एक्स्प्लोर
पुलंच्या साहित्यावर हिंदी मालिका, संजय मोने मुख्य भूमिकेत
पुलंच्या 'व्यक्ती आणि वल्ली' या साहित्यकृतीवर आधारित हिंदी मालिका लवकरच टीव्हीवर येणार असून मराठीतील हरहुन्नरी अभिनेते संजय मोने मुख्य भूमिकेत आहेत.
मुंबई : महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्त्व पु. ल. देशपांडे यांची भुरळ हिंदी मनोरंजन विश्वालाही पडली आहे. पुलंच्या साहित्यावर आधारित हिंदी मालिका लवकरच टीव्हीवर येणार असून मराठीतील हरहुन्नरी अभिनेते संजय मोने मुख्य भूमिकेत आहेत.
पु. लं देशपांडे हे अवघ्या महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्व आहेच. त्यांच्या प्रतिभेतून उतरलेल्या सखाराम गटणे, नामू परीट, अंतू बर्वा यासारख्या व्यक्तिरेखांवर महाराष्ट्राने अलोट प्रेम केलं. पण पुलंच्या या प्रतिभेचं आकर्षण आता हिंदी टेलिविश्वालाही होत असल्याचं दिसत आहे.
'सोनी सब'वर पुलंच्या 'व्यक्ती आणि वल्ली'वर आधारित 'नमुने' ही हिंदी मालिका लवकरच सुरु होत आहे. अभिनेते संजय मोनेंसह सुबोध भावेसारख्या अनेक मराठी आणि हिंदी कलाकारांची फौज या मालिकेत दिसणार आहे.
साडे माडे तीन, संशयकल्लोळ, म्हैस यासारखे चित्रपट, आभाळमाया, माझिया प्रियाला प्रीत कळेना यासारख्या मालिका, कुसुम मनोहर लेले, हम तो तेरे आशिक है सारख्या नाटकांमध्ये संजय मोनेंनी भूमिका साकारल्या आहेत.
यापूर्वी 'तारक मेहता का उलटा चष्मा' सारखी साहित्यावर आधारित विनोदी मालिका 'सोनी सब'वर गाजली आहे. त्यामुळे पुलंच्या साहित्यावर आधारित मालिका प्रेक्षकांचा कसा प्रतिसाद मिळवते, हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
मुंबई
राजकारण
भारत
Advertisement