Jau Bai Gavat:"बोलताना विचार करुन बोल जा"; जाऊ बाई गावातमध्ये हार्दिकनं मुक्ताला सुनावलं!
नुकताच जाऊ बाई गावात (Jau Bai Gavat) या कार्यक्रमाचा एक प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या प्रोमोमध्ये कार्यक्रमाचा होस्ट हार्दिक जोशी (Hardik Joshi) हा मुक्तावर चिडलेला दिसत आहे.
Jau Bai Gavat: सध्या छोट्या पडद्यावरील जाऊ बाई गावात (Jau Bai Gavat) या कार्यक्रमाची चर्चा सोशल मीडियावर होत आहे. शहरात राहणाऱ्या मुली गावामध्ये गेल्यानंतर कशा राहतात. गायीचं किंवा म्हशीचं दूध काढणे, शेणाने अंगण सारवणे ही कामे त्या मुलींना जमतात का? हे सर्व या कार्यक्रमात दाखवण्यात येणार आहे. नुकताच जाऊ बाई गावात या कार्यक्रमाचा एक प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या प्रोमोमध्ये कार्यक्रमाचा होस्ट हार्दिक जोशी (Hardik Joshi) हा मुक्तावर चिडलेला दिसत आहे.
आजींवर ओरडली मुक्ता
जाऊ बाई गावात या कार्यक्रमाच्या एका प्रोमोमध्ये दिसले की, मुक्ताला झोपेतून उठवण्यासाठी एक आजी येतात. त्या आजींवर मुक्ता ओरडते. त्या आजींना ती म्हणते, "मला हात लावू नका"
हार्दिकनं मुक्ताला सुनावलं
जाऊ बाई गावात या कार्यक्रमाच्या प्रोमोमध्ये दिसले की हार्दिक मुक्ताला सुनावतो. तो म्हणतो,"मुक्ता तू आज सकाळी आजीला काय म्हणाली? हार्दिकच्या प्रश्नाचं उत्तर देताना मुक्ता हसते. यावर हार्दिक म्हणतो, यात हसण्यासारखं काही नाहीये. बोलताना जरा विचार करुन बोलत जा. आपण कोणाशी बोलतो? काय बोलतो? याचा विचार कर. वयाचं जरा भान ठेवत जा. ती तुझी आजी जरी नसली, तरी ती कोणाची तरी आजी आहे, कोणाची तरी आई आहे. हे कायम लक्षात ठेव. फक्त तिच्यासोबतच नाही तर कोणत्याही गावकऱ्याशी बोसताना आदबीनं बोलायचं. मी या शोचा अँकर म्हणून तुमच्यासोबत हे बोलत आहे."
View this post on Instagram
श्रेजा म्हात्रे, मोनिशा आजगावकर,स्नेहा भोसले,रसिका ढोबळे,संस्कृती साळुंखे, हेतल पाखरे यांनी देखील जाऊ बाई गावात या कार्यक्रमामध्ये सहभाग घेतला आहे. या कार्यक्रमाच्या आगामी एपिसोडची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत.
'तुझ्यात जीव रंगला' (Tujhyat Jeev Rangala) या मालिकेतील हार्दिकनं राणादा ही भूमिका साकारली. त्याच्या या भूमिकेला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली. हार्दिकचा चाहता वर्ग मोठा आहे. आता त्याचा जाऊ बाई गावात हा कार्यक्रम प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
इतर महत्वाच्या बातम्या: