(Source: ECI/ABP News/ABP Majha)
DID Li'l Masters Winner : असामच्या Nobojit Narzary नं जिंकला डीआयडी लिटिल मास्टर सीजन-5 चा किताब
DID Li'l Masters Season 5 Winner Nobojit Narzary : डीआयडी लिटिल मास्टर सीजन 5 (DID Li'l Masters Season 5 ) चा किताब आसामच्या Nobojit Narzary नं जिंकला आहे.
DID Li'l Masters Season 5 Winner Nobojit Narzary : डान्स रिअॅलिटी शो डीआयडी लिल मास्टर्स सीझन 5 (DID Li'l Masters Season 5 ) संपला आहे. नोबोजित नरझरी (Nobojit Narzary) यानं डीआयडी लिटल मास्टर 5 चं विजेतेपद पटकावलं आहे. आसाममध्ये राहणार्या 8 वर्षीय नोबोजित नरझारीने सर्व स्पर्धकांना मागे टाकत डीआयडी लिल मास्टर्स सीझन 5 च्या ट्रॉफीवर आपलं नाव कोरलं. नोबोजितला बक्षीस म्हणून 5 लाख रुपयेही मिळाले. डीआयडी लिल मास्टर्स सीझन 5 च्या ग्रँड फिनालेसाठी जुग जुग जिओची स्टार कास्ट उपस्थित होती.
बॉलिवूड अभिनेता वरुण धवन (Varun Dhawan) , कियारा अडवाणी (Kiara Advani), प्राजकता कोळी (Prajakta Koli), अनिल कपूर (Anil Kapoor), मनीष पॉल (Manish Paul) हे देखील रविवारी डीआयडी लिटिल मास्टरच्या ग्रँड फिनालेमध्ये दिसले. शो दरम्यान, सर्व स्पर्धक एकापेक्षा एक अप्रतिम डान्स परफॉर्मन्स सादर केले. आपल्या दमदार परफॉर्मन्सच्या जोरावर ग्रँड फिनालेच्या शेवटच्या सामन्यात नोबोजितनं शोची ट्रॉफी आपल्या नावे केली. शो जिंकल्यानंतर नोबोजित खूप भावूक झाला होता.
ट्रॉफी पटकावल्यानंतर नोबोजितनं सांगितलं की, विजयाचे श्रेय तो त्याची गुरू दीपिकाला देतो. तो म्हणाला की, त्याला प्राइड मनीमधून त्याच्या दीपिका मॅमसाठी एक मोठा डान्स क्लास उघडायचा आहे. कारण आज जर तो जिंकू शकला, तर त्याचं सर्व श्रेय दीपिका मॅमला जातं.
याशिवाय नोबोजितनं पुढे सांगितलं की, डीआयडीमुळे त्याच्या संपूर्ण शाळेतील लोक त्याला ओळखू लागले आहेत. इतकंच नाही तर त्या लोकांना माझ्याशी बोलायचं आणि भेटायचं आहे. मी खूप आनंदी आहे. डीआयडी लिटील मास्टर्स सीझन 5 मध्ये रेमो डिसूजा, सोनाली बेंद्रे आणि मौनी रॉय जज म्हणून दिसले होते.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- Mahaminister : 11 लाखांच्या पैठणीचा मान रत्नागिरीच्या लक्ष्मी ढेकणेंना; आता सुरू होणार 'खेळ सख्यांचा चारचौघींचा'
- Kon Honar Crorepati : अक्षय कदमचं करोडपती होण्याचं स्वप्न पूर्ण होणार का? जाणून घ्या वडाळ्याच्या अक्षयचा हॉटसीटपर्यंतचा प्रवास
- Karkhanisanchi Waari : एबीपी स्टुडिओची सह-निर्मिती असलेल्या 'कारखानीसांची वारी'चा होणार वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर