Divyanka Tripathi : लग्नाच्या आठ वर्षानंतर दिव्यांका त्रिपाठीने दिली गुडन्यूज, चाहत्यांनीही केला शुभेच्छांचा वर्षाव
Divyanka Tripathi : अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठीने नुकतच तिच्या चाहत्यांना गुडन्यूज दिली असून अनेकांनी या व्हिडिओवर कमेंट्स करत तिला शुभेच्छा दिल्या आहेत.
![Divyanka Tripathi : लग्नाच्या आठ वर्षानंतर दिव्यांका त्रिपाठीने दिली गुडन्यूज, चाहत्यांनीही केला शुभेच्छांचा वर्षाव Divyanka Tripathi Ye Hai Mohabbatein fame Actress shared a video by giving Goognews to her Fans Entertainment Television latest update detail marathi news Divyanka Tripathi : लग्नाच्या आठ वर्षानंतर दिव्यांका त्रिपाठीने दिली गुडन्यूज, चाहत्यांनीही केला शुभेच्छांचा वर्षाव](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/05/06/0216a786384ac316c7eb2f2060176a391714977292775720_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Divyanka Tripathi : 'ये हैं मोहब्बतें' (Ye Hai Mohabbatein) या मालिकेतून घराघरांत पोहचलेली अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठी (Divyanka Tripathi) हिने तिच्या चाहत्यांना नुकतीच एक गुडन्यूज दिली आहे. त्यामुळे तिच्या चाहत्यांना देखील आनंद झाल्याचं चित्र आहे. दिव्यांकाने नुकतच तिच्या सोशल मीडियाच्या अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केलाय. यामध्ये तीने तिच्या नवऱ्यालाही एक सरप्राईज दिल्याचं पाहायला मिळतंय.
या व्हिडिओमध्ये दिव्यांका विवेकला बरेच गिफट्स देतानाही दिसत आहे. त्याचप्रमाणे ती त्याला एक गुडन्यूज असल्याचं सांगते. तिच्या या प्रँन्कला अनेकजण फसतात. पण खरंतर दिव्यांकाचे युट्युबवर 100 K फॉलोअर्स झाल्याचा हा आनंद आहे. पण यामुळे दिव्यांकाच्या घरी नव्या पाहुण्याचे आगमन होणार अशी उत्सुकता सगळ्यांना लागून राहिली होती.
View this post on Instagram
दिव्यांकाच्या व्हिडिओवर नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
दरम्यान दिव्यांकाच्या या व्हिडिओवर अनेकांनी कमेंट्स करत तिला शुभेच्छा दिल्या आहेत. पण अनेकांचा गैरसमज झाल्याचंही यावेळी पाहायला मिळालं. त्यामुळे तिला काही जणांनी या व्हिडिओवर ट्रोल देखील केलं आहे. एकाने म्हटलं की, काही गुडन्यूज वैगरे नाही, ही वेडा बनवतेय. त्यामुळे जरी दिव्यांकाच्या या यशावर तिचे चाहते खूष असले तरीही अनेकांनी तिच्यावर रोष देखील व्यक्त केलाय.
दिव्यांका लवकरच आई होणार?
काही दिवसांपूर्वी दिलेल्या एका मुलाखतीमध्ये दिव्यांकाने आईपणाच्या मुद्द्यावर भाष्य केलं होतं. एका मुलाखतीमध्ये तिने म्हटलं की, मला बेबी प्लॅनिंगसाठी घरातून कोणत्याही प्रकारचं प्रेशर नाहीये. आयव्हीएफ किंवा नॅचरली एग्ज फ्रिज करण्याच्या माध्यमातून मी लवकरच आई होईन. पण सध्या तरी दिव्यांकाकडे बाळाची कोणतीही गुडन्यूज नाहीये.
View this post on Instagram
ही बातमी वाचा :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)