एक्स्प्लोर

KBC 12व्या सीझनची पहिली करोडपती स्पर्धक नाजिया नसीम, VIDEO

कौन बनेगा करोडपती या टेलिव्हिजन शोच्या 12व्या सीझनमधील पहिला करोडपती कोण, हे जाणून घेण्याची उत्सुकता सर्वांनाच लागली होती. अशातच आता केबीसीच्या 12व्या सीझनमधील पहिला करोडपती स्पर्धक मिळाला आहे.

मुंबई : टेलिव्हिजन विश्वातील क्विज शो 'कौन बनेगा करोडपती'च्या 12 व्या सीझनमधील पहिला करोडपती स्पर्धक कोण असणार, याची उत्सुकता सर्वांना लागून राहिली आहे. अशातच या सीझनमधील शोचा पहिला करोडपती स्पर्धक मिळाला आहे. स्पर्धक नाजिया नसीम या सीझनच्या पहिल्या करोडपती बनल्या आहेत. दरम्यान, अद्याप हा एपिसोड टेलिकास्ट झालेला नाही. शोचा एक प्रोमो व्हिडीओ समोर आला आहे. या प्रोमो व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, नाजियाने एक कोटी रुपयांच्या प्रश्नाचं उत्तर बरोबर दिलं आहे.

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, अमिताभ बच्चनही आनंदाने नाजियाने दिलेलं उत्तर योग्य असल्याचं सांगताना दिसत आहेत. त्यामुळे नाजिया या सीझनमधील पहिली करोडपती बनल्या आहेत. याआधी अनेक स्पर्धक एक कोटी रुपयांच्या प्रश्नापर्यंत पोहोचले, पण कोणीच या सीझनमध्ये एक कोटी रुपयांच्या प्रश्नाचं योग्य उत्तर देऊ शकलं नाही.

प्रोमोमध्ये दिसत आहे की, अमिताभ, नाजिया यांच्यासमोर सात कोटी रुपयांचा जॅखपॉट प्रश्नही ठेवणार आहेत. जर नाजिया यांनी या प्रश्नाचंही योग्य उत्तर दिलं, तर त्या इतिहास रचणार आहेत. त्यामुळे नाजिया यांना सात कोटी रुपयांसाठी कोणता प्रश्न विचारण्यात येतो आणि त्या या प्रश्नाचं योग्य उत्तर देऊ शकणार का? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

सोशल मीडियावर केबीसीचा हा प्रोमो वेगाने व्हायरल होत आहे. प्रेक्षक हा एपिसोड पाहण्यासाठी उत्सुक आहेत. हा स्पेशल एपिसोड 11 नोव्हेंबर रोजी 9 वाजता टेलिकास्ट करण्यात येणार आहे. जर कौन बनेगा करोडपतीच्या 12व्या सीझनबाबत बोलायचे झाले तर नाजिया यांच्याआधी छवि कुमार यांनीही एक कोटी रुपयांपर्यंतचा प्रवास पूर्ण केला होता. पण त्यांनी एक कोटी रुपयांच्या प्रश्नावर खेळ थांबवला होता. त्या 50 लाख रुपये घरी घेऊन गेल्या होत्या.

महत्त्वाच्या बातम्या : 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Malegaon Bajar Samiti :  विधानसभेपाठोपाठ दादा भुसेंचा अद्वय हिरेंना मोठा धक्का; मालेगाव बाजार समितीतील सत्ता खेचली!
विधानसभेपाठोपाठ दादा भुसेंचा अद्वय हिरेंना मोठा धक्का; मालेगाव बाजार समितीतील सत्ता खेचली!
Nashik Encroachment : कुंभ नगरीला अतिक्रमणाचा विळखा, महापालिकेच्या मोहिमेनंतरही परिस्थिती जैसे थे;  नाशिककरांची सुटका कधी?
कुंभ नगरीला अतिक्रमणाचा विळखा, महापालिकेच्या मोहिमेनंतरही परिस्थिती जैसे थे; नाशिककरांची सुटका कधी?
धक्कादायक! पुण्यात स्टील कंपनीच्या मालकावर दिवसाढवळ्या गोळीबार; दुचाकीवरुन आले अन् निघून गेले
धक्कादायक! पुण्यात स्टील कंपनीच्या मालकावर दिवसाढवळ्या गोळीबार; दुचाकीवरुन आले अन् निघून गेले
जिल्ह्यात बीडची लॉबी काम करतेय, मंत्री नितेश राणे संतापले; पत्रकार परिषदेतून थेट इशारा, गाठ माझ्याशी
जिल्ह्यात बीडची लॉबी काम करतेय, मंत्री नितेश राणे संतापले; पत्रकार परिषदेतून थेट इशारा, गाठ माझ्याशी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Vijay Wadettiwar On Eknath Shinde : आता भाजपला एकनाथ शिंदेंची  गरज संपली- विजय वडेट्टीवारABP Majha Marathi News Headlines 5PM TOP Headlines 05 PM 20 January 2025Maharashtra Guardian Minister News : पालकमंत्रीपदावरुन शिवसेना-भाजपत धुसफूस? गोगावले, भुसेंच्या नाराजीनंतर शिंदेंचा फडणवीसांना फोन?Eknath Shinde On Naraji : पालकमंत्रिपदाबाबत अपेक्षा ठेवण्यात वावगं काय? नाराजीच्या चर्चांवर एकनाथ शिंदे स्पष्टच बोलले..

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Malegaon Bajar Samiti :  विधानसभेपाठोपाठ दादा भुसेंचा अद्वय हिरेंना मोठा धक्का; मालेगाव बाजार समितीतील सत्ता खेचली!
विधानसभेपाठोपाठ दादा भुसेंचा अद्वय हिरेंना मोठा धक्का; मालेगाव बाजार समितीतील सत्ता खेचली!
Nashik Encroachment : कुंभ नगरीला अतिक्रमणाचा विळखा, महापालिकेच्या मोहिमेनंतरही परिस्थिती जैसे थे;  नाशिककरांची सुटका कधी?
कुंभ नगरीला अतिक्रमणाचा विळखा, महापालिकेच्या मोहिमेनंतरही परिस्थिती जैसे थे; नाशिककरांची सुटका कधी?
धक्कादायक! पुण्यात स्टील कंपनीच्या मालकावर दिवसाढवळ्या गोळीबार; दुचाकीवरुन आले अन् निघून गेले
धक्कादायक! पुण्यात स्टील कंपनीच्या मालकावर दिवसाढवळ्या गोळीबार; दुचाकीवरुन आले अन् निघून गेले
जिल्ह्यात बीडची लॉबी काम करतेय, मंत्री नितेश राणे संतापले; पत्रकार परिषदेतून थेट इशारा, गाठ माझ्याशी
जिल्ह्यात बीडची लॉबी काम करतेय, मंत्री नितेश राणे संतापले; पत्रकार परिषदेतून थेट इशारा, गाठ माझ्याशी
युवक काँग्रेसच्या 60 पदाधिकाऱ्यांची उचलबांगडी, पक्षातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर; वरिष्ठ नेत्यांपर्यंत वादाची ठिणगी?
युवक काँग्रेसच्या 60 पदाधिकाऱ्यांची उचलबांगडी, पक्षातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर; वरिष्ठ नेत्यांपर्यंत वादाची ठिणगी?
Kolkata Rape Case : कोलकाता बलात्कार प्रकरणातील 'राक्षसा'ला जन्मठेप, ड्युटीवर असलेल्या महिला डॉक्टरची केली होती हत्या  
कोलकाता बलात्कार प्रकरणातील 'राक्षसा'ला जन्मठेप, ड्युटीवर असलेल्या महिला डॉक्टरची केली होती हत्या  
राजकीय अस्त झाला तरी चालेल पण आम्ही तटकरे फॅमिलीला स्वीकारणार नाही, शिंदे गटाच्या आमदाराचा हल्लाबोल
राजकीय अस्त झाला तरी चालेल पण आम्ही तटकरे फॅमिलीला स्वीकारणार नाही, शिंदे गटाच्या आमदाराचा हल्लाबोल
Jalgaon Crime : माझ्या लेकराला मारलं, त्यांना फाशीचीच शिक्षा व्हावी, मुकेशच्या आईने फोडला टाहो; पोलिसांवरही गंभीर आरोप
माझ्या लेकराला मारलं, त्यांना फाशीचीच शिक्षा व्हावी, मुकेशच्या आईने फोडला टाहो; पोलिसांवरही गंभीर आरोप
Embed widget