एक्स्प्लोर

Indian Idol Marathi : विजेतेपदासाठी 'या' पाच स्पर्धकांमध्ये रंगणार सुरांची टक्कर

Indian Idol Marathi : 'इंडियन आयडल मराठी' या कार्यक्रमाने प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे.

Indian Idol Marathi : 'इंडियन आयडल मराठी' (Indian Idol Marathi) या कार्यक्रमाने प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे. अभिमान देशाचा, आवाज महाराष्ट्राचा' अशी टॅगलाईन असलेल्या या कार्यक्रमात महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यांतून स्पर्धक आले होते. त्यातून नुकतेच महाराष्ट्राला टॉप 5 स्पर्धक मिळाले आहेत. विजेतेपदासाठी आता सुरांची टक्कर बघायला मिळते आहे. परीक्षकांचे गुण आणि प्रेक्षकांची मतं यांच्या आधारे स्पर्धकांची विजेतेपदाकडे वाटचाल सुरू झाली आहे.

जगदीश चव्हाण, प्रतीक सोळसे, सागर म्हात्रे, श्वेता दांडेकर आणि भाग्यश्री टिकले हे पाच स्पर्धक अंतिम फेरीत पोहोचले आहेत. पहिल्यांदाच मराठी भाषेत 'इंडियन आयडल' सुरू झालं आणि देशाचा अभिमान असलेले अजय-अतुल यांनी महाराष्ट्रासाठी आवाज शोधण्याचं कार्य हाती घेतलं. एवढे दिग्ग्ज परीक्षक आणि अर्थातच प्रेक्षक पहिल्या पर्वाचा विजेता निवडणार असल्याने फ्रिमेन्टल इंडिया टेलिव्हिजन प्रॉडक्शन्स प्रा. लि. प्रस्तुत 'इंडियन आयडल मराठी' महाअंतिम सोहळ्याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Sony मराठी (@sonymarathi)

नाशिक जिल्ह्यातला निफाडचा जगदिश आणि दिंडोरीचा प्रतिक, पनवेलचा सागर, वसईची श्वेता आणि नागपूरची भाग्यश्री टिकले या स्पर्धकांनी त्यांच्या मेहनतीच्या जोरावर, परीक्षकांच्या गुणांनी आणि प्रेक्षकांच्या मताच्या आधारे टॉप 5 मध्ये बाजी मारली आहे. या स्पर्धकांमध्ये स्पर्धा चांगलीच रंगत  आहे. प्रत्येकाची आवाजाची शैली, सादरीकरणाची पद्धत इतरांपेक्षा वेगळी आहे. टॉप 14 मधून बाजी मारलेल्या या शिलेदारांनी रसिकांच्या मनात स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केलं आहे. संपूर्ण पर्वात अनेक पाहुणे आले आणि त्यांनी स्पर्धकांना मोलाचं मार्गदर्शन केलं. अजय-अतुल यांच्यासारखे लोकप्रिय आणि अनुभवी परीक्षक असल्याने ही पाच रत्नं महाअंतिम फेरीत एकमेकांशी लढणार आहेत.

आता स्पर्धा शेवटच्या टप्प्यात येऊन पोचली आहे. लवकरच 'इंडियन आयडल मराठी' पर्वाचा विजेता किंवा विजेती महाराष्ट्राला मिळणार आहे. 'इंडियन आयडॉल मराठी'च्या पहिल्या सीजनचे टॉप पाच स्पर्धक कोण असणार याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागले होते. आता या टॉप पाच स्पर्धकांची यादी जाहीर झाली आहे.

संबंधित बातम्या

Mister Mummy : जेनेलिया डिसूझाने पूर्ण केले 'मिस्टर मम्मी'चे शूटिंग; रितेशसोबत झळकणार मोठ्या पडद्यावर

Alia-Ranbir Wedding : आलिया-रणबीरच्या लग्नाबाबत सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस

Sanjay Dutt : कॅन्सरवर मात केल्यावर संजयनं शूट केला KGF2 चा क्लायमॅक्स सीन; म्हणाला...

महत्त्वाच्या बातम्या

Scam 2010 Web Series: 24000 कोटींचा घोटाळा OTT वर; हंसल मेहतांच्या नव्या धमाकेदार वेब सीरिजची घोषणा, मराठमोळा अभिनेता मुख्य भूमिकेत, ओळखलं का कोण?
24000 कोटींचा घोटाळा OTT वर; हंसल मेहतांच्या नव्या धमाकेदार वेब सीरिजची घोषणा, मराठमोळा अभिनेता मुख्य भूमिकेत, ओळखलं का कोण?
AaiTuljha Bhavani: 'आई तुळजाभवानी'मध्ये रंजक अन् भावनिक वळण, 'छोटी तुळजाई' साकारणार 'ही' अभिनेत्री; नवा दैवी अवतार पाहिलात?
'आई तुळजाभवानी'मध्ये रंजक अन् भावनिक वळण, 'छोटी तुळजाई' साकारणार 'ही' अभिनेत्री; नवा दैवी अवतार पाहिलात?
Isha Keskar On Marathi Industry: 'तुम्हाला मी आगाऊ वाटत असेल, तर तो तुमचा प्रॉब्लेम...'; ईशा केसकरनं इंडस्ट्रीतल्या मानधनाबाबत बोलताना थेटच सांगितलं
'तुम्हाला मी आगाऊ वाटत असेल, तर तो तुमचा प्रॉब्लेम...'; ईशा केसकरनं इंडस्ट्रीतल्या मानधनाबाबत बोलताना थेटच सांगितलं
Taarak Mehta Ka Ooltah Chashmah FDA Promo: तुकाराम मुंढेंच्या FDA ची 'तारक मेहता का उल्टा चश्मा'मध्ये दहशत, माधवी भिडेंना मोठा धक्का, PROMO पाहिला?
तुकाराम मुंढेंच्या FDA ची 'तारक मेहता का उल्टा चश्मा'मध्ये दहशत, माधवी भिडेंना मोठा धक्का, PROMO पाहिला?

व्हिडीओ

Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर
Sanjay Raut on Amit Shah: अमित शाहांना तातडीने उपपंतप्रधान व्हायचंय, पण मोदींनी नकार दिलाय
Manoj Jarange Patil: आआथातू अरअरअर...अ‍ॅक्शन केली, डायलॉग बोलले; जरांगेंनी बावनकुळेंची बाहुबलीमधील कालकेयशी केली तुलना

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Share Market: निफ्टी 50 सलग तिसऱ्या सत्रात घसरला; सेन्सेक्स 0.15 टक्के वाढीसह बंद
Share Market: निफ्टी 50 सलग तिसऱ्या सत्रात घसरला; सेन्सेक्स 0.15 टक्के वाढीसह बंद
Solapur Crime News : झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
BAN vs AUS : बांगलादेशचा बलाढ्य ऑस्ट्रेलियाला दणका,  पहिल्या डावात 200 धावांच्या आत गुंडाळलं, कसोटीचा पहिला दिवस गाजवला 
बांगलादेशचा बलाढ्य ऑस्ट्रेलियाला दणका, पहिल्या डावात 200 धावांच्या आत गुंडाळलं, कसोटीचा पहिला दिवस गाजवला
Bar Council : बार काऊन्सिलनं निर्णय फिरवला, सरन्यायाधीशांना विरोध करणाऱ्या हैदराबाद येथील कायदा पदवीधर विद्यार्थ्यांच्या नोंदणीवरील स्थगिती मागे
बार काऊन्सिलनं निर्णय बदलला, सरन्यायाधीशांना विरोध विद्यार्थ्यांना दिलासा, कायदा पदवीधरांच्या वकील म्हणून नोंदणीचा मार्ग मोकळा 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑगस्ट 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑगस्ट 2026 | गुरुवार
Shiv Sena Symbol Case : चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
Sukhbir Badal News:मोठी बातमी, पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, आरोपीला अटक; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
IND Vs SL Galle Test: त्रिमूर्ती रिंगणात उतरवत श्रीलंकेला फिरकीच्या जाळ्यात अडकवण्याची तयारी; गोलंदाज प्रशिक्षकांकडून स्पष्ट संकेत
त्रिमूर्ती रिंगणात उतरवत श्रीलंकेला फिरकीच्या जाळ्यात अडकवण्याची तयारी; गोलंदाज प्रशिक्षकांकडून स्पष्ट संकेत
Embed widget