(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Jai Jai Shani Dev : सूर्यपुत्र, न्यायदाते आणि अवघ्या जगाचे कर्मदाते शनिदेवांची महागाथा; 'जय जय शनिदेव' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला
Jai Jai Shani Dev : 'जय जय शनिदेव' ही मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या मालिकेची प्रेक्षकांना उत्सुकता आहे.
Jai Jai Shani Dev : प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी नेहमी नवनवीन मराठी मालिका (Marathi Serial) येत आहेत. आजवर पौराणिक, ऐतिहासिक, थरारक, इत्यादी मालिका सोनी मराठी वाहिनीवर पाहायला मिळाल्या आहेत. त्यातच आता सोनी मराठी वाहिनीने नवी मालिका घोषित केली आहे. 'जय जय शनिदेव' असे या मालिकेचे नाव आहे. जीवनात सुख, शांतता आणि समाधान देणारी न्यायाची देवता 'शनिदेव' यांच्यावर आधारित ही नवी मालिका असणार आहे.
अभिनेता संकेत खेडकर साकारणार शनिदेवांची भूमिका
अभिनेता संकेत खेडकर हा शनिदेवांची भूमिका साकारणार आहे. याआधी विविध मालिकांमधून काही भूमिका त्याने साकारल्या आहेत. पण प्रमुख भूमिका म्हणून 'शनिदेव' ही संकेतची पहिलीच भूमिका आहे. विशेष म्हणजे संकेत हा मूळचा अहमदनगर चा असून 'जय जय शनिदेव' मालिकेत शनिदेवांची भूमिका साकारणं हे त्याचं भाग्यच म्हणावं लागेल.
काही दिवस आधी 'जय जय शनिदेव' मालिकेची पहिली झलक प्रेक्षकांना पाहायला मिळाली. शनिदेवांची भूमिका कोण साकारणार आणि त्यांची वेशभूषा कशी असेल याची चर्चा तेव्हापासूनच रंगली होती. पण आता शनिदेवांची वेशभूषा प्रेक्षकांसमोर आली आहे. त्यावर मिळणारा प्रतिसाद आणि प्रेक्षकांचे प्रेम पाहून शनिदेव हा विषय प्रेक्षकांच्या किती जवळचा आहे, हे कळतं आहे. शनिदेव यांच्यावर आधारित मालिका पहिल्यांदाच दूरदर्शनवर पाहता येणार आहे.
View this post on Instagram
प्रेक्षकांची आतुरता आता शिगेला पोहोचली आहे. शनिदेव ही न्यायाची देवता आपल्या भक्तांच्या जीवनात सुख, शांतता आणि समाधान मिळवून देण्यासाठी मदत करते. शनिदेवांचा हा इतिहास अजून कोणीही प्रेक्षकांसमोर आणलेला नाही. ८ मेपासून तो सोनी मराठी वाहिनीवर उलगडणार आहे. जीवनात सुख, शांतता आणि समाधान देणारी न्यायाची देवता 'शनिदेव' यांचा जीवनप्रवास या मालिकेतून उलगडणार आहे. संकेत खेडकर हा अभिनेता शनिदेवाची भूमिका कशा प्रकारे साकारतो, ते आपल्याला पाहायला मिळेल. 'जय जय शनिदेव' ही मालिका 8 मेपासून रात्री 9.30 वाजता प्रेक्षक सोनी मराठीवर पाहू शकतात. शनि देवाचा शास्त्रात शनि ग्रह म्हणून उल्लेख करण्यात आला आहे. तसेच शनिदेवाला न्यायाची देवता असंही म्हटलं जातं.
संबंधित बातम्या