एक्स्प्लोर
कार ट्रकवर धडकून टीव्ही अभिनेता-अभिनेत्रीचा मृत्यू
रचना, जीवन आणि इतर काही टीव्ही कलाकार गुरुवारी मध्यरात्री सुब्रमण्य गावातील एका मंदिरात चालले होते. त्यावेळी ट्रकला धडकून त्यांच्या कारला भीषण अपघात झाला

बंगळुरु : बंगळुरुजवळ झालेल्या अपघातात दोन कन्नड टीव्ही अभिनेत्यांना जीव गमवावा लागला आहे. कार ट्रकवर आदळून झालेल्या भीषण अपघातात अभिनेत्री रचना आणि अभिनेता जीवन यांचा मृत्यू झाला, तर कारमधील इतर कलाकार जखमी झाले आहेत. रचना, जीवन आणि इतर काही टीव्ही कलाकार गुरुवारी मध्यरात्री सुब्रमण्य गावातील एका मंदिरात चालले होते. सहकलाकाराच्या वाढदिवसानिमित्त सर्व मित्र निघाले होते. त्यावेळी मगदीजवळ उभ्या असलेल्या एका ट्रकवर त्यांची कार आदळली.
अपघातात अभिनेत्री रचना आणि अभिनेता जीवन यांचा मृत्यू झाला, तर रणजित, एरिक, होनेश आणि उत्तम यांना किरकोळ जखमा झाल्या आहेत. अपघाताच्या वेळी अभिनेता जीवन स्वतः कार चालवत होता. अभिनेत्री रचनाने महानदी, मधुबाला, त्रिवेणी संगम यासारख्या काही मालिकांमध्ये अभिनय केला आहे.
अपघातात अभिनेत्री रचना आणि अभिनेता जीवन यांचा मृत्यू झाला, तर रणजित, एरिक, होनेश आणि उत्तम यांना किरकोळ जखमा झाल्या आहेत. अपघाताच्या वेळी अभिनेता जीवन स्वतः कार चालवत होता. अभिनेत्री रचनाने महानदी, मधुबाला, त्रिवेणी संगम यासारख्या काही मालिकांमध्ये अभिनय केला आहे. आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
छत्रपती संभाजी नगर
राजकारण
पुणे
धुळे























