Gautami Patil : "मी बिग बॉसमध्ये जाणार होते, पण..."; सबसे कातिक गौतमी पाटीलनं सांगितलं ऑफर नाकारण्याचं कारण!
Bigg Boss Marathi Offer To Gautami Patil : नृत्यांगणा गौतमी पाटील हिला बिग बॉस मराठीची ऑफर आली होती, मात्र ही ऑफर तिने नाकारली. यामागचं कारण जाणून घ्या.
Gautami Patil Bigg Boss Offer : छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध शो बिग बॉस मराठी सध्या प्रेक्षकांचं मनोरंजन करताना दिसत आहे. यंदा बिग बॉस मराठीचा पाचवा सीझन सुरु आहे. बिग बॉसच्या घरातील सर्वच सदस्य एकापेक्षा एक वरचढ ठरताना दिसत आहेत. यंदाचा बिग बॉसचा शो तुफान चर्चेत आहे. प्रेक्षकांचा शोला चांगलाच प्रतिसाद मिळताना दिसत आहे. बिग बॉसचा यंदाचा सीझन सुरु होण्याआधी अनेक सेलिब्रिटींच्या नावाची चर्चा रंगली होती. अनेक सेलिब्रिटींना ऑफर होती, मात्र त्यातील काही सेलिब्रिटींना बिग बॉसची ऑफर नाकारली. नृत्यांगणा गौतमी पाटील हिला बिग बॉस मराठीची ऑफर आली होती, मात्र ही ऑफर तिने नाकारली. यामागचं कारण जाणून घ्या.
गौतमी पाटीलनं नाकारली बिग बॉसची ऑफर
प्रसिद्ध नर्तकी गौतमी पाटील (Gautami Patil) नेहमीच तिच्या डान्समुळे चर्चेत असते. गौतमी पाटीलचा मोठा चाहतावर्ग आहे. बिग बॉसचा यंदाचा सीझन सुरु होण्याआधी गौतमी पाटीलच्या नावाची चर्चा रंगली होती. गौतमी पाटीलने आता या बातम्यांवर प्रतिक्रिया दिली आहे. गौतमी पाटीलने सांगितलं आहे की, तिला बिग बॉस मराठीची ऑफर होती, पण तिने ही ऑफर नाकारली. ही बातमी समोर येताच आता गौतमी पाटीलने बिग बॉसची ऑफर का नाकारली, असा प्रश्न तिच्या चाहत्यांना पडला आहे.
बिग बॉसची ऑफर नाकारण्यामागचं कारण काय?
गौतमी पाटील हिने तिला बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीझनमध्ये स्पर्धक म्हणून सहभागी होण्यासाठी ऑफर आल्याचं मान्य केलं आहे. गौतमी पाटीलने अमरावतीमधील एका कार्यक्रमात टीव्ही9 सोबत बोलताना याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी गौतमी पाटीलने सांगितलं की, मला बिग बॉसची ऑफर होती, पण आधीच शो आणि प्रोगाम असल्यामुळे ही ऑफर नाकारली.
View this post on Instagram
'भविष्यात बिग बॉसमध्ये नक्की जाईल'
गौतमी पाटील पुढे म्हणाली की, 'माझे कार्यक्रम आधीच बुक असतात. खूप आधीपासून कार्यक्रम बूक होतात, त्यामुळे मला यावेळी बिग बॉसमध्ये जायला नाही जमलं. कारण, मी बरेच आधी कार्यक्रम बूक केले होते आण आपली दहीहंडी, गणपती हे सर्व सण त्याचं काळात आले म्हणून मला जमलं नाही. भविष्यात बिग बॉसमध्ये नक्की जाईल.', असंही गौतमीनं म्हटलं आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :