(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Jivachi Hotiya Kahili : भाषेपलीकडच्या प्रेमावर भाष्य करणारी 'जिवाची होतिया काहिली'; रेवथी-अर्जुनचं सत्य येणार का अप्पांसमोर?
Jivachi Hotiya Kahili : भाषेपलीकडच्या प्रेमावर भाष्य करणारी 'जिवाची होतिया काहिली' ही मालिका आहे.
Jivachi Hotiya Kahili : भाषेपलीकडच्या प्रेमावर भाष्य करणारी 'जिवाची होतिया काहिली' (Jivachi Hotiya Kahili) ही मालिका आहे. मराठी आणि कानडी यांच्या प्रेमाची कहाणी या मालिकेत पाहायला मिळत आहे. आता ही मालिका उत्कंठावर्धक वळणावर येऊन पोहोचली आहे. रेवथी आणि अर्जुनचं सत्य अप्पांसमोर येणार का याकडे प्रेक्षकांचं लक्ष लागलं आहे.
सध्या महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरील वादाने हिंसक वळण घेतलं आहे. महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमेवरील वादासाठी कर्नाटक समर्थकांनी आंदोलन केलं आहे. राज्याराज्यांत अशा प्रकारचे वातावरण निर्माण होणं योग्य नाही. सध्या महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर तणावाचे वातावरण आहे. सध्या छोट्या पडद्यावर सुरू असलेली 'जिवाची होतिया काहिली' ही मालिकादेखील महाराष्ट्र आणि कानडी यांच्या प्रेमावर भाष्य करते.
View this post on Instagram
'जिवाची होतिया काहिली' या मालिकेत प्रमुख नायकाच्या भूमिकेत असणारा कोल्हापूरचा रांगडा गडी म्हणजेच अभिनेता राज हंसनाळे प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस पडत आहे. एकंदरीतच 'जिवाची होतिया काहिली' ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे.
मराठी भाषिक आणि कानडी भाषिक यांच्यातल्या प्रेमाची कहाणी छोट्या पडद्यावर प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे. अर्जुन आणि रेवथी यांची ही प्रेमकहाणी एका वेगळ्या वळणावर येऊन पोहोचली आहे. मालिकेत आता अर्जुन आणि रेवती यांच्या मैत्री झाली असून या मैत्रीचे रुपांतर प्रेमात कसे होणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. आता ही मालिका कोणतं वेगळं वळण घेणार याकडे प्रेक्षकांचं लक्ष लागलं आहे.
जिवाची होतिया काहिली
कुठे पाहायला मिळेल? सोनी मराठी
किती वाजता? सोम.-शनि. संध्या. 7:30 वा.
संबंधित बातम्या