(Source: ECI/ABP News/ABP Majha)
KKK 12 Winner: तुषार कालिया ठरला 'खतरों के खिलाडी 12' चा विजेता? मिळणार आलिशान गाडी अन् लाखोंचं बक्षीस
सध्या सोशल मीडियावर चर्चा होत आहे की, तुषारनं हा खतरों के खिलाडी 12 (Khatron Ke Khiladi 12) शो जिंकला आहे.
KKK 12 Winner : दिग्दर्शक रोहित शेट्टीच्या खतरों के खिलाडी 12 (Khatron Ke Khiladi 12) चा ग्रँड फिनाले आज (25 सप्टेंबर) पार पडणार आहे. रुबीना दिलैक (Rubina Dilaik), फैजल शेख (Faisal Shaikh) जन्नत जुबैर (Jannat Zubair), तुषार कालिया (Tushar Kalia) आणि मोहित मलिक हे या सिझनचे टॉप-5 स्पर्धक आहेत. सध्या सोशल मीडियावर चर्चा होत आहे की, तुषारनं हा शो जिंकला आहे. तुषारच्या एका व्हायरल फोटोवरुन नेटकरी अंदाज लावत आहेत की, तुषार हा 'खतरों के खिलाडी 12' चा विजेता ठरला आहे.
तुषार कालिया आणि फैजल शेख हे खतरों के खिलाडी 12 चे टॉप-2 स्पर्धक होते. तुषारच्या एका व्हायरल फोटोवरुन तो या कार्यक्रमाचा विनर ठरला आहे, अशी चर्चा सुरु आहे. या फोटोमध्ये तुषारच्या बाजूला कारचं कट आऊट दिसत आहे.
विजेताला मिळणार लाखोंचं बक्षीस
'खतरों के खिलाडी 12' च्या विजेत्या स्पर्धकाला 20 ते 30 लाख रुपयांचे बक्षीस मिळणार आहे. तसेच विजेत्याला एक आलिशान गाडी देखील मिळणार आहे.
#TusharKalia congratulations For Winning The Tittle of #KhatronKeKhiladi12 🎉🏆💥🙌🏻#RubinaDiIaik , #JannatZubairRahmani , #mrfaisu , #MohitMalik & #sritijha Well played You all really Too good 🎉💥 pic.twitter.com/i5vlZcMiFS
— Naagin_Blockbuster (@NaaginBlockbus1) September 18, 2022
कोण आहे तुषार कालिया?
तुषार हा प्रसिद्ध कोरिओग्राफर आहे. त्यानं ओके जानू, हाफ गर्लफ्रेंड, करीब करीब सिंगर, हेट स्टोरी 4, धडक, जंगली, द जोया फॅक्टर, धडक यांसारख्या चित्रपटांची कोरिओग्राफी केली आहे. 'झलक दिखला जा' या कार्यक्रमामध्ये देखील तुषारनं सहभाग घेतला होता. 'झलक दिखला जा' या कार्यक्रमाच्या 6 आणि 7 व्या सिझनमध्ये तुषारनं कोरिओग्राफी केली आहे.
'खतरों के खिलाडी 12' कुठे पाहू शकता?
'खतरों के खिलाडी 12'चा महाअंतिम सोहळा खास असणार आहे. कलर्स टीव्हीवर रात्री 9.30 वाजता प्रेक्षक हा कार्यक्रम पाहू शकतात. तसेच वूट आणि Airtel Xstream आणि जिओ टीव्हीवरदेखील प्रेक्षकांना 'खतरों के खिलाडी 12'चा महाअंतिम सोहळा पाहता येणार आहे. त्यामुळे या वीकेंडला प्रेक्षकांना घरबसल्या मनोरंजनाची मेजवानी मिळणार आहे.
वाचा इतर महत्त्वाच्या बातम्या :