्याकडे प्रेक्षकांचं लक्ष लागलं आहे.
'खतरों के खिलाडी 12'चा महाअंतिम सोहळा कधी?
रोहित शेट्टीच्या 'खतरों के खिलाडी 12'ने प्रेक्षकांचं चांगलचं मनोरंजन केलं आहे. फैसल शेख, जन्नत जुबैर, मोहित मलिक आणि तुषार कालियासह सर्वच स्पर्धकांनी त्यांच्या साहसी खेळाने प्रेक्षकांना हैराण केलं आहे. 'खतरों के खिलाडी 12'चा महाअंतिम सोहळा 24 आणि 25 सप्टेंबरला पार पडणार आहे. दोन भागांत हा महाअंतिम सोहळा होणार आहे. 'खतरों के खिलाडी 12'चा महाअंतिम सोहळा 'झलक दिखला 10'च्या मंचावर होणार आहे. त्यामुळे प्रेक्षकांना मनोरंजनाची मेजवानी मिळणार आहे.
View this post on Instagram
'खतरों के खिलाडी 12'चा विजेता कोण?
'खतरों के खिलाडी 12'च्या सर्वच स्पर्धकांनी प्रेक्षकांचं चांगलचं मनोरंजन केलं आहे. 'खतरों के खिलाडी 12'च्या टॉप पाच स्पर्धकांमध्ये फैसल शेख, तुषार कालिया, मोहिक मलिक, रुबीना दिलैक आणि जन्नत जुबैरच्या नावांचा समावेश आहे. त्यामुळे आता 'खतरों के खिलाडी 12'चा कोण विजेता होणार याकडे प्रेक्षकांचं लक्ष लागलं आहे.
'खतरों के खिलाडी 12' कुठे पाहू शकता?
'खतरों के खिलाडी 12'चा महाअंतिम सोहळा खास असणार आहे. कलर्स टीव्हीवर रात्री 9.30 वाजता प्रेक्षक हा कार्यक्रम पाहू शकतात. तसेच वूट आणि Airtel Xstream आणि जिओ टीव्हीवरदेखील प्रेक्षकांना 'खतरों के खिलाडी 12'चा महाअंतिम सोहळा पाहता येणार आहे. त्यामुळे या वीकेंडला प्रेक्षकांना घरबसल्या मनोरंजनाची मेजवानी मिळणार आहे.
संबंधित बातम्या
Rubina Dilaik : 'खतरों के खिलाडी 12' टास्कदरम्यान रुबिना दिलैकचा अपघात; रुग्णालयात दाखल
Khatron Ke Khiladi 12: ‘खतरों के खिलाडी 12’मधून टीव्हीचा प्रसिद्ध अभिनेता एलिमिनेट! ‘या’ स्पर्धकांमध्ये रंगणार चुरस
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)