FRIENDS मधील 'Gunther' काळाच्या पडद्याआड; अभिनेते जेम्स टायलर यांचं निधन
James Michael Tyler Passed Away : प्रसिद्ध टेलिव्हिजन सीरिज FRIENDS मधील 'Gunther' काळाच्या पडद्याआड. प्रसिद्ध अभिनेते जेम्स टायलर यांचं वयाच्या 59व्या वर्षी निधन.
James Michael Tyler Passed Away : प्रसिद्ध टेलिव्हिजन सीरिज FRIENDS फेम अभिनेते जेम्स मायकल टायलर (James Michael Tyler Passed Away) यांचं निधन झालं आहे. टेलिव्हिजन सीरिज फ्रेंड्समध्ये त्यांनी 'गंथर' (Gunther) ची भूमिका निभावली होती. जेम्स 59 वर्षांचे होते. त्यांनी रविवारी लॉस एंजेलिसमधील आपल्या घरात अखेरचा श्वास घेतला. जेम्स मायकल टायलर बऱ्याच काळापासून प्रोस्टेट कॅन्सरवर (Prostate Cancer) उपचार घेत होते. ते 2018 पासून या आजारानं त्रस्त होते.
मॅनेजर टोनी बेन्सन यांनी जेम्स यांच्या मृत्यूच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. टोनी यांनी जेम्स यांना श्रद्धांजली वाहताना म्हटलंय की, "जगभरात लोक त्यांना फ्रेंड्स सीरिजमधील गंथरच्या रुपात ओळखत होती. परंतु, मायकल एक अभिनेते, संगीतकार, कँन्सर अवेअरनेसबाबत बोलणारे व्यक्ती आणि प्रेमळ पिता म्हणून ओळखले जातात. मायकल यांना लाइव्ह म्युझिक ऐकायला खूप आवडायचं."
FRIENDS सीरिजमध्ये जेम्स यांच्यासोबत जॉयची भूमिका साकरणाऱ्या मॅट लेब्लांक यांनी इन्स्टाग्राम 'फ्रेंड्स'च्या सेटवरील फोटो शेअर करत जेम्स टायलर यांना श्रद्धांजली वाहिली आहे. मॅट यांनी लिहिलंय की, 'आपण खूप आनंद वाटून घेतला आहे मित्रा. तू कायम स्मरणात राहशील. भावपूर्ण श्रद्धांजली मित्रा"
FRIENDS सीरिजमध्ये रॅचलची भूमिका साकारणारी अभिनेत्री जेनिफर एनिस्टननंही इन्स्टाग्राम पोस्ट शेअर केली आहे. तिनं शोची क्लिप शेअर केली आहे. त्यामध्ये तिच्यासोबत जेम्स टायलर दिसत आहेत. तर कॉर्टेनी कॉक्सनं लिहिलं आहे की, "तुम्ही ज्याप्रकारे सेटवर एक कृतज्ञता घेऊन आलात. मी तुम्हाला ओळखते म्हणून खरंच, कृतज्ञ आहे. भावपूर्ण श्रद्धाजली जेम्स"
जेम्स मायकल टायलर 1990 च्या दशकात प्रचंड प्रसिद्ध झाले होते. टेलिव्हिजनवर 'फ्रेंड्स' सुरु होण्यापूर्वीच जेम्स यांची सीरिज 'जस्ट शूट मी!' आणि 'सबरीना द टीनएज विच' प्रसिद्ध झाल्या होत्या. 1994 मध्ये 'फ्रेंड्स'च्या दुसऱ्या एपिसोडमध्ये ते एक बँकग्राउंड कास्ट म्हणून काम करत होते. त्यानंतर शोमध्ये त्यांनी गंथरची भूमिका निभावली जो 'सेंट्रल पर्क' कॅफेमध्ये काम करत असतो. आणि रॅचल म्हणजेच, जेनिफर एनिस्टनवर प्रेम करत असतो. पण त्याचं प्रेम एकतर्फी असतं.